गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज – समज, गैरसमज

gudi padwa history, gudi padwa information, sambhaji maharaj images gudi padwa, sambhaji raje history, gudi padwa and sambhaji death in marathi, gudi padwa abhang, sambhaji maharaj death, गुढी पाडवा आणि संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा मृत्यू, गुढी पाडव्याचा इतिहास, उलटा कलश, गुडी पाडवा माहिती

गुढीपाडवा आला कि संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याचा संबंध लावणारे मेसेज WhatsApp वर फिरायला लागतात. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा खरंच काही संबंध आहे का ? याबद्दल संपूर्ण पडताळणी करून आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत.

गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध लावणारे अनेक बनेल आणि बिनबुडाचे संदेश गुढीपाडवा येण्याच्या बरोबर काही दिवस आधी तुमच्या फेसबुक, व्हाट्सअँप आणि अनेक प्रसार माध्यमातून झळकतात आणि आपण अशाच कोणत्याही माहितीला खरी समजून विश्वास ठेवतो आणि मग पुन्हा तुमचा समाज विरुद्ध आमचा समाज अशी निर्लज्ज घोषणा देऊन वाट्टेल तसे वागतो, आणि ज्यांनी आपल्याला एकत्र आणले, एकत्र राहावं म्हणून आपले प्राण दिले त्याच शिवराय व शंभूराजांच्या नावाने एकमेकात फूट पाडून बसतो, शिव – शंभू नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो.

gudi padwa history, gudi padwa information, sambhaji maharaj images gudi padwa, sambhaji raje history, gudi padwa and sambhaji death in marathi, gudi padwa abhang, sambhaji maharaj death, गुढी पाडवा आणि संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा मृत्यू, गुढी पाडव्याचा इतिहास, उलटा कलश, गुडी पाडवा माहिती
Sambhaji Maharaj  (Source – LatestLY)

महात्मा जोतीराव फुले म्हणाले होते ना “इतके अनर्थ एका अविद्येने केले” हे वाक्य आपण अशा वेळी अगदी तंतोतंत खरे करूनच दाखवतो. जराही शहानिशा न करता, डोकं न चालवता, खऱ्या – खोट्याची पडताळणी आणि त्या संदेशाची साधने विचारात न घेता आपण सहज अज्ञानी बनून विश्वास ठेवतो. जर समाजकंटक अशा माध्यमांचा वापर येणाऱ्या पिढ्यांची माथी भडकविण्यासाठी करीत आहेत तर आपल्यासारख्या सज्जन लोकांनी याच माध्यमांचा वापर ती भडकलेली माथी आणि ते समाजकंटक ताळ्यावर आणण्यासाठी करायला हवा ना! मग आज पडदा उठवूया शंभूराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा या बनेल नाटकावरून आणि जाणून घेऊया काय आहे या मागचे सत्य.

आरोप

गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभुराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखविण्यासाठी काही आरोप केले जातात. सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले, ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभुराजांना ठार केले, वर तुम्हाला हे सांगितले जाईल कि मनुस्मृती, अध्याय आठवा, श्लोक १२५/१२६ या नुसार शंभुराजांना मारले. पुढे सांगतात कि, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो.

असे देखील आरोप होतात कि, ब्राह्मणांच्यानुसार शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली.

पडताळणी

पहिला आरोप आपण पहिला कि ब्राह्मणांनी मनुस्मृती, आठवा अध्याय, श्लोक १२५/१२६ नुसार शंभुराजांना ठार केले. हे सांगताना मात्र तुम्हाला तो श्लोक दाखविला आणि समजाविला नसेल. आपण इथे तो श्लोक पाहूया. मनुस्मृती, अध्याय आठवा यात राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार, शिक्षा, दंड वगैरे गोष्टींची चर्चा केली आहे.

या आठव्या अध्यायातील १२५ व १२६ या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी कि एखाद्या कैद्याने किंवा साक्षीदाराने खोटी साक्ष, वासनेपोटी, भीतीने, लोभाने, अस्वस्थ होऊन, अज्ञानाने, रागाने दिल्यास त्याला दंड होईल व बहिष्कृत केले जाईल. ब्राह्मणांना फक्त बहिष्कृत केले जाईल पण इतर जातीच्या लोकांना शिक्षा दिली जाईल.

श्लोक १२५ व १२६ सांगतो कि हि शिक्षा देण्याच्या जागा आहेत, त्या जागा आहेत पोट, जिव्हा, हात, पाय, डोळा, कान व सगळं शरीर (१२५). राजाने गुन्ह्याचे गांभीर्य, काळ, वेळ, उद्देश, जागा अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप व अवयव ठरवावे (१२६). आता सांगा यात कुठे लिहिले आहे मुंडके ? आणि त्याला काठीवर लटकावणे ? आणि शिक्षा हि राजाने करायची असते, मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभुराजांना पकडले आणि मारले ? औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार का वागेल ?

gudi padwa history, gudi padwa information, sambhaji maharaj images gudi padwa, sambhaji raje history, gudi padwa and sambhaji death in marathi, gudi padwa abhang, sambhaji maharaj death, गुढी पाडवा आणि संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा मृत्यू, गुढी पाडव्याचा इतिहास, उलटा कलश, गुडी पाडवा माहिती
(Source – Quora)

पहिला व दुसरा आरोप तर आपण साफ केला, आता तिसरा बघूया. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे या रागाने हत्या झाली. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते असे स्वतः त्यांनी कुठेही म्हटले नाही. शंभूराजांच्या स्वराज्यात काय फक्त मराठा व बहुजन राहत होते ? जर हे बहुजनांचे राजे आहेत तर शिवाजी राजांचा व शंभूराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी (पंडितांनी) का केला ? अष्टप्रधान मंडळ व सैन्यात ब्राह्मण का होते ?

शंभूराजांचे सोबती कवी कलश हे तर ब्राह्मण होते आणि मनुस्म्रीतीनुसार ब्राह्मणांना या शिक्षा होऊ शकत नाहीत, त्यांच्यावर फक्त बहिष्कार करता येऊ शकतो, मग ज्या मनुस्मृतीचे नियम सर्वस्व मानून शंभुराजांना मारले तेच नियम तोडून ब्राह्मणांनी एका ब्राह्मणालाच कसे मारले तेही अगदी शंभूराजांसारखे आणि त्यांच्या आधी ?

पुरवणी

या सगळ्या भंपक गोष्टींना दुजोरा देण्यासाठी असे सांगितले जाते की गुढीपाडवा हा सण नव्हताच. हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा शंभुराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरु झाला. आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो, पण त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया. गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू मृत्यू, शिव जन्म आणि याही आधीच्या काळात सापडतो. याची काही उदाहरणे आपण पाहूया. २४ नोव्हेंबर १६४९ सालचे स्वराज्यातील एक पत्र आहे, या पत्रात एक महजर लिहिला आहे, त्यात गुढी पाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

म्हणजेच शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता. इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले, आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात गुढी पाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. या सोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे कि गुढी पाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते. हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे.

हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढी पाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. हे तर आपण पहिले कि शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे. आता पाहूया कि शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता कि नाही. आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य, त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शवते.

त्याही आधी संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय ४/६/१४ मधील ओळींत आणि अनेक ठिकाणी ‘विजयाची गुढी’ व असे अनेक गुढी पाडव्याचे उल्लेख, गुढी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात. आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू,

एकें संन्यासी तोचि योगी। ऐसी एकवाक्यतेची जगीं। गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरीं।।

संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.

gudi padwa history, gudi padwa information, sambhaji maharaj images gudi padwa, sambhaji raje history, gudi padwa and sambhaji death in marathi, gudi padwa abhang, sambhaji maharaj death, गुढी पाडवा आणि संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा मृत्यू, गुढी पाडव्याचा इतिहास, उलटा कलश, गुडी पाडवा माहिती
Sant Dnyaneshwar (Source – Google)

संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात,

पुढे पाठविले गोविंदे गोपाळा। चपळा हाती गुढी।।

यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहित होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते.

काय आहे गुढी पाडवा ?

गुढी पाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्ये केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात. आपल्या दारात उभारलेली गुढी हि समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते. भारत, भारतातील अनेक संस्कृती तसेच भारताबाहेर म्हणजे आफ्रिका, इस्राईल, युरोप अशा देशांत अनेक धर्मातील पुराणांमध्ये काठी पूजेचा उल्लेख केला आहे, जी आपल्या हिंदू धर्मात गुढी पाडव्याला वापरतात, त्यामुळे काठी हि मनुस्मृतीमधून आली हे तर साफ भंपक आहे.

आपल्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा एका राजाने, इंद्र देवाने दिलेल्या काठीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजा केली आणि त्याच्याप्रती आदर व्यक्त केला आणि मग पुढे अनेक राजांनी देखील काठीला वस्त्र लावून हि परंपरा पुढे नेली. आपल्या पुराणानुसार ब्रह्मदेव यांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्री राम देखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले असे सांगितले जाते. हा गुढी पाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलगू मंडळी देखील साजरा करतात. इतकेच नव्हे तर इतरही राज्यांत नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या नावांनी साजरे होते.

gudi padwa history, gudi padwa information, sambhaji maharaj images gudi padwa, sambhaji raje history, gudi padwa and sambhaji death in marathi, gudi padwa abhang, sambhaji maharaj death, गुढी पाडवा आणि संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा मृत्यू, गुढी पाडव्याचा इतिहास, उलटा कलश, गुडी पाडवा माहिती

जागे व्हा !

मंडळी, आपण आज बरेच आरोप पहिले आणि त्या आरोपांसोबतच खरी खोटी माहितीही पाहिली. यावरून “समझने वालों को इशारा काफी है” आपल्या शंभूराजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, माणसामाणसांत जातीभेद केला नाही. इतिहास हा जातीच्या आधारे मांडूच शकला जाणार नाही. स्वराज्यासाठी कवी कलश हा ब्राह्मण देखील महत्वाचा होता आणि शिवा काशीद नावाचा न्हावी देखील महत्वाचा होता. आपल्या शिव-शंभू पितापुत्राने जात-पात विसरून आपल्याला एकत्र यायला शिकविलं, आपण एकत्र राहावं म्हणून शंभूराजांनी प्राण दिले, आणि आपण त्यांचे नाव घेऊन एकमेकांचे प्राण घेण्याच्या गोष्टी करतोय.

राजे आज असते तर खरंच म्हणाले असते कि याच साठी का केला होता अट्टाहास स्वराज्याचा ?

हे शिवरायांचं स्वराज्य आहे, हे आपलं राज्य आहे, या राज्यातील एकेक दगड आणि एकेक माणूस महत्वाचा आणि आपला आहे. शंभूराजे कोण्या एका जमातीचे राजे नाहीत कि कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक नाहीत. ते रयतेचे राजे आहेत, आणि रयतेत ब्राह्मणही आले आणि बहुजनही, म्हणजेच शंभूराजे आपले आहेत. शंभूराजे आपले तर आहेत पण प्रश्न हा आहे कि ते आपल्यात आहेत का ? असतील तर त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे चला, सर्वाना सोबत घ्या आणि आपल्यात नसतील तर त्यांना आपल्यामध्ये जागे करा.

शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला हे सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे. याला विरोध करून एकच खोटी गोष्ट हजारवेळा बोलून खरी होत नाही हे लोकांनी लक्षात ठेवावे. आपल्याला भडकावणारे, आपल्यात फूट पडणारे तर निर्लज्ज आहेत, स्वार्थी आहेत, परंतु, आपण सज्जन आहोत आणि जर दुर्जन खोटे बोलण्यासाठी इतकी मेहनत घेत असतील आणि शंभूराजांच्या नावाने समाजात फूट पडणार असतील तर आपल्यासारख्या सज्जनांनी शंभूराजांच्या नावाने अशी फूट पाडणाऱ्या लोकांना चपराक देण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी याहून अधिक मेहनत घेतली पाहिजे.

शंभूराजे तर गेले, पण आपल्यावर जबाबदारी टाकून गेले, ती जबाबदारी आहे आपली एकी टिकवून ठेवण्याची. आपण नक्कीच सगळे भेद बाजूला सारून या शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्य घडवूया. या गुढी पाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहचवले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने नव्या वर्षात शुभ कार्य घडले असे समाधान वाटेल. आपणा सर्वांना गुढी पाडाव्याच्या व हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

37 COMMENTS

  1. लेखक थातूर मातूर लिखाण करून तोंडी पुरावे सांगुन कोणाची बाजू मांडतोय कोणाची वकिली करतोय. संभाजी महाराज यांनी फितुर भटुकडयानां कठोर शिक्षा केली होती.,हे विसरून चालणार नाही.

    • मस्त उत्तर दिले अशा दलालांना बरोबर आहे हा तोंडी पुरावे देतो.

  2. गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज – समज, गैरसमज — हा गैरसमज नाही सत्य आहे.

    • भाऊ…. गुडी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे….. या दिवशी पंचांग पाहिलं जातं नाही
      हा योग शुभ आहे हे आणि तो योग प्रभू श्री रामा नी बनवला आहे….
      संभाजी महाराजांचा…कालखंड अलीकडचा होता पण सण तर जुनाच आहे…..
      खरंतर आपले सण (गौरव ) नष्ट करण्याचा हा प्रयन्त होता….. शंभूराजे च्या काळात घडलेली घटना पण शंभूराजे देखील गुडीपाडवा साजरा करत होते हे आपण कसे विसरलो.?

  3. जग डेवलोपमेन्ट करत आहे न आपले लोक आपल्या लोकांशी भांडण.
    वरील लेख बरोबर आहे कही लोक हिंदुन मधे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    आणि त्या काळात काही भटुक अगवं होतेच हे पण सत्य आहे.

  4. Good explanation, but pls explain how Peshwai comes into power after death of Sambhaji Maharaj and not Mughlai? Please put some light on this query.

    • After Ch. Sambhaji Raje, Ch.Rajaram and then Ch. Shahu became king. Ch. Shahu was in Auragzeb’s jail till Aurangjeb died. He depended heavily on Pahila Bajirao Peshawa, who was brave, loyal and expanded Maratha kingdom in the north.
      Peshawa means Pant Pradhan. Peshwas ruled in the name of Kings, who succeeded Ch. Shahu Maharaj.

  5. अगदी अभ्यासपूर्ण लेख दिला आहे. पण , गुढीवर कलश उलटा का टांगतात , किंवा हार , साडी आणि कडुनिंबाचा पाला लावून, मनुष्यस्वरूपी देखावा का तयार केला जातो हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे.

    • महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते.

  6. मग अण्णाजी पंत ने मराठ्यांची सत्ता काबीज कधी केली…. बामणी कावे तुम्ही आम्हाला नका सिखवू

  7. उलटा कलश हा कोणत्या इतर कार्यात वापरतात? सत्यनारायण पुजेला, देवघरात, मंदिरात उलटा कलश ठेवतात का? लिंबाचा पाला हा कोणत्या इतर कार्यात वापरतात मयत सोडून?
    पुर्वीच्या गुढी म्हणजे दिंडया/झेंडे पताका जे वारकरी पालखीमधे वापरतात.
    लेखकाने आपल्या लायकीमधे राहावे. आपले ज्ञान पाजळू नये.

    • 👍 right…. Ugach je pan bolley fakt लेखाची size वाढवण्यासाठी…. कशतुंच हे सिद्ध होत नाही…. ज्या सगळ्या गोष्टी दुसरीकडे वापरल्यावर अपवित्र त्या गुढीपाडवा मध्ये वापरल्यावर का शुद्ध????

  8. Rahul Burgute पार कचरा केला राव लेखकाचा. इतिहासाची छेडछाड महागात पडली लेखकाला.

  9. swarajyacha bhagva har naral gudi la chalat nahi ka hyachya peksha hi sreshth kay ahe ka lekhakala ek ch vinanti ahe ki jitka unch bhagva phadkavta yeeel tvhdha unch phadkavava chatrapti smbhanji maharaj adlya divshi gele pn dusrys divshi amhi bhagva phadkun te amar ahet aani navin varshachi survat pn karu pn bhagva phadkun ch

  10. मंग भटांनी शिवराज्याभिषेक का नाकारला होता?
    …..ते तर माहीत असाव लेखकसाहेबांना…..

  11. पाडवा सण देशभर साजरा करण्यात येतो.मग गुढ्या फक्त महाराष्ट्रातच का उभारतात ?
    संभाजीराजे यांच्या बलीदानावर तुम्ही कायमच गप्प का असतात ?

  12. पण काल संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली आणि आज आपण गुढी उभरण कितपत योग्य आहे

    • अगदी बरोबर, आपला बाप आज आपल्याला सोडून गेला असेल तर आपण उद्या त्याचा जल्लोष करणार का…

    • बरोबर आहे….कितपत योग्य काल मयत आज सण सजारा करणारे हे…लबाड आहेत

  13. आम्हाला अक्कल शिकवू नका लेखक साहेब…
    ती अक्कल आम्हाला आमच्या बापाने शिकवली.
    फूट आमच्यात बहुजनांनी नाही तर भट ब्राम्हणांनी पाडली. कारण छत्रपती शंभू १७ भाषांचे जाणकार,१४० जागतिक लढाया जिंकलेले व चार ग्रंथांची लीहणारा हा महान राजा भटांच्या पचनी पडला नाही.

  14. साहेब लेख छान लिहला आहे तुम्ही समाजाला एकत्र करणे गरजेचे आहे पण आपण प्रभु राम जर वनवास करुन या दिवसी आले आसतील तर हा सन संबंध भारतात साजरा होण्याची गरज होती पण तसं पाहिलं तर तो होत नाही यावर सविस्तर वर्णन केले पाहिजे होते ईतिहास चे मात्र करुन रंगेल म्हणून संबोधले ज्यांनी शंभूराजे यांच्या चारित्र्यावर मेल्यानंतर चिखल उडवत होते ते लोक कोण होते आहे हा ईतिहास कोणी लिहिला आहे कडु लिबाचा पाला कुठल्या शुभ मंगल समयी वापर करतात ते ही सांंगितले नाही बाबु चा उपयोग कुठल्याही परिस्थितीत वापरतात ही शुभ समय काय आहे तो ही सांगावे आणि प्रभू रामचंद्र वनवास संपवून आले आहेत तर यालाही काही प्रमाण आसेल ना क्ष्लोक 125/व क्ष्लोक126या प्रमाणात याचा या आगोदर कोणाला शिक्षा सुनावली होती याचा दाखला नाही दिली किंवा शंभूराजे यांच्या नंतरच्या काळात परत कोणाला आशी शिक्षा सुनावली हे ही माहिती नाही मग फक्त एकच प्रश्न आहे की का फक्त शंभुराजे यांना मनस्मुतीप्रमाणे छळ केला आणि संभाजीमहाराज यांच्या मुत्सद्देगिरी पाहून ते जिवंत आसताना त्यांच्या विरोधात कट कारथान रचनारे कोण होते व गुढीपाडवा हा जर संबंध हिंदूचा सन आसेल तर हिंदु फक्त महाराष्ट्र, कनाडी आणि तेलगु यांच्या पलीकडे हिंदू धर्मात राहणार लोक आहेत की नाही प्रभू श्रीराम विजयी होऊन आले म्हणून विजयादशमी आमच्या माथ्यावर मारली आणि आता विजयी गुढी नेमके प्रभू श्रीराम कधी एकदा आले होते तर सांगाव आणि मुगल सम्राट औरंगजेब यांच्या कडे ब्राह्मण वकिली नव्हते काय याचे उत्तर दिले गेले पाहिजे आसे असंख्य प्रश्न आहेत…?

  15. कोणत्या मयातला लिंबाचा पाला वापरतात ? देवीच्या पूजेत लिंबाचा पाला असतो नेहमी, कोण बोललं लिंबाचा पाला अशुभ ??? कलश गुधीवत लावल्यावर त्याचा आकार कसा दिसतो बघितली का ?? मंदिराच्या कलशासारखा दिसतो मूर्खा, आणि महाभारतात आदी पर्वात, स्पष्ट उल्लेख आहे, इंद्राने दिलेल्या बांबूला, राजा वसूने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, उत्तम वस्त्र नेसवले, दागिने घातले, सुगंधी द्रव्ये लावली व इंद्राच्या सन्मानासाठी तो बांबू काठी जमिनीत रोवली, यालाच वसव देव असे म्हणतात आणि तेव्हापासून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असे करण्याची प्रथा झाली असा स्पष्ट उल्लेख आहे, भांडारकर आवृत्तीत पण आहे. त्यामुळे नसलेलं ज्ञान पाजलू नको मूर्खा. गुढीला ब्रह्म ध्वज पण म्हणतात, त्याला भरजरी वस्त्रच लावले, असच आहे कुठेही कोरे कापड नाही सांगितलं मूर्खा. राजस्थानात गुढी पाडव्याच्या नंतर गंगौर सण असतो, तेव्हा तिकडच्या गुढ्या बघ मूर्खा. आणि नवीन वर्षाच्या दिवशी निंबाच्या फुलांची आणि पानाची गूळ मिसळून पदार्थ पूर्ण दक्षिण भारतात बनवतात, मूर्खा, नेहमीच्या हार मध्ये पण निंबचा पाला वापरतात, देवीला तर रोजच घालतात. आणि महाभारतात राजाने बांबुच वापरला आहे इंद्राने राज्यासाठी दिलेला.

    • तुझी लायकी आणि जळफळाट कळाला.

      लवकरच रायगडावर गद्दार अनाजी पंताची आणि प्रतापगडाच्या पायथ्याला गद्दार कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची समाधी बांधण्यात यावी आणि त्यावर मुतारी बांधण्यात यावी.

    • कोणत्याही मंदिराचा कळस उलटा नसतो…. त्याचा आकार सरळ कलश मध्ये नारळ ठेवल्यासारख असतो

  16. हा लेख कोण लिहला आहे यांचं फोन नंबर मिळेल का…
    नसेल तर ज्यांनी लिहलय त्यांनी मला फोन करावा .
    9975601550

  17. मला आणखी एका विषया बद्दल जाणून घ्यावे वाटते.
    तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मी असे ऐकले आहे की जो ब्राम्हण बोलावला होता त्याने महाराजाना त्याच्या डाव्या पायाने टिळक केले होते… ह्या मागचे सत्य मला समजेल का?

  18. Hyach divasa agodarch apple Mahan rajyacha smrutidin asato aani tumvhya lekha pramane November che Patra ahe mag March Madhe Kas hote aahe khar mhanje aaj aatya Samaj Sthapna divas aahe khar tar bhramna virodhat Bhandardara nahi manuvada baroobar aahe he Lakshat rahudya saglya Samajala manuvaad ha kida aahe Hindu ved Puran side LA karun manuvaad pudhe takala Hota maharajaachya Velela Sudha aani tumhi pan manuvada la samrthan Karu naka🙏

Leave a Reply to Pranav Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here