इंग्लंच्या नेटवेस्टमध्ये मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेलं शतक, टी-20 वर्ल्ड कप 2007 च्या चॅम्पियन, 2011 आयसीसी वर्ल्ड कपचा मालिकावीर अश्या अनेक अफलातून खेळीने युवराज कायमच भारतीयांच्या मनात राहील.
अखेर तब्बल १८ वर्षांनी युवराज सिंग नावाच्या वादळाची क्रिकेट जगतामधून निवृत्ती झाली. या निर्णयाची चुणूक प्रसार माध्यमांना दुपारीच लागली होती जेव्हा युवराज सिंगने अचानक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यानंतर मीडिया मध्ये ‘सिक्सर किंग’च्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा रंगू लागली. यावेळी युवराज सिंग कमालीचा भावुक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाले त्याने हा काळ त्याच्यासाठी कमालीचा कठीण आणि महत्वाचा असल्याचे सांगितले.
‘सिक्सर किंग’ युवराज सिंगच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्ती नंतर सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देणाऱ्या मेसेजचा अक्षरशः पूर आला आहे, अनेक लोक युवराज सिंगच्या अफलातून आणि धडाकेबाज खेळाची आठवण काढत आहेत, तसेच त्याच्या जुन्या खेळीची विडिओ देखील शेअर करत आहेत. ‘सिक्सर किंग’च्या अश्याच वनडे क्रिकेटमधील अफलातून खेळी वाचा लईभारी वर.
2002 मध्ये गोऱ्यांच्या देशात म्हणजेच इंग्लंडमध्ये नेटवेस्ट सीरिजमध्ये युवराज सिंगने तुफान खेळी केली होती. यावेळी युवराजने 63 चेंडूत 69 धावांची अविस्मरणीय खेळी मोहम्मद कैफच्या सोबतीने केली होती.
याच इंग्लंडमध्ये नेटवेस्ट सीरिज मधील खेळात मोहम्मद कैफच्या सोबतीने युवराज सिंगने 121 धावांची भागिदारी रचली होती आणि 325 धावांचं लक्ष पार करून इंग्लंडला पराभूत केले होते.
आपल्याला हा सामना आजही आठवत असेल कारण याच सामन्यात भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने आपला शर्ट काढून आनंदोत्सव साजरा केला होता.
टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात युवराज सिंगचा मोठा वाटा आहे. याच टी-20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरोधात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारून युवराजने अनोखा विक्रम केला होता. यानंतरच त्याला ‘सिक्सर किंग’ म्हणून लोक ओळखू लागले.
2011 आयसीसी वर्ल्ड कपचा खरा विजेता हा युवराज सिंगचा होता. खेळ चालू असताना रक्ताच्या उलट्या झाल्यानंतरही युवराजने माघार घेतली नाही आणि लढत राहिला. 2011 आयसीसी वर्ल्ड कपचा तो मालिकावीर ठरला.
इंग्लंच्या नेटवेस्टमध्ये मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेलं शतक, टी-20 वर्ल्ड कप 2007 च्या चॅम्पियन, 2011 आयसीसी वर्ल्ड कपचा मालिकावीर अश्या अनेक अफलातून खेळीने युवराज कायमच भारतीयांच्या मनात राहील. भारतीय क्रिकेटच्या दिलेल्या योगदानासाठी आम्ही त्याचे मनापासून आभारी आहोत. त्याच्या नव्या इनींगसाठी “लईभारी” शुभेच्छा.
ये भावड्या हे बी वाच –