अमित शहा आता टिकटॉक वरही बादशाह

tiktok, amit shah, viral video, kashmir, article 370, parliment, अमित शहा, बादशाह

टिकटॉक कोणाला माहित नसेल असा कोणीही सापडणार नाही. स्वयंघोषित नट-नट्यांनी तर टिकटॉकवर अगदी धुमाकूळ घातलाय. पार कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या पासून तर हास्य कलाकार भाऊ कदम यांच्यापर्यंत कोणत्याही राजकीय, सामाजिक, साहित्यिक लोकांची डबिंग करून अगदी त्याचा धुव्वा उडवलाय.

आताच भारत सरकारने काश्मीरला विशेषधिकार देणार कलम ३७० हटवलं त्यावर लोकसभेत बरेच वादविवाद झाले. यावेळी वादविवाद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षाला उद्देशून एक वाक्य उच्चारलं होतं. जर तुम्ही काश्मीर ला भारताचा हिस्सा मानत नसला तरीही तो आम्ही मानतो अन काश्मीर मिळविण्यासाठी आम्ही जीवही द्यायला तयार आहोत. झालं टिकटॉक वाल्याची देशभक्ती उफाळून आली अन काहीतरी वेगळं करायला मिळाल, लगेच त्यावर वेगवेगळे मिम्स व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आले.

अमित शहा यांच्या वाक्यावर बनवलेला मिम्स व्हिडीओ पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here