डोंगरावर तब्बल ३५ लाख लीटर पाण्याचा साठा तयार करणारं गाव

water conservaation, watergreed, cm maharashtra, 35 lakh, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत,सिंचन योजना

सरकारची मदत आणि तुमची कल्पकता ह्याचा योग्य मेळ साधला तर यश मिळतेच, ह्याचे उदाहरण म्हणजे संगमेश्वर गावातील वरची वाडी. कारण इथे डोंगर माथ्यावरच तळे खोदून तेथे ३५ लाख लीटर पाण्याचा साठा तयार करण्यात आला. नैसर्गिक उताराचा फायदा घेत वरची वाडीतील सुमारे २० एकर जमीन ओलीताखाली आणण्याची किमया साधणाऱ्या नवजीवन ग्रामविकास गटाची हि यशोगाथा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला नवीन दिशा दाखवणारी आहे

आधुनिक पद्धतीने आणि कल्पकतेने शेती केली तर ती किती फायद्याची ठरते हे दाखवून दिले आहे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावच्या शेतकऱ्यांनी. सरकारने शेतकऱ्यांना शेती करतांना कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागेल व त्यांचे उत्पादनही वाढेल ह्यासाठी अनेक योजना राबवल्या. त्यातीलच एक योजना म्हणजे ‘मागेल त्याला शेततळे योजना’. मागेल त्याला शेततळे योजनेमुळे पावसाचे पाणी वाहून न जाता ते तळ्यांमध्ये साठवण्यात येऊ लागले व त्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ लागला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेची फलश्रुती सांगणारी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजवाडी गावातील हि यशोगाथा तुम्ही नक्कीच वाचून व समजून घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हीसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी हे एक गाव. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्यामुळे शेती विषयक अनेक विविध अभिनव उपक्रम गेले दहा वर्षांपासून इथे राबविले जात आहेत. ह्या विविध उपक्रमांमुळे गावातील शेतकरी व महिलांच्या हाताला काम मिळत आहे. गावाजवळच नदी वाहत असल्यामुळे दोन सिंचन योजनांच्या साहाय्याने नदीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो. पण ह्याच गावातील दुसऱ्या टोकाला वरची वाडी नावाचा एक भाग आहे, जिथे नदीचे हे पाणी पोहोचवणे शक्य होत नव्हते.

water conservaation, watergreed, cm maharashtra, 35 lakh, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत,सिंचन योजना
(source-sakaal)

त्या भागापर्यंत पाणी न पोहोचू शकल्यामुळे उन्हाळी शेती करणे अशक्य बनले होते. ह्यावर काय उपाय करावा ह्यासाठी गावात एक बैठक घेण्यात आली व बैठकीत असे ठरले कि जिथे नदीचे पाणी पोहोचवणे शक्य नाही त्या भागात पावसाचे पाणी साठवण्यासाठी तळे खोदायचे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मिळणारी सर्व मदत ह्याही योजनेला मिळणार होती.

यात एक मुख्य अडचण होती ती म्हणजे जागेची. तळे खोदण्यासाठी मोठ्या स्वरूपात सपाट जमीन लागणार होती आणि ती आसपास नव्हती. शेवटी श्री कामत यांच्या डोंगरावर हे शेततळे खोदण्याचे ठरले व त्यासाठी कामतांनी डोंगरावरील आपली जमीन देण्याचे ठरवले. कामत यांच्या ह्या जमिनीमुळे वरच्या वाडीतील शेतीला लागणाऱ्या पाण्याची सोय होणार होती. ह्या प्रकल्पासाठी नवजीवन ग्रामविकास गट स्थापन करण्यात आला.

अध्यक्ष सुरेश बाईत आणि सचिव जयराम भडवलकर यांच्यासह तब्बल २३ जण एकत्र आले. गावातील २ सिंचन योजनांना अर्थसहाय्य पुरवणाऱ्या पुण्याच्या बासरी फाउंडेशनने या प्रकल्पालाही अर्थसहाय्य पुरवण्याचे ठरवले. बासरी फाउंडेशन, नवजीवन ग्रामविकास गट, श्री कामत व राज्य शासन ह्यांनी परस्पर सहकार्याने कामतांच्या डोंगरावरील २ एकर सपाट जागेवर ३० बाय ३० मीटर व्यासाचा आणि ३ मीटर खोल असा खड्डा खणला. हे काम २०१६च्या मे – जून महिन्यात करण्यात आले. पण लगेचच ह्या तळ्याचा प्रत्यक्ष वापर न करता वर्षभर त्याची चाचणी घेण्यात आली. सर्व काम व्यवस्थित पार पडले आहे असे निदर्शनास आल्यानंतर मे २०१७ मध्ये ह्या खड्ड्यामध्ये ५०० मायक्रॉन जाडीचे प्लास्टीकचे आवरण घालण्यात आले.

water conservaation, watergreed, cm maharashtra, 35 lakh, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत,सिंचन योजना
(source-indiafianacial)

प्लास्टिकचे आवरण घातल्यामुळे पाणी कमी प्रमाणात जमिनीत मुरू लागले व जास्त साठवण होऊ लागली. २०१७ साली अल्प प्रमाणात पाऊस पडून सुद्धा हे तळे पूर्ण भरले व ३५ लाख लिटर इतका पाणीसाठा झाला. जिथे नदीचे पाणी पोहोचू शकत नाही अश्या भागात हे पाणी पाइपलाइनद्वारे पोहोचवण्यात आले. हे तळे ४००-५०० मीटर उंचीच्या डोंगरावरील सपाट जागेत खोदण्यात आले होते त्यामुळे हे पाणी गावात पोहोचवण्यासाठी मिळालेल्या नैसर्गिक उताराचा वापर करण्यात आला. अश्याप्रकारे २३ लाभार्थ्यांच्या २० एकर शेतामध्ये हे पाणी खेळवण्यात आले. शेतीसह आंबा व काजूच्या बागा जगवण्यासाठी सुद्धा ह्या पाण्याचा उपयोग होत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे व राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेमुळे आता गावातील वरची वाडी भागात पिके पुन्हा डोलू लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here