सलमान खानच्या चाहत्यांनो, सलमान भाईने तुमच्यासाठी भेट म्हणून भारत या चित्रपटाचा टिझर लाँच केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतचा टिझर रिलीझ केल्याचे सांगण्यात आले आहे. सलमानचे चाहते अनेक महिन्यांपासून भारत चित्रपटाची वाट पाहत होते. भारत या वर्षी ईदच्या मुहूर्ताला रिलीझ होणार आहे. भारतचा टिझर बघून चित्रपट दमदार असणार यात काही शंकाच नाही पण विशेष सरप्राईझ म्हणजे सलमान खान यात ५ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
भारतामध्ये सलमानसोबत मुख्य भूमिकेत कतरीना कैफ दिसणार आहे परंतु टिझर मध्ये तिची एकही झलक दिसत नाही, याव्यतिरिक्त दिशा पाटणी देखील भारत मध्ये दिसणार आहे. भारतचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर यांनी केले आहे. आता तुम्ही टिझरचा आनंद घ्या आणि पूर्ण ट्रेलर यायची वाट बघा.