अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे लईभारी फायदे.

1633
कलिंगड खा, कूल राहा, कलिंगडाचं सेवन, Benefits of Eating Watermelon, Benefits of Eating Watermelon in marathi, marathi lifestyle tips, Best Watermelon Benefits

उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याबरोबरच तुम्ही थंड कलिंगड खाणं फारच महत्वाचं आहे, कलिंगडामध्ये तब्बल ९२% इतके पाण्याचे प्रमाण असते जे ठेवतं तुमच्या शरीराला कूल. कलिंगड खा, कूल राहा

सर्व ऋतूंपैकी उन्हाळा असा एक ऋतू आहे जो बहुतेक कुणालाच पसंत नसतो. कडक ऊन, वाढती गर्मी यामुळे प्रत्येक व्यक्ती हैराण होत असतो. तसेच, अनेक लोकांना उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते जसे कि, घामोळ्या येणे, उन्हाळी लागणे, अंगावर चट्टे येणे यांसारख्या समस्या उदभवतात.

जसा एप्रिल महिना सुरु झाला, तशी उष्णता आणि तापमानदेखील वाढत जाते. अशावेळी तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जास्त पाणी पिण्याबरोबरच तुम्ही थंड कलिंगड खायला सुरुवात करावी. कलिंगडामध्ये ९२% इतके पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे उन्हामध्ये कलिंगडाचा आपल्या शरीराला खूप फायदा असतो.

कलिंगड खा, कूल राहा, कलिंगडाचं सेवन, Benefits of Eating Watermelon, Benefits of Eating Watermelon in marathi, marathi lifestyle tips, Best Watermelon Benefits
कलिंगड खा, कूल राहा
Image Source – Healthline

कलिंगडाचे असेच काही निरनिराळे फायदे आपण पाहणार आहोत ते खालीलप्रमाणे :

  • कलिंगडाचा चरबी कमी करण्यासाठीदेखील चांगला उपयोग होतो. कारण,कलिंगड हे सगळ्यात कमी कॅलरीज असलेले फळ आहे. कलिंगडामध्ये मोजून ८० कॅलरीज असतात त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास कलिंगड मदत करते. यासोबतच कलिंगडामुळे आपल्या शरीरातील रक्तदाबावर देखील नियंत्रण ठेवता येते आणि रक्तदाबाचा धोका कमी होते, कारण,कालिंडामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अमीनो ऍसिड यांचा समावेश असतो जेणेकरून तुमच्या रक्तवाहिन्यामधील रक्त प्रवाह गुळगुळीत राहण्यास मदत होते.
  • कलिंगडामुळे आपल्या मनाचा उत्साह वाढतो, याचे कारण असे आहे व्हिटॅमिन बी 6. हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे ज्यामुळे तुमच्या नर्व्हस( तंत्रिका) शांत राहण्यास मदत होते. कलिंगडाचा तुमचे हार्मोन्स समृद्ध होण्यास उपयोग होतो. कलिंगड या फळामुळे मानवी शरीराचा मूत्रमार्गाच्या प्रवाहात वाढ होण्यास मदत होते, तसेच, यामुळे मूत्रपिंडावरील ताण कमी होतो, आणि आपले शरीर जास्त प्रमाणात द्रव काढून टाकते. शरीरातील मूत्रपिंडाच्या समस्या कमी होतात.
  • कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात तुम्ही जितके जास्त कलिंगड खाल किंवा कलिंगडाचा रस प्याल, तितके तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढेल.
कलिंगड खा, कूल राहा, कलिंगडाचं सेवन, Benefits of Eating Watermelon, Benefits of Eating Watermelon in marathi, marathi lifestyle tips, Best Watermelon Benefits
Benefits of Eating Watermelon, Benefits of Eating Watermelon in marathi
Image Source – Well-Being Secrets
  • कलिंगडामुळे तुमच्या शरीरात थंडावा तयार होतो आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. सोबतच, कलिंगडामुळे आपल्या शरीराचे संतुलन राखणे कठीण जात नाही.
  • कलिंगड हे नेहमी मोकळ्या किंवा थंड हवेच्या ठिकाणी ठेवावे. कारण कलिंगड हे फार काळ न टिकणारे फळ आहे. मोकळ्या किंवा थंड हवेत ठेवल्यामुळे कलिंगड १५ ते २० दिवस टिकते. तुम्ही कलिंगड खात असताना त्यावर मीठ किंवा मध टाकून खाऊ शकता.
  • कलिंगडामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. म्हणून, तुमच्या आहारामध्ये कलिंगडाचा समावेश असणे आवश्यक आहे.
कलिंगड खा, कूल राहा, कलिंगडाचं सेवन, Benefits of Eating Watermelon, Benefits of Eating Watermelon in marathi, marathi lifestyle tips, Best Watermelon Benefits
Best Watermelon Benefits
Image Source – Healthline
  • कलिंगडामध्ये अनेक पोषणकारक घटक असतात, जसे कि, ‘व्हिटॅमिन A आणि C’. या घटकांमुळे उन्हात आपल्या डोळ्यांची जळजळ होणे कमी होते, तसेच,कलिंगडामुळे आपल्या शरीरातील ‘सोडियम आणि पोटॅशियमचे’ प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणूनच कलिंगडाचे सेवन करणे गरजेचे असते.
  • तसेच, कलिंगड हे फळ व्हिटॅमिनचा एक चांगला स्रोत आहे. कलिंगड आपल्या डोळ्याच्या रेटिनामध्ये रंगद्रव्ये निर्माण करण्यास मदत करते, जे वयाच्या -संबंधित “मॅक्लर डिजेनेशनचे” संरक्षण करते. कलिंगडामधील व्हिटॅमिन A, तुमची त्वचा, दात आणि म्युकस मेम्ब्रेन नारंगी ठेवण्यास मदत करते.

ये भावड्या हे बी वाच –


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here