अपमानाचा बदला म्हणून एका शेतकऱ्याने थेट लॅम्बॉरगीणीच बनवली

lamborghini car, ferruccio lamborghini, lamborghini logo png, lamborghini logo hd, lamborghini tractor, who owns ferrari, lamborghini founder, lamborghini owner, lamborghini 350 gtv, ferruccio lamborghini facts, lamborghini history timeline, ferruccio lamborghini story, ferruccio lamborghini biography, lamborghini history tractor, ferrari vs lamborghini, lamborghini biography, lamborghini story in marathi, फेरुसिओ लॅम्बॉरगीनी

आज आपण तरुणांच्या आवडीच्या विषयावर बोलणार आहोत. रेसिंग कार किंवा लक्झरी गाड्या कुणाला आवडत नाहीत हो..? कित्येकांच तर ते स्वप्न असतं. भारतातील कोणत्याही कोपर्यात बसुन या आलिशान गाड्यांचे फोटो बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हि सुप्त इच्छा असतेच कि कदाचीत अशी गाडी माझी असती तर..? किंवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीच स्वप्न असतं कि आयुष्य एकदातरी ह्या आलिशान गाड्यांमधुन प्रवास करावा. पण सामान्य माणसांसाठी हे फक्त स्वप्नच…

ह्या गाड्या विकल्या जातात ते ह्यांच्या ब्रॅन्ड मुळे आणि आपल्या कंपनीच्या नावाचं ब्रँड करण्यासाठी त्याच्या मालकाने अनेक कष्ट केलेले असतात. भारतातील सामान्य तरूणांसाठी या गाड्या त्यांच्या होणार नसल्या तरी त्यांच्या यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरतील. त्यामुळे आपण आज अशाच एका जगप्रसिद्ध लक्झरी मोटार कंपनीचे मालक व त्यांची यशोगाथा आपण पाहणार आहोत.

lamborghini car, ferruccio lamborghini, lamborghini logo png, lamborghini logo hd, lamborghini tractor, who owns ferrari, lamborghini founder, lamborghini owner, lamborghini 350 gtv, ferruccio lamborghini facts, lamborghini history timeline, ferruccio lamborghini story, ferruccio lamborghini biography, lamborghini history tractor, ferrari vs lamborghini, lamborghini biography, lamborghini story in marathi, फेरुसिओ लॅम्बॉरगीनी
Ferruccio Lamborghini, lamborghini founder, lamborghini owner (Source – LamboCARS)

लॅम्बोर्गिनी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांतील एक स्वप्न, कित्येकांची इच्छा आणि जगातील सर्वात महाग आणि आलिशान गाडी हे चित्र डोळ्यासमोर येत. पण या गाडीच्या मागे कित्येक वर्षांचा संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला हे हि बघायचं आहे कि आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत जीथे असते तिथे काहीही शक्य आहे.

फेरुसिओ लॅम्बॉरगीनी यांचा जन्म 28 एप्रिल 1916 मध्ये इटली येथे झाला. फेरुसिओ यांचं कुटूंब म्हणजे सामान्य शेतकरी वर्गातलं. पण फेरुसिओ यांनी शेतीत जुन्या पारंपारीक पद्धतींचा वापर न करता शेतीत नवीन संकल्पना रूजवल्या व आपली शेती फुलवली. त्यांना मेकॅनिकल कामांचा सुध्दा खुप छंद होता. त्यांना मशिनरींबद्दल प्रचंड आकर्षण वाटे. नंतरच्या काळात जगात दुसऱ्या महायुध्दाचं वादळ उठलं आणि फॅसिओ सुध्दा त्या मध्ये सामिल झाले. दुसऱ्या महायुध्दात त्यांनी वायुसेनेचे काम पाहिले. युध्दातुन आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतीसाठी जून्या लष्करी यंत्रांचा उपयोग करून त्यातुन नवीन ट्रॅक्टर बनवून टाकला.

lamborghini car, ferruccio lamborghini, lamborghini logo png, lamborghini logo hd, lamborghini tractor, who owns ferrari, lamborghini founder, lamborghini owner, lamborghini 350 gtv, ferruccio lamborghini facts, lamborghini history timeline, ferruccio lamborghini story, ferruccio lamborghini biography, lamborghini history tractor, ferrari vs lamborghini, lamborghini biography, lamborghini story in marathi, फेरुसिओ लॅम्बॉरगीनी
Lamborghini Tractors, lamborghini history timeline (Source – MUV Marketplace)

याच ट्रॅक्टरच्या व्यवसायातुन त्यांनी उद्योग जगतात पहिले पाऊल टाकले. त्यांच्या या उद्योगाला भरपुर प्रतिसाद मिळाला व ते श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले. त्यांना महागड्या गाड्या चालवण्याचा नाद होता. त्यावेळी फरारी हि कंपनी रेसिंग गाड्यांच्या उद्योगावर आपले पाय रोवून होती. फेरुसिओ लॅम्बोर्गिनी यांच्याकडे सुध्दा फरारी व इतर गाड्या होत्या. पण मॅकेनिकलचे ज्ञान असल्यामुळे फरारी चालवताना त्यांना तिच्यात काही कमतरता दिसुन आल्या व काही बदल सुचले. त्यांनी हे बदल फरारीचे मालक इंजिओ फरारी यांना सांगण्याचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे हे बदल त्यांनी फरारींची भेट घेऊन त्यांना सांगितले. पण फरारी यांनी त्यांचे हे म्हणणे ऐकून न घेता “मला एका ट्रॅक्टर वाल्याने शिकवायची गरज नाही..!”, असे उद्धट उत्तर दिले. झालेला अपमान घेऊन फॅ फेरुसिओ घरी परतले व त्यांनी आपल्या झालेल्या अपमानाचा बदला म्हणून नविन गाडी तयार करण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक गाडीतील योग्य ते घेऊन आपली एक नवीन रेसिंग कार तयार केली व 1964 मध्ये ती एका मोटार प्रदर्शनात दाखवण्यात आली. तीचे नाव त्यांनी Lamborghini 350 असे ठेवले. त्यांच्या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला नंतर त्यांनी या मॉडेलच नाव बदलून जीटी 350 असं ठेवलं. त्यानंतर त्यांचा मोटार निर्मिती क्षेत्रातला प्रवास सुरू झाला आणि तो आजतागायत चालु आहे.

lamborghini car, ferruccio lamborghini, lamborghini logo png, lamborghini logo hd, lamborghini tractor, who owns ferrari, lamborghini founder, lamborghini owner, lamborghini 350 gtv, ferruccio lamborghini facts, lamborghini history timeline, ferruccio lamborghini story, ferruccio lamborghini biography, lamborghini history tractor, ferrari vs lamborghini, lamborghini biography, lamborghini story in marathi, फेरुसिओ लॅम्बॉरगीनी
Lamborghini car (Source – Motor1.com)

लॅम्बोर्गिनीच्या लोगोची कथा

लॅम्बोर्गिनी यांनी आपल्या कंपनीचा लोगो हा फाईटींग बुलचा ठेवला कारण फेरुसिओ यांच्या राशीचे ते चिन्ह आहे. त्यांच्या कंपनीच्या बहूतांश गाड्यांची नाव हि फाईटींग बुलशीच निगडीत आहेत हे विशेष. आपल्या मेहनतीतुन व जिद्दीतुन हि कंपनी उभी करणाऱ्या फेरुसिओ लॅम्बोर्गिनी यांचं निधन वयाच्या 76 व्या वर्षी इटली मध्ये झालं. त्यांची हि यशोगाथा नवउद्योजकांसाठी व आजच्या तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावी लागेल…

lamborghini car, ferruccio lamborghini, lamborghini logo png, lamborghini logo hd, lamborghini tractor, who owns ferrari, lamborghini founder, lamborghini owner, lamborghini 350 gtv, ferruccio lamborghini facts, lamborghini history timeline, ferruccio lamborghini story, ferruccio lamborghini biography, lamborghini history tractor, ferrari vs lamborghini, lamborghini biography, lamborghini story in marathi, फेरुसिओ लॅम्बॉरगीनी
lamborghini logo hd (Source – fineartamerica.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here