तुम्हाला माहीतच असेल आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, त्या संविधानाप्रमाणे नमूद केलेल्या कायद्यांमध्ये खूप कायदे असे आहेत कि त्यांचा या सध्याच्या परिस्थितीत काही उपयोगच नाही. काही कायदे असे आहेत की ते आपल्याला माहित देखील नाही. तसेच यापैकी बहुतेक कायदे हे ब्रिटिश सरकारने बनवले असून ते खूप जुने आणि विलक्षण (Weird And Crazy Laws In India) आहेत. पण आजही भारतात ते कायदे लागू आहेत.
भारतातील विचित्र कायदे कोणते आहेत ?
१. जर समजा तुम्ही आत्महत्या करत असाल तर तुम्हाला त्याचा प्लॅन म्हणजेच आत्महत्या करण्याची योजना आखावी लागेल, ऐकायला आणि वाचायला जरी तुम्हाला वेगळे वाटत असले तरी ते खरे आहे. कारण कलम ३०९ च्या मते आत्महत्या हि कायदेशीर असून जर तुमची आत्महत्येची योजना असफल झाली तर मात्र ती बेकायदेशीर मानली जाते व त्या व्यक्तीला दंड भरावा लागतो.
२. तुम्हाला माहित आहे का चीनमध्ये प्रत्येक कुटुंबास २ अपत्य हा कायदा लागू आहे जर त्याहून जास्त अपत्य झाले तर त्या कुटुंबास दंड भरावा लागतो. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि भारतात देखील हा कायदा लागू असून केरळमध्ये हा कायदा लागू आहे. जर तिसरे मूल झाले तर माता पित्यास १०००० रुपये दंड आकाराला जातो.
३. भारतामध्ये मद्यपानाविषयी देखील निरनिराळे कायदे आपल्याला बघायला मिळतील, ज्यामध्ये दिल्ली स्टेट गव्हर्नमेंटचा एक असा कायदा आहे कि दिल्ली मध्ये वाईन किंवा बीयरची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी आहे पण भारतात इतर अनेक ठिकाणी हे बेकायदेशीर मानल्या जाते.
४. जर तुम्हाला भारताच्या वायुसेनेमध्ये दाखल व्हायचे आहे किंवा तुमचे पायलट बनायचे स्वप्न आहे तर तुमच्या पायाची लांबी हि कमीतकमी ९० सेंटिमीटर किंवा त्याहून जास्त असायला लागते जर ती नसेल अथवा कमी असेल तर तुमचे पायलट बनायचे स्वप्न हे अपूर्णच राहील.
५. दारू पिण्याविषयी देखील वेगवेगळे कायदे आहेत, त्यामध्ये दारू पिण्यासाठी देखील वयाची अट असते. त्यामुळे काही ठिकाणी जसे कि हिमाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम आणि पाँडिचेरी ह्या राज्यांमध्ये दारू पिण्यासाठीची वयाची अट हि १८ वर्षाच्या वरची आहे तर झारखंड, जम्मू- काश्मीर आणि कर्नाटक येथे २१ वर्षावरील लोक दारूचे सेवन करू शकतात. तर केरळ मध्ये २३ वर्षावरील आणि दिल्ली आणि पंजाब येथे २५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले लोक दारू सेवन करू शकतात. पण महाराष्ट्र राज्यात असा अनोखा कायदा आहे कि जिथे वाईन हे १८ वर्षावरील वयोगट सेवन करू शकतो तर २१ वर्षावरील वयोगट हा वाईन आणि बिअर सेवन करू शकतो तसेच २५ वर्षावरील वयोगट हा वाईन बिअर, दारू ह्या तिन्ही गोष्टी सेवन करू शकतात.
६. १९११ साली एक कायदा बनवला गेला होता ज्यात असे नमूद करण्यात आले होते कि एका डान्स फ्लोअर वर एक साथ १०च जोडीदार डान्स करू शकतात, त्यापेक्षा जास्त जोडीदार नाचू शकत नाही पण जर तुम्ही असे केले असेल तर तुम्ही नक्कीच कायदा मोडलेला आहे. पण जर तुम्हाला असे करायचे असेल तर ३ दिवस अगोदर तुम्हाला पोलीस कमिशनर यांची परवानगी घ्यावी लागेल.
७. भारताला स्वातंत्र्य मिळून देखील आजही भारतात आरक्षण लागू आहे, आणि काही ठिकाणी आरक्षणानुसार नोकरी देखील मिळवली जाते. पण आंध्रप्रदेश येथे काही वेगळाच कायदा तुम्हाला बघायला मिळेल, तो असा कि ज्यांचे दात हे मजबूत आणि सुंदर असतील त्यांनाच फक्त “मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर” या पदासाठी भरती केले जाते.
८. कॉम्बॅट युद्धाच्या वेळी सैनिक हे चाकूचा वापर करू शकत नाही, कॉम्बॅट म्हणजेच सशस्त्र लढाई होय. पण भारताच्या नागालँड, दार्जिलिंग येथे ते त्यांच्या पारंपरिक चाकूने लढाई लढू शकतात.
९. भारतामध्ये इंटरनेटसाठी देखील कायदा आहे, तसेच त्यावर सेन्सर देखील लावला गेला असून आक्रमक फोटोज प्रदर्शित करणाऱ्या वेबसाइट्स व अश्लील फोटोज प्रदर्शित करणाऱ्या वेबसाइट्स वर सरकारचे काही नियंत्रण नाही.