बॉलिवूडमध्ये सध्या खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची चलती आहे. त्याच्या केसरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच मागील काही वर्षांमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिल्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास अनेक दिग्दर्शक इच्छुक आहेत. लवकरच त्याचा मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे चाहते ह्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ह्याशिवाय अक्षयचे आगामी प्रोजेक्ट्स आहेत सूर्यवंशी, लक्ष्मीबॉम्ब, बच्चन पांडे, गुड न्यूज आणि हाउसफुल सिरींजमधील चौथा भाग हाउसफुल ४. सध्या अक्षय ह्या चित्रपटांच्या कामात व्यस्त असतांना त्याच्याकडे अजून एक नवीन चित्रपट चालून आला आहे. ‘स्पेशल २६’ ह्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आपला आगामी चित्रपट अक्षय कुमारसोबत करणार असल्याची बातमी कानी आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल ह्यांची व्यक्तिरेखा अक्षय कुमार साकारणार आहे असे कळते. अजूनतरी ह्या बातमीला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळाला नसला तरीही नीरज पांडे ह्यांची पसंती अक्षय कुमारलाच असेल असे वाटते कारण ह्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
सध्या अक्षय व नीरज पांडे आपापल्या अन्य चित्रपटांच्या कामात व्यस्त असून ते पूर्ण झाल्यावर हे दोघे अजित डोवल ह्यांच्यावर आधारित आगामी चित्रपटाचे काम सुरु करतील अशी शक्यता आहे. ‘चाणक्य’ हा नीरज पांडेंचा आगामी सिनेमा असून नीरज सध्या ह्याच चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.