धोनीच्या फॉर्मची जशी चर्चा रंगत आहे तशीच त्याच्या बाबतीत अजून एक चर्चा रंगत आहे कि धोनी प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटवर वेगवेगळे लोगो का लावत आहे.
क्रिकेटचा महाकुंभ सध्या इंग्लंडमध्ये सुरु आहे. इंग्लंडविरुद्धचा एक पराभव सोडला तर भारतीय संघाने विश्वचषकातील सर्वच सामन्यांमध्ये आत्तापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे . पण भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मची चिंता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. भारतीय संघाचे अनेक चाहते धोनीवर त्याच्या संथ खेळाबद्दल टीका करत आहेत. विश्वचषकामधील धोनीच्या फॉर्मची जशी चर्चा रंगत आहे तशीच त्याच्या बाबतीत अजून एक चर्चा रंगत आहे कि धोनी प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटवर वेगवेगळे लोगो का लावत आहे.
बांगलादेशविरुद्ध धोनीने वेगळा लोगो आपल्या बॅटवर वापरला होता तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने वेगळ्या रंगाच्या जर्सीसोबतच आपल्या बॅटवरदेखील वेगळा लोगो वापरला होता आणि ह्या वेगवेगळ्या लोगो वापरण्याचे कारण जर तुम्हाला समजले तर तुमचा धोनीबद्दलचा आदर अजूनच वाढेल. धोनीचे मॅनेजर अरुण पांडे ह्यांनी ह्याबाबतचे कारण सांगताना हा खुलासा केला कि माही प्रत्येक सामन्यात वेगवेगळे लोगो वापरून आपल्या प्रयोजकांचे आभार मानत आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत व ह्या प्रत्येक चढ -उतारांमध्ये ज्या प्रायोजकांनी साथ दिली त्यांचे आभार धोनीने अश्या अनोख्या स्टाईलने व्यक्त केले आहेत.
धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वात महत्वाचा वाटा आहे तो vampire ह्या कंपनीचा. हि कंपनी BAS ह्या लोगोअंतर्गत क्रिकेट बॅट्स बनवते. धोनीच्या संघर्षाच्या काळात धोनीला ह्या कंपनीने खूप सहकार्य केले. त्याबद्दल आभार मानण्यासाठी धोनीने हि अनोखी पद्धत वापरली आहे. केवळ BAS नव्हे तर त्याने आपल्या अनेक प्रयोजकांचे ह्याच पद्धतीने आभार मानले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्यासाठी धोनी कोणत्याही प्रयोजकांकडून एक रुपयाही मानधन घेत नाही. हि माहिती अरुण पांडे ह्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीला दिली आहे.
धोनीच्या ह्या अनोख्या आभाराविषयी आनंद व्यक्त करतांना vampire कंपनीचे मालक पुष्प कोहलींनी धोनीचे कौतुक केले व ह्यातून “धोनी किती महान आहे हे दिसून येते” असे उद्गार काढले आहेत. धोनीबद्दलची हि बाब माहित झाल्यावर तुम्हाला धोनीबद्दल आणखीन जास्तच आदर वाटणार हे नक्कीच