CID आणि CBI मधला फरक समजून घ्या, अगदी सोप्या भाषेत

3875
cid cid, cid officer, cid 2018, cid information in marathi, cid full form, cbi full form, how to become cbi officer, cid and cbi, how to join cbi, how to join cid, cbi information in marathi, difference bet cbi and cid, national investigation agency

सामान्यपणे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असेल कि CBI आणि CID या आपल्या देशातल्या दोन प्रमुख इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत. पण या दोन्ही एजन्सीजच्या कामाची क्षेत्रे पुर्णपणे वेगळी आहेत. CID हे राज्यात घडणाऱ्या मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास करते, सीआयडी राज्य सरकारच्या आदेशावर काम करते, तर CBI पुर्ण देशात घडणाऱ्या गुन्ह्यांबदल तपास करते. सीबीआयला केंद्र सरकार, उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टकडून सुचना मिळतात. CID आणि CBI नेमकं कशाप्रकारे काम करते ते पाहू.

CID (Crime investigation department) म्हणजे काय ?

CID चे फुलफॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असे आहे, जे की, एका प्रदेशातील, राज्यातील तपासासाठी ओळखली जाते. CID कडे पोलिसांचा तपास आणि काही इतर विभाग असतात. या विभागात हत्या, दंगा, अपहरण व चोरी इत्यादी गुन्ह्यासंदर्भातील तपासकामे सोपवली जातात. CID ची स्थापना, पोलिस आयोगाच्या शिफारशीवर ब्रिटिश सरकारने १९०२ मध्ये केली होती. पोलिस कर्मचाऱ्यांना यात सामील करण्याआधी खूप साऱ्या परिक्षांना तोंड द्यावे लागते. या संस्थेच्या तपासाचे कामकाज कधीकधी राज्य सरकार, तर कधी उच्च न्यायालयाकडे सोपवले जाते.

cid cid, cid officer, cid 2018, cid information in marathi, cid full form, cbi full form, how to become cbi officer, cid and cbi, how to join cbi, how to join cid, cbi information in marathi, difference bet cbi and cid, national investigation agency
CID (Source – newsnation.in)

CBI (Central Bureau of Investigation) म्हणजे काय ?

केंद्रीय तपास ब्युरो किंवा CBI हि एक तपास संस्था आहे. हि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे भ्रष्टाचार, हत्या, घोटाळे याबद्दल तपास करते. CBI एंजसीची स्थापना १९४१ मध्ये झाली आणि तिला एप्रिल १९६३ मध्ये केंद्रीय तपास कक्ष नाव देण्यात आले, ज्याचे मुख्य केंद्र दिल्लीला आहे. दिल्ली विशेष पोलिस प्रतिष्ठान अधिनियम, १९४६ मध्ये CBI ला तपासाची सहमती देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व राज्य सरकारच्या सहमतीशिवाय हि तपास संस्था कोणत्याही भागात हस्तक्षेप करू शकत नाही.

cid cid, cid officer, cid 2018, cid information in marathi, cid full form, cbi full form, how to become cbi officer, cid and cbi, how to join cbi, how to join cid, cbi information in marathi, difference bet cbi and cid, national investigation agency
CBI Office (Source – Mathrubhumi)

CBI आणि CID मधील प्रमुख फरक

  • CID च्या ऑपरेशनचे क्षेत्र खूप लहान असते (केवळ एक प्रदेश), पण CBI चे ऑपरेशन क्षेत्र त्यामानाने मोठे असते (पुर्ण एक देश तसेच विदेशही)
  • CID जवळ येणाऱ्या तपासकामांच्या आदेशांना राज्य सरकार व हायकोर्टद्वारे पाठवले जाते, पण CBI ला तपासकामे व चौकशीचे आदेश, केंद्र सरकार, राज्य सरकार व हायकोर्टद्वारे सोपविले जातात.
  • CID राज्यांमध्ये होणारे दंगा, हत्या, अपहरण व चोरी यांचा तपास करते, पण CBI राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, धोकेबाजी, हत्या, संस्थांचे घोटाळे या गोष्टीचा तपास करण्याचा अधिकार आहे.
  • जर कोणत्याही व्यक्तीला CID मध्ये सामिल व्हायचे असेल तर, त्याला राज्य सरकारद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षा पास कराव्या लागतात, पण CBI मध्ये भरती होण्यासाठी SSC बोर्डातर्फे आयोजित केलेली परिक्षा पास करावी लागते.
  • CID ची स्थापना ब्रिटिश सरकारद्वारा १९०२ मध्ये करण्यात आलेली आहे, व CID ची स्थापना १९४१ मध्ये विशेष पोलिस प्रतिष्ठानद्वारे केली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here