काही महिन्यांनपूर्वी दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा फर्जंद नावाचा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. फर्जंद प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता आणि तिकीट घरावर सुद्धा फर्जंदने चांगलीच कमाई केलेली. फर्जंद सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार कोंडाजी फर्जंद याने पन्हाळा कसा मराठ्यांना मिळवून दिला हे दाखवण्यात आलेले.
फर्जंदला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव फत्तेशिकस्त असून शिवाजी महाराजांची युद्धकला आणि त्यांचा गनिमी कावा सिनेमात प्रामुख्याने दाखवण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानात जाऊन केलेला सर्जिकल स्ट्राईक तुम्हाला माहीतच असणार आहे पण याआधी शिवाजी महाराजांनी कितीतरी सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. मग हा सिनेमा म्हणजे भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असेल असे म्हणायला काही हरकत नाही.
त्यामुळे शिवाजी महाराजांची चाणाक्ष बुद्धी, त्यांची दूरदृष्टी आणि शत्रूला घायाळ करून टाकणारी युद्धनीती आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. पन्हाळा गडावर फत्तेशिकस्त यासिनेमाचा मुहूर्त झाला असून लवकरच चित्रीकरणाला सुरवात होणार आहे. या सिनेमात सुद्धा फर्जंद मधील कलाकार आपल्याला बघायला मिळतील. प्रामुख्याने सिनेमात अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, मृण्मयी देशपांडे, तृप्ती तोरडमल, आस्ताद काळे इत्यादी कलाकार दिसणार असून दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचे असणार आहे.