पाकिस्तानला आता चहा बिस्किटचाही खर्च परवडेना, घेतला हा निर्णय

1366
pakistan, imran khan, economy, india, war

भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानला चहा बिस्किटांचा खर्चही परवडेनासा झाला आहे. शासकीय बैठकांदरम्यान दिली जाणारी चहा बिस्किटे सुद्धा आता बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त कानी आले आहे. भारताने कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. ह्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर अजूनच विपरीत परिणाम झाला.

बैठकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या चहा बिस्किटांवर बंदी आणण्याइतपत पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. तासंतास उभे राहून पार पडल्या जाणाऱ्या अनेक मीटिंग्सच्या दरम्यान अनेक मधुमेही पीडित अधिकाऱ्यांना त्रास जाणवू लागला आहे. कारण मधुमेह असलेल्या व्यक्तींना ठराविक अंतराने काही ना काही खावे लागते, पण चहा बिस्किटे बंद झाल्याने ह्या अधिकाऱ्यांना मीटिंग्समध्ये सहभागी होणे कठीण बनले आहे.

pakistan, imran khan, economy, india, war
(Source – thenews.com.pk)

पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने प्रतितोळा ८७ हजार रुपयावर पोहोचले आहे तर रोजच्या जेवणात आवश्यक असणारे टमाटे पाकिस्तानात प्रतिकिलो ३०० रुपये ह्या भावाने मिळत आहेत. भारताशी व्यापार बंद करून पाकिस्तानने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानवर अनुक्रमे 6.82 अब्ज डॅालर, 4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलर इतके कर्ज झाले होते त्यात आता २०१८-२०१९ मध्ये २.२९ अब्ज डॉलरची भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here