तब्बल ७० वर्षांपासून काश्मीरच्या नावावर जगभरात राजकारण करणाऱ्या आणि सीमेवर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारताने इतिहासात पहिल्यांदाच जोर का झटका दिला आहे, या झटक्याची तीव्रता इतकी प्रखर आहे कि ‘काय करू आणि काय नको असं पाकिस्तानला झालं आहे.’ त्यामुळे उगाचच भारताला आम्ही जोरदार उत्तर देत असल्याचं आव आणत पाक सरकार अगदी हास्यस्पद निर्णय घेत आहे.
सगळ्यात आधी भारतासोबत राजनैतिक संबंध कमी करण्याचा निर्णय, भारताच्या उच्चायुक्ताना परत पाठवण्याचा निर्णय त्यानंतर समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय पाकने घेतला आहे. आणि सगळ्यात हास्यास्पद निर्णय घेताला आहे तो पाकिस्तानमध्ये बॉलीवूड ला घालण्यात आलेली बंदी. मुळात पाकची फिल्म इंडस्ट्रीच चालते भारताच्या जीवावर आणि त्यात बंदी घालून स्वतःतच्या पायावर कुर्हाडी मारण्याचा प्रकार पाकने केला आहे.
आता पाकने बॉलीवूड किंवा भारतीय कार्यक्रमांना बंदी घातल्यामुळे कोणत्याही पाक व्यक्तीला बॉलीवूड मध्ये काम मिळण्याचं अवघड झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या अघोषित बंदीमुळे अनेक पाक कलाकार कंगाल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घालण्याचा निणर्य अधिकृत भारताच्या सरकारचा नाही तर फिल्म असोशिअनने घेतला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, खरंच मोदी सरकारने अधिकृतपने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यास काय होईल? माहितीनुसार काही कलाकार आहेत जे फक्त बॉलीवूड वर अवलंबून आहेत आई बाॅलिवूडशिवाय कंगाल होतील.
१. आतिफ अस्लम
गायक म्हणून सगळ्यात जास्त ओळख बॉलीवूड मधून मिळवली आहे. सगळ्यात जास्त काम हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून मिळते त्यामुळे बंदी घातलीच तर याला कंगाल होण्याशिवाय पर्याय नाही. आतिफ असलमला ओळखत नाही किंवा त्याचे गाणे ऐकले नाही असा व्यक्ती सापडणं अवघड आहे. तरुणाईत अतिफचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून ‘पेहली नज़र मे’ हे त्याचे गाणे बरेच गाजले होते. आतिफ असलमचा जन्म एका पंजाबी मुस्लिम परिवारात वजिराबाद इथे झालेला. अतिफने कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली आहे.
२. अली जाफर
पार्श्वगायन करण्यासोबतच अभिनेता म्हणून ओळख आहे, सगळ्यात जास्त काम बॉलीवूडच्या माध्यमातून त्यामुळे अचानक घातलेल्या बंदीमुळे याना नक्कीच गोष्टी अवघड होतील. अली जाफरचा जन्म मुस्लिम पंजाबी परिवारात लाहोर इथे झाला होता. अली जाफर केवळ एक अभिनेता नसून तो उत्तम गायक, कम्पोजर, मॉडेल, पेंटर तसेच प्रोड्युसर सुद्धा आहे. आपल्या करिअरची सुरवात अली जाफरने पाकिस्तान टीव्हीवर केली होती. पुढे जाऊन त्याने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपला जम बसवला. बॉलिवूडमधील त्याचा पहिला चित्रपट ‘तेरे बिन लादेन’ साठी अलीला फिल्मफेअर बेस्ट डेबुटंट ऍक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला होता.
३. राहत फतेह अली खान
बंदी नंतर सगळ्यात जास्त फटका बसणारे व्यक्तिमत्व. पाक पेक्षा भारतात जास्त चाहते आणि कमी सुद्धा. राहत फतेह अली खान हे नाव काही भारतातल्या लोकांसाठी नवे नाही. मोठमोठ्या स्टार्ससाठी राहत फतेह अली खान यांनी गायन केलेलं आहे. राहत यांचा जन्म एका मुस्लिम पंजाबी परिवारात झाला होता. अनेक पिढ्यांपासून त्यांच्या परिवाराला संगीताचा वारसा लाभला आहे. दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान हे राहत यांचे काका आहे.
४. विना मलिक
तशी यशस्वी अभिनेत्री नाहीय पण जे काम मिळत आहे ते बॉलीवूडच्या जीवावर, त्यामुळे करिअरला स्टॉप मिळण्याशिवाय पर्याय नाही. विना मलिक एक मॉडेल, अभिनेत्री तसेच टीव्ही होस्ट आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. विना मालिकचा जन्म पाकिस्तानातील रावळपिंडी या शहरात झाला आहे. अनेक वादग्रस्त गोष्टींमध्ये विनाचे नाव घेतले जाते. विना मलिक भारतीय बिग बॉसमध्ये सुद्धा दिसली होती. शेवटच्या ६ स्पर्धकांपर्यंत विना बिग बॉसमध्ये होती.
५. मारवरा हुकैननं
सनम तेरी कसम या सिनेमातून ओळख निर्माण केलेली मारवरा हुकैननं वर बंदी नंतर पण मोठा परिणाम होईल. यामुळे ती फक्त पाकीस्तानी मालिकेपुरती राहील.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.