माकडाच्या हाती कोलीत…!

बर्याच दिवसांपासून मला वेब सिरीज या माध्यमाबद्दल बोलायचं होतं. सेन्सॉर बोर्डमुळे आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा येतात. आम्हांला पाहिजे तसं व्यक्त होता येत नाही. असा कांगावा करणार्यांसाठी, ह्याला पर्याय म्हणून आणि काळाजी गरज (तंत्रज्ञानातील बदलातून) म्हणून वेब सिरीज हे माध्यम उदयाला आलं आणि झपाट्याने वाढायला लागलं.

ह्यात मोठमोठे प्रॉडक्शन हाऊस उतरलेत. उत्तमोत्तम विषय बाहेर आले. उदा. लैला, सॅक्रेड गेम्स सारखी सिरीज. परंतु एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसेच तोटेही असतातच. तसंचं काहीसं या माध्यमातही घडायला लागलं. सेक्स सीन्स, वॉयलन्स हे कथेची गरज म्हणून नाही तर प्रसिद्धीसाठी वापरले जाऊ लागले. गरज नसताना ते दाखवले जातायत. उदा. मिर्झापूर, सिटी ऑफ ड्रिम्स. तसेच काही ॲप्स आहेत उल्लू, अल्ट बालाजी ह्यांनी तर ह्याची उच्चतम पातळी गाठली. एकंदरीत काय तर माकडाच्या हाती कोलीत.

(Source – DailyMotion)

परंतु ह्या सगळ्यामधे मला एकच वाटतं ह्या सिरीज मधून आमच्यातला माणूस घालवून टाकलाय. पबजीतल्या गेमसारखे सगळे पात्र आम्हांला वाटतात. त्यात माणूसच दिसत नाही. कथेमधे माणूस आहे, असा फक्त आभास उभा केला जातो. आणि किती सारे घटनाक्रम. कथेला वेग देण्याच्या नादात फक्त एकावर एक इवेंट्स रचले जातात. पीक पॉईंटस, बॅंग्स, हाय पॉईंट्स, बॅंग…बॅंग…बॅंग… लाऊड म्युझिक. बास… अरे कुठेही पळून जाणार नाहीये हा प्रेक्षक. तो टेलिव्हिजनला कंटाळूनच इकडे आलाय, किंवा विरंगुळा म्हणून. किमान त्यांना इथे तिच मालिका डबल ट्रीपल स्पीडने दाखवली जातेय. त्यात ती पात्र खरंच तसे वागतील का ? ह्याचा विचारच केला जात नाही.

सीन ऑफ बीट घटवण्याच्या नादात कुठल्याही लोकेशनवर दाखवतात ? लॉजिकचं नसतं. अपवाद एखादा असतो पण सगळंचं अपवादात्मक वाटतं. कलाकृती ह्या समाजावर नकळत परिणाम करत असतात. कॅथार्सिसची प्रोसेस चालू असते. त्यामुळे कलाकृती घडवताना समाजाचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. हा विचार हे लोक करतायत की नाही हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं मी भारतात तयार होत असलेल्या वेब सिरीजबद्दल बोलतोय. बाहेरच्या मी पाहतोय. त्याबद्दल नंतर बोलेन. ह्या सगळ्यात काही सिरीज आहेत ज्या खरंचं चांगल्या आहेत. पाहण्यासारख्या आहेत. जसं चांगली पुस्तके ही वाचल्याशिवाय कळत नाही तसंचं काहीसं या बाबतीतही आहे. तरीही उदा. लैला, पर्मनंट रूममेट्स, मेन्स वर्ल्ड, गुल्लक, कोटा फॅक्टरी, इ. अशा काहीआहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here