लईभारी….या देशांमध्ये मध्यमवर्गीय भारतीयांना सुद्धा श्रीमंत असल्यासारखे वाटेल

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate

जगातील असे १० देश जिथे मध्यमवर्गीय भारतीयालासुद्धा आपण खूपच श्रीमंत असल्याचा “फील” येईल

१. कम्बोडिया

कम्बोडिया हा खूप सुंदर देश आहे आणि कम्बोडियामध्ये मनाला आकर्षित करण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. कम्बोडियामधील प्रेक्षणीय स्थळांमध्ये अंगुरवट मंदिर, फनोम फेन, कार्डमोम माऊंटेन्स, कॅपोट नदी अशी अनेक ठिकाणं आहेत. दरवर्षी येथे भारतातील खूप लोक भेट देत असतात. कारण, १ रुपयांची किंमत येथे ६० कम्बोडियन रिअल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ७ दिवसांचा हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च फक्त २००० रु आहे. तर, खाण्यापिण्याचा खर्च जवळपास १००० रु आहे. विमानखर्च पण खूप स्वस्त आहे. फक्त १५००० ते १७००० हजारात तुमची संपुर्ण सहल होईल.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
(Source – Google)

२. व्हिएतनाम

व्हिएतनाममध्ये भारतीय मुद्रा राज्य करते. इथे १ रुपयाची किंमत ३३३ डोंग आहे. हे तर नक्की आहे कि तुम्ही येथे मनसोक्त राहू शकता. व्हिएतनाम प्राकृतिक सौंदर्याने नटलेला देश आहे. इथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच क्रूझमध्ये सफरीचा आनंद घेऊ शकता. तेथे तुम्ही हनोई (hanoi), दलत (dalat), हो चीन मीन (ho chi minh) सारख्या सुंदर ठिकाणी जाऊ शकता. इथे तुम्हाला १ आठवडा राहणे आणि खाण्याचा खर्च ५००० रु. एवढा येईल. विमानखर्च फक्त २०,००० रु एवढा असेल. म्हणजेच, तुम्ही २५००० रुपयांमध्ये १ आठवडा आरामात राहू शकता.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Vietnam (Source – iTV-Asia.com)

३. इंडोनेशिया

निळा समुद्र, मोकळी हवा, सुंदर निसर्ग असल्यामुळे दरवर्षी लाखो संख्येने पर्यटक येथे येत असतात. इंडोनेशियामधील खास जागा ‘बाली’ आहे. तेथे तुम्ही जागृत लाव्हारस (active volcanoes) बघू शकता .इथे जगातील सगळ्यात मोठे बुद्ध मंदिर, बोरोबुदूर (borobudur) बघायला जाऊ शकता. भारतीय पर्यटकांसाठी हे हॉलिडे डेस्टिनेशन आहे. कारण, इथे भारतीय १ रुपया हा २०७ इंडोनेशियन रुपयांच्याबरोबर आहे. एक आठवडा राहण्याचा खर्च ३००० रु येऊ शकतो, आणि खाण्याचा खर्च १००० रु. येतो. यावरून असं लक्षात येतं कि इंडोनेशियामध्ये राहण्यासाठी आठवड्याचा खर्च १५००० रु. येईल.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Bali, Indonesia (Source – TripSavvy)

४. चिली

चिलीला जगभरातील सर्वात लांब देश म्हणून ओळखले जाते. हा देश तसा आकाराने खूप लहान आहे. पण याची क्रॉस लाईन ४००० किलोमीटर पर्यंत आहे. चिलीमध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत. जसे कि वाळवंट, ग्लेशियर, व्होलकॅनोस आणि खूप काही. भारतीय पर्यटकांसाठी हे हॉलिडे डेस्टिनेशन आहे. १ भारतीय रुपयाची किंमत ९ दशांश १६ पैशाच्या बरोबरीने आहे. तुम्हाला चिलीला जाण्यासाठी विमान खर्च जवळजवळ ६०,००० रु. येईल पण राहणे खूप स्वस्तं आहे. तुम्ही आरामात एक आठवडा १०,००० रुपयांत काढू शकता.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Chile (Source – imgur.com)

५. हंगेरी

भटकंतीसाठी हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. इथे तुम्ही राहण्याचा, खाण्याचा आनंद घेऊ शकता. येथे १ रु ची किंमत जवळजवळ ४ हंगरी फॉरेनस आहे. राजधानी बुडापेस्टला जगभरातील सर्वात मोठे रोमँटिक शहर म्हणून ओळखतात. येथील चर्च आणि बिल्डिंग खूप सुंदर आहेत. येथे एक आठवड्याचा खर्च ७००० रु. पर्यंत होईल. तुम्हाला भारतातून सगळ्यात स्वस्त विमानखर्च २५,००० रुपयांपासून मिळेल.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Holidays in Hungary (Source – Guardian Holidays)

६. मंगोलिया

मंगोलियामध्ये भारतीय लोकांना आपण राजा आहोत असेच वाटेल. कारण, मंगोलिया हे राजा महाराजांचे शहर म्हणून ओळखले जाते. “चंगीस खान” चे नाव तर सगळ्यांना माहीतच आहे. मंगोलियामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचे पुतळे आहेत. या व्यतिरिक्त मंगोलियाचा इतिहास खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला मंगोलियामध्ये गेल्यावर नक्कीच या इतिहासाची माहिती मिळेल. येथे १ रु.ची किंमत ३६ मंगोलिया तुंगरिक आहे. खाणे, पिणे, राहणे फक्त ५००० रुपयांमध्ये होईल. तुमचा विमान खर्चसुद्धा २०,००० रु.पर्यंत येईल. तुमचा संपूर्ण खर्च २५,००० पर्यंत होईल.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate

७. लाओस

लाओसमध्ये तुम्हाला हिंदुस्तानी असल्याचा गर्व होईल. कारण, येथे तुम्हाला मंदिर, बुद्धीस्ट मठ पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणचे धबधबे, गार्डन इत्यादी खूप सुंदर आहेत. तुमचा विश्वास नाही बसणार पण, भारतीय १ रु.ची किंमत तेथे १२२ लोथियन कीप एवढी आहे. येथे तुम्ही मनसोक्त खर्च करू शकता. एक आठवड्यासाठी तुम्हाला फक्त ३०,००० रु, एवढा खर्च येईल. लाओस साठीचा विमानखर्च फक्त १६,००० रुपये एवढा येतो.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Laos (Source – kingfisherecolodge.com)

८. पॅराग्वे

पॅराग्वे हा लॅटिन अमेरिकेतील देश आहे. येथे रुपयाची किंमत जास्त आहे. येथे १ रु.ची किंमत ६३ गुआरानी बरोबर आहे. पराग्वेची वैशिष्टये पाणी, आयर्लेंड, आणि चर्च हि आहेत. पण येथील प्रसिद्ध ठिकाण आहे ते ट्रिपल फ्रंटइअर (triple frontier). एकाच ठिकाणावरून तुम्ही तीन देश म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील, पराग्वेला पाहू शकता. येथील हॉटेल खूप स्वस्त असून, तुम्ही एक आठवडा फक्त ५००० रुपयात घालवू शकता. विमानखर्च हा थोडासा महाग आहे. कारण हा देश भारतपासून खूप दूर असल्यामुळे तुम्हाला विमानखर्च हा ७०,००० रुपये येतो.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
triple-frontier Paraguay (Source – Geology In)

९. साउथ कोरिया

भारतीय लोकांमध्ये खूप प्रसिद्ध देश म्हणजे साउथ कोरिया. येथे भारतीय लोकांना जाण्यास खूप आवडते. तेथे तुम्ही सी टॉवर, आयर्लंड, म्युझिअम आणि अनेक ऐतिहासिक जागा पाहू शकता. ह्या देशाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही खूप शॉपिंग पण करू शकता. भारतीयांसाठी हि जागा खूप स्वस्त आहे. २०,००० रुपयात तुम्ही एक आठवड्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. तेथे भारतीय रुपयाची किंमत १६ साऊथ कोरियन वोन आहे.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
South Korea (Source – Frontera)

१०. उझबेकिस्तान

उझबेकिस्तानचा इतिहास खूप जुना आहे. येथे तुम्हाला खूप मस्जिद बघायला मिळतील. येथे तुम्हाला जुन्या वास्तुकला देखील पाहायला मिळतील. सगळ्यात मोठा आणि जुना मदरसासुद्धा इथे आहे. तुम्हाला येथे राहण्याचा खर्च केवळ ४५०० रु एवढाच येईल आणि विमान खर्च हा १५,००० रु एवढा येईल. येथे १ रु किंमत ११६ सोम एवढी आहे.

indian currency value with other countries, indian rupee stronger countries, Vietnam, Bolivia, Paraguay, south Korea, Uzbekistan, Belarus, Cambodia, Laos, higher indian currency, रुपयाची किंमत जास्त असलेले देश, इंडोनेशिया, Indonesia, Indian currency exchange rate
Uzbekistan (Source – AFD)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here