लष्करी गणवेशातल्या धोनीचा ‘हे’ काम करतानाच फोटो व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुक

739
ms dhoni, dhoni in army, indian army. viral, photo, boot polish

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर गेलाय, पण क्रिकेट रसिक एका खेळाडूला मिस करत आहेत. तो खेळाडू अर्थातच महेंद्रसिंग धोनी. विश्वचषकात भारताचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला. आता धोनी कोणता निर्णय घेणार ह्याकडे सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. वेस्टइंडीज दौऱ्यात धोनी असेल कि नसेल अश्या चर्चा झाडू लागल्या. पण धोनीने बीसीसीआयला कळवले कि आपण वेस्टइंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्याऐवजी त्याने देशाची सेवा करण्याला प्राधान्य दिले व तो १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनचा भाग बनला.

महेंद्रसिंग धोनी पॅरामिलिटरी फोर्सेसचा सदस्य आहे. सध्या तो लष्कराबरोबर असून तिथे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण काळात धोनीचे वर्तन एका सैनिकाप्रमाणेच आहे. तो अन्य सैनिकांप्रमाणेच एका छोट्याश्या खोलीत राहत आहे. १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियन जॉईन केल्यापासून धोनीचे अनेक फोटो आणि व्हिडीओज व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला असून तो पाहिल्यानंतर तुम्हालाही धोनीचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. ह्या फोटोत धोनी बुटाला पोलिश करतांना दिसत आहे. हा फोटो पाहून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका ट्विटर यूजरने ट्विट केले कि १०० कोटीपेक्षाही जास्त कमाई करणारा धोनी जेव्हा बुटाला पॉलीश करतो आणि जवानांसोबत राहतो तेव्हा खऱ्या माणुसकीचे दर्शन होते.

ms dhoni, dhoni in army, indian army. viral, photo, boot polish

धोनीचा सध्या प्रशिक्षणाचा कालावधी सुरु असून ह्यात त्याला अनेक कठीण कामे करावी लागत आहेत. तो डे आणि नाईट शिफ्टमध्ये आपले नेमून दिलेले काम करत आहे. रोज १९ ते २० किलो वजनाचे विविध सामान व उपकरणं धोनीला बाळगावी लागतात ज्यात ४ किलो वजनी ग्रेनेड्स, ४ किलो वजनी बुलेटप्रूफ जॅकेट, १ किलो वजनाचे हेल्मेट, २ किलो वजनी शूज, ५ किलो वजनाच्या मॅगझिन्स ह्यांसह इतर अनेक उपकरणांचा व वस्तूंचा समावेश आहे. सैनिकांचे प्रशिक्षण व त्यांचा दिनक्रम अतिशय कठीण असतो व धोनीसुद्धा एका सैनिकाप्रमाणेच आपले काम चोख पार पाडत आहे.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here