महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागणार असून पक्षश्रेठींच्या भेटी घेण्याची इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या लय भारीच्या टीमने पिंपरी-चिंचवडच्या पिंपरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांतुन नेतृत्व बदल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.इथले विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर नाराज असणारा मतदार वर्ग, विकासाच्या दृष्टीने मतदारसंघात असलेलं मागासलेपण यामुळे नव्या चेहऱ्याला संधी मिळावी अशी मागणी होत आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. विद्यमान आमदार चाबुकस्वार हे शिवसेनेचे आहेत. विद्यमान शिवसेनेचा आमदार असला तरीही मतदारसंघात भाजप-आरपीआय आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे प्राबल्य तगडे आहे. तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली असून, यात आघाडीवर आहेत भाजपचे अमित गोरखे. अमित गोरखे हे सामान्य परिस्थितीतून आले असल्यामुळे त्यांना स्थानिक सामान्य नागरिकांची जाणीव आहे असा नागरिकांचा सूर होता.
अमित गोरखे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून ते भाजपाचे निष्ठावंत म्हणून हि ओळखले जातात. मागच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली असून त्यामार्फत त्यांनी कामाचा धडाका लावून जनसामान्याचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पिंपरी विधानसभा परिसर पिंजून काढला आहे. पिंपरीच्या प्रलंबित समस्या, झोपटपट्टी पुनर्वसन या विषयावर विविध पातळीवर काम करून ते लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रत्यत्न तसेच तरुण वर्गात असणारी त्यांच्याविषयीची क्रेझ यामुळे जनमानसात गोरखे यांची एक चांगली प्रतिमा बनत असून मतदार राजा त्यांच्याकडे आकर्षित होत आहे.
सीमा सावळे गैरहजर आणि गोरखेंचा रस्ता मोकळा
पिंपरी मतदार संघातून भाजपकडून अमित गोरखे हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. काल भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, पण त्यावेळी पिंपरी विधानसभेच्या तिकिटासाठी मुख्य दावेदार समजल्या जाणाऱ्या सीमा सावळे ह्या गैरहजर असल्यामुळे अमित गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.