“पाकिस्तानी घुसखोरांनी युध्दाच्या वेळी एक मागणी केली होती, ‘आम्हाला तुम्ही माधूरी दिक्षित द्या, आम्ही शांत होऊ’.”
कारगिल युध्दातील वीर, कॅप्टन विक्रम बत्राचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी पालमपुर इथे झालेला. विक्रम बत्रा असे ऑफिसर होते, ज्यांनी कारगिल युद्धात अभूतपूर्व पराक्रम गाजवून वीरगती प्राप्त केली, ज्यानंतर त्यांना भारतीय सैन्यातर्फे दिला जाणारा वीरता अवॉर्ड म्हणजेच परमवीर चक्रानेही सन्मानित करण्यात आले होते. आज आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. पालमपुरमध्ये जीएल बत्रा आणि कमलकांता बत्राच्या घरी ९ सप्टेंबर १९७४ ला दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. त्यांनी दोघांचे नाव लव – कुश ठेवले. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल. सुरवातीच्या काळात शिकण्यासाठी विक्रम कोणत्याच शाळेत गेले नाहीत. त्यांचा शालेय अभ्यास हा घरीच व्हायचा आणि त्यांची शिक्षिका त्यांची आईच असायची.
पाकिस्तानी घुसखोरांनी माधुरी दीक्षितची मागणी करताच…
१९ जून, १९९९ ला कॅप्टन विक्रम बत्राच्या लीडरशिपमध्ये इंडियन आर्मीने घुसखोरांकडून पॉईंट ५१४० मिळवले. हे सर्वात महत्वाचे स्ट्रेटेजिक पॉईंट होते. कारण ते एक उंच ठिकाण होते जे युद्धातील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचे होते. ते सर्व जिंकत विक्रम बत्रा पुढे ४८७५ फीट या उंचीवर पोहचले. ते जिथे पोहोचले ते ठिकाण समुद्रपातळीपेक्षा १७,००० फूट उंचीवर आणि ८० अंशावर होते. ७ जुलै १९९९ रोजी जखमी अधिकाऱ्याला वाचवताना त्यांचा मृत्यु झाला. ऑफिसरचा बचाव करताना कॅप्टन विक्रम त्यांना म्हणाले, “तुम्ही बाहेर पडा… तुमच्या घरी तुमची पत्नी आणि मुले तुमची वाट पाहत आहेत”.
त्यांच्या तुकडीमध्ये “नवीन” नावाचे सहकारी होते, त्यांच्या पायाजवळ एक बाँब येऊन फुटला. ते पुर्णपणे जखमी झालेले पाहून विक्रमने लगेचच त्यांना तिथून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले. पुन्हा अर्ध्या तासाने विक्रमने आणखी एका ऑफिसरला वाचवले. आजही त्यांचे ते सहकारी विक्रम बत्राविषयी बोलताना खूपच भावूक होतात. त्यांच्या पराक्रमाविषयीचा अजून एक किस्सा पुढीलप्रमाणे. पाकिस्तानी घुसखोरांनी युध्दाच्या वेळी एक मागणी केली. आम्हाला तुम्ही माधूरी दिक्षित द्या, आम्ही शांत होऊ. त्याचवेळी कॅप्टन विक्रम बत्रा हसले व म्हणाले “हि घ्या माधुरी दिक्षित” आणि त्यांनी एके – ४७ ने धडाधड गोळ्या झाडल्या.
याच चकमकीत विक्रम बत्राने आपले प्राण गमावले. हि कथा फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये आजही गाजत आहे. खुद्द पाकिस्तानी सैन्याने त्यांना “शेरशाह” हे नाव दिले. ६ डिसेंबर १९९७ रोजी विक्रम बत्रा १३ जेके रायफल्समध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते. अवघ्या दोनच वर्षात ते कॅप्टनसुध्दा बनले. त्याचवेळी कारगिलचे युध्द सुरू झाले आणि ह्याच दरम्यान ७ जुलै १९९९ ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वाचवून देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.