छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले

14010
mahatma jyotiba phule in marathi, short note on jyotiba phule, mahatma jyotiba phule information, jyotiba phule, mahatma jyotiba phule yanchi mahiti, jyotiba phule wife, savitribai phule, mahatma phule in marathi, jyotiba phule images, jyotiba phule in marathi, satyashodhak samaj, savitribai phule information in marathi, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, jyotiba phule and shivaji maharaj

“त्या लग्नाच्या वरातीत झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आणि एका महात्म्याचा जन्म झाला”

आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्याला भारतीय समाज सुधारणा चळवळीतील शुक्रतारा असे म्हणता येईल. कारण त्यांनी आपल्या ज्ञानतेजाने अनेकांच्या घरात सज्ञानाचा दिवा पेटवला. त्या थोर महापुरूषाला त्याच्या नावाला शोभेल अशी पदवी मिळाली ती पदवी म्हणजे “महात्मा”. ज्याने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा फायदा गोरगरीब, दलित आणि स्रीयांना व्हावा यासाठी भारतात त्यांना शिक्षित करण्यासंबंधी पहिले पाऊल टाकले आणि आपल्य जीवनसाथीलाही या समाज सुधारनेच्या कामात आपल्या सोबत जुपलं.

या दापंत्यानी इतिहास रचला. कोण होतं ते दापत्य ? कोण होता तो महात्मा..? तो माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले…! देशातील शैक्षणिक क्रांतीचे जनक आणि स्री शिक्षणाचे उध्दघाते. ज्योतीरावांचं हे काम सोपं नव्हतं. त्यांना प्रचंड हाल आपेष्टा, तिरस्कार व बदनामीला सामोरे जावे लागले. पण ते आपल्या निश्चयापासुन हरले नाहीत. त्यांनी आपला कारवा असाच पुढे चालु ठेवला आणि अनिष्ट रूढी परंपरांना आपल्या रथाखाली चिरडले.

mahatma jyotiba phule in marathi, short note on jyotiba phule, mahatma jyotiba phule information, jyotiba phule, mahatma jyotiba phule yanchi mahiti, jyotiba phule wife, savitribai phule, mahatma phule in marathi, jyotiba phule images, jyotiba phule in marathi, satyashodhak samaj, savitribai phule information in marathi, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, jyotiba phule and shivaji maharaj
(Source – Velivada)

ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. जोतिबा लहानपणापासूनच अत्यंत हुशार. त्यांचे गुरू वस्ताद लहूजी साळवे हे त्यांना दांडपट्टा, तलवार बाजी इत्यादी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देत असतं. त्याच बरोबर त्यांच्या तालमीत स्वातंत्र्याच्या विषयावर चर्चा व्हायची. त्यातूनच त्याच्यात देश प्रेमाची उर्मी जागृत झाली. जोतिबा शाळेत सुध्दा अत्यंत हुशार होते. पण सामाजिक क्रांती बद्दल त्यांना अजून तेवढी माहीती नव्हती पण एका घटनेने जोतिबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ती घटना म्हणजे त्यांच्या एका मित्राच्या लग्नात झालेला अपमान.

जोतिबा आपल्या अत्यंत जवळच्या मित्राच्या लग्नात गेले होते. तो मित्र उच्चवर्णिय असल्यामुळे सर्व परिवार जुण्या व कर्मठ विचारांचा होता. जोतिबा आपल्या मित्रांसोबत त्याच्या वराती मध्ये सामिल झाले पण चालता चालता त्यांचा धक्का एका पाहुण्याला लागला. एवढीच काय ती बाब, पण त्या काळचा कर्मठ व जातीअंध समाज हे सहन करू शकला नाही. त्या उच्चवर्णिय लोकांनी जोतींबांचा अपमान करूण त्यांना वरातीच्या बाहेर ढकलुन दिलं.

हि अस्पृश्यतीची ठिणगी जोतिबांच्या मनात घर करून गेली. त्यांनी विचार करायला सुरूवात केला की आपण तर वैश्य माळी समाजातील असुन सुध्दा आपल्याला अशी तुच्छ वागणूक मिळत असेल तर समाजातील सर्वात खालच्या वर्गातील माणसाचे काय हाल होत असतील. त्यांना ती कल्पना सुद्धा करवत नव्हती. त्या घटनेपासुन त्यांनी जातीअंताचा व समाजसुधारनेचा ध्यास घेतला व आयुष्यभर त्यांनी स्वतःला या कामात गुंतवून घेतले.

भारतातील पहिली मुलींची शाळा

नंतरच्या काळात जोतिबांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. त्यांनी बालवयात लग्न झालेल्या सावित्रीला शिकवायला सुरूवात केली. सावित्रीबाईंना शिकवल्या नंतर त्यांनी स्री शिक्षणाचा ध्यास घेतला आणि एका वडाच्या झाडाखाली मुलींचा पहिला वर्ग भरवला. नंतर जोतिबांच्या एका मित्राच्या मदतीने पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली. सावित्रीबाईं व त्यांची मैत्रीण फातिमा शेख ह्या या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या.

mahatma jyotiba phule in marathi, short note on jyotiba phule, mahatma jyotiba phule information, jyotiba phule, mahatma jyotiba phule yanchi mahiti, jyotiba phule wife, savitribai phule, mahatma phule in marathi, jyotiba phule images, jyotiba phule in marathi, satyashodhak samaj, savitribai phule information in marathi, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, jyotiba phule and shivaji maharaj
Mahatma Jyotirao Phule (Source – Freepressjournal)

जोतिबा आणि सावित्री दोघेही पुण्यातील प्रत्येक घरात जाऊन मुलींच्या शिक्षणाविषयी प्रबोधन करायचे पण मुली यायच्या नाहीत. मग जोतीबांनी शाळेत येणाऱ्या मुलींसाठी खावू वाटायला सुरूवात केली. मग गरीब घरातील मुली खावूच्या आमिशाने शाळेत येऊ लागल्या आणि मुलींची संख्या वाढत गेली. पण त्या काळचा कडवट व कर्मठ ब्राम्हण वर्गाच्या विरोधाचा त्यांना सामना करावा लागला.

जोतिबांच्या आयुष्यातील एक अज्ञात घटना

फुले दाम्पत्य आपल्या सामाजिक कामामुळे पुण्यात प्रसिध्द झाले होते. त्यामुळे गरजू लोक त्यांच्याकडे हक्काने मदत मागायला येत असत. त्यातूनच त्यांनी आपल्या घरासमोरील आडातील पाणी दलितांसाठी खुलं केलं व दलितांच्या मुलांसाठी मोफत शाळा काढल्या. रात्रीची वेळ होती फुले दाम्पत्य हितगूज करत आपल्या घरात बसले होते. तोच एक स्त्री त्यांच्या घराच्या दिशेने धापा टाकत आली. सावित्रीबाई आणि ज्योतीबांनी तीला सावरले व विचारपुस केली असता ती स्री उच्चकुलस्थ ब्राम्हण कुटुंबातील होती पण तीची समस्या ही होती कि ती विधवा असुन गर्भवती राहिली होती आणि आपल्या समाजापासून वाचून ती याच्याकडे मदतीसाठी आली होती.

सावित्रीबाईंनी तीची प्रसूती केली व तिच्या बाळाला स्वतः कडे ठेऊन घेतलं. त्याच मुलाला त्यांनी दत्तक घेऊन आपला वारसदार बनवलं आणि विधवा व अविवाहित तरुणींना झालेल्या मुलांचा सांभाळ करण्याच व्रत घेतला. यामुळे त्यांची पुर्ण शहरात खुप बदनामी झाली. पण जोतिबांचा विचार स्पष्ट होता कि ‘आई वडीलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या नवजात बालकाचा जीव घेऊन का देता. त्याला माझ्या कडे द्या मी त्याचा सांभाळ करतो.’ इतका काळाच्या पुढचा विचार करणारा हा विचारवंत होता.

mahatma jyotiba phule in marathi, short note on jyotiba phule, mahatma jyotiba phule information, jyotiba phule, mahatma jyotiba phule yanchi mahiti, jyotiba phule wife, savitribai phule, mahatma phule in marathi, jyotiba phule images, jyotiba phule in marathi, satyashodhak samaj, savitribai phule information in marathi, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, jyotiba phule and shivaji maharaj
Shivaji Maharaj Samadhi (Source – Quora)

जेव्हा या देशाला छत्रपतींच्या स्वातंत्र प्रेरणेची गरज होती तेव्हा मात्र महाराष्ट्र शिवाजी नावाच्या वादळाला विसरला होता. तेव्हा जोतिबा फुलेंनी रायगडावर भग्नावस्थेतील शिवसमाधी जगासमोर आणुन देशाला स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरणारं शिवाजी महाराज नावाचं अमृत पाजलं. हे जोतिबांचे महाराष्ट्राच्या शिवभक्तांवरील उपकार म्हणावे लागतील. नाहीतर शिवरायांची प्रेरणा घेऊन सशस्त्र क्रांतीच बंड पुकारणारे भगतसिंग सारखे तरूण उठलेच नसते. त्याच क्षणी जोतिबांनी शिवरायांवर आधुनिक युगातला पहिला पोवाडा लिहीला आणि क्रांतीची आग आपल्या शब्दातुन तेवत ठेवली.

जोतिबांनी गुलामगिरी, शेतकर्यांचा असुड, तृतीय रत्न, अपृश्यांच्या व्यथा, शिवाजीराजे भोसलेंचा पोवाडा इत्यादी पुस्तकं लिहीली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजसुधारनेला चालना दिली. अशा या तेजोमय विचारवंत, समाज सुधारक महात्म्याचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पुण्यात झाला. पण हा अवलीया आपल्या विचारांची आग अशीच तेवत ठेऊन गेला ती आजतागयात धगधगते आहे.

6 COMMENTS

 1. जोतिबा फुलेंनी रायगडावर भग्नावस्थेतील शिवसमाधी जगासमोर आणुन देशाला स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरणारं शिवाजी महाराज नावाचं अमृत पाजलं. हे जोतिबांचे महाराष्ट्राच्या शिवभक्तांवरील उपकार म्हणावे लागतील
  याला काही इतिहासिक पुरावा किंवा संधर्म आहेत का , ??

  • Hi raigad varil ch.shivaji Maharaja chi samadhi ahe varil photot tr tyamage vaghya kutryacha putala nahi . Mhanaje to putala nantar basawala aahe….mhanaje Jr rajenchi samadhi sapadali tr vaghyachya samadhi ha sudha kahi ansh sapadayala hava hota….¿????

 2. “ज्योतिबा फुले ह्यांच्यामुळे जगाला शिवराय माहीत झाले” हां दावा तर अतिशय चुकीचा व जणू शिवरायांच्या प्रतिभेलाच धक्का लावण्याचा अपराध आहे. कारण शिवराय जेव्हा हयात होते तेव्हाच; अर्थात फुले जन्माला येण्याच्या २०० वर्षे आधीच अफझल्याला यमसदनी धाड़ले तेव्हाच शिवरायांची किर्ती जगभर पसरली होती.. अक्षरशः इंग्लंडच्या वृत्तपत्रात त्यांची बातमी छापून आली होती. आणि ५ मोठ्या पातशाह्यांना धुळ चारुन महाबलाढ्य असे हिंदु साम्राज्य निर्माण करून तत्कालीन बहुतांश राजशक्तींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचा राज्याभिषेक करवणार्या व महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल हिंदुस्थानातील जनमानसावर विलक्षण छाप सोड्णार्या शिवरायांची जगाला ओळख करून दिली हे म्हणणे म्हणजे एखाद्या अफ्रीकन जंगलात राहणार्या कृष्णवर्णी मनुष्याने सुर्याला तेलाचा दिवा दाखवण्यासारखे आहे.

  तसेच ज्या फुलेंनी शिवरायांची ओळख जगाला करून दिली असा दावा केला जातोय त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात शिवचरित्राचे किती पारायण केलेत, त्यावर किती व्याख्यान दिलीत? कारण त्यांनी शिवचरीत्राला जनमानसात पोहोचवण्यासाठी खुप काही कयास घेतले हे सिद्ध करणारा एकही समकालीन पुरावा नाही.

  शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.

  पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
  त्यावेळी अजिंक्यतारा,  रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.

  अजिंक्यतारा- निवासस्थान
  परळीचा किल्ला- गुरूस्थान
  रायगड- राजधानी.

  ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते …

  त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती… हां केवळ एक खोटा प्रचार आहे… अप-प्रचार…. तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल…. व जिचा शोध लावावा लागेल….

  मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती… आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही… त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती…. जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे

 3. शिवरायांचा जोतिबांनी पोवाडा लिहिला १८६९ साली. जोतिबांनी १८७० सालीचा शिवजयंतीचा उत्सव सुरु केला होता. १८८० साली त्यांनी पुण्याहून रायगडला पायपीट करून निबिड रानावनात गडप झालेलं महाराजांचं समाधीस्थळ शोधून काढलं. त्याची पूजाअर्चा केली. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगड जिंकून तो तोफा लावून उद्ध्वस्त केला आणि लोंकाना तिथला प्रवेश बंद केला होता. त्यांनतर अर्ध्या शतकाच्या काळात रायगड निबिड अरण्यात गुडूप झाला. समाधीस्थळी दुर्गम जंगल माजलं. तिथली समाधी शोधून काढण्याचं महत्कार्य जोतिबांनी पार पाडलं. तोवर कुणा बहाद्दरांची रायगडावर जाण्याची हिम्मत झाली होती का?

  पुढे जोतिबांच्या निधनानंतर लोक. टिळकांनी १८९५ मध्ये शिवजयंती गणेशोत्सव व समाधी मंडळ वगैरेंची सुरुवात करून त्याला राजकीय स्वरूप दिलं.

  • Uchh varniy kay shabdh vaprla phule mali samajache hote ani ha samaj Maharashtra madhech nahi deshamadhe Mota samaj aahe tya velche corodpati hote te sarva paisa gor garibasathi kharch kela tyani.

 4. छत्रपती महाराष्ट्राचे स्वामी…छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी रायगड… राजधानीमध्ये वाड्या वस्त्या होत्याच की. अन तेथील रयतेला छत्रपतींची समाधी माहित नसने म्हणजे छत्रपती माहित नसणे..म्हणजे रायगडाच्या जवळपास राहणार्या कोणालाच माहित नसणे म्हणजे महाआश्चर्य…त्यामुळे झाडाझुडुपात समाधी गेलेला शोधली हा शोध अतिरंजीतच वाटतो…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here