पाकिस्तानात झळकलेल्या शिवसेनेच्या पोस्टर्स मागचं सत्य

1231
article 370, shivsena, islamabad, kashmir, pakistan, shivsena poster

काल राज्यसभा व लोकसभा ह्या दोन्ही सभागृहात कलम ३७० हटवण्याबद्दलचे विधेयक संमत झाले. साहजिकच पाकिस्तानला ह्यामुळे मिरच्या झोंबल्या असतील. पण पाकिस्तानच्या राजधानीत ह्याही पेक्षा मोठी व धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात पोस्टर्स लावलेली आढळली आहेत ज्यावर असे लिहिले आहे कि “आज जम्मू काश्मीर घेतले आहे उद्या बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, देशाचे पंतप्रधान अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील”. अर्थातच हा मजकूर हिंदीमध्ये लिहिला गेला आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत ह्यांनी हे भाषण काल राज्यसभेत केले होते. त्यांच्या त्या भाषणातील शब्द जसेच्या तसे त्या पोस्टर मध्ये दिसत आहेत व सोबतच संजय राऊत भाषण करतानाचा फोटोही दिसत आहे. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानी नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी सोशल मीडियावर ह्यासंबंधी संताप व्यक्त केला आहे.

article 370, shivsena, islamabad, kashmir, pakistan, shivsena poster
Shivsena posters in islamabad (Source – Lokmat)

एका पाकिस्तानी युवकाने इस्लामाबादच्या F-६ एरियामध्ये लागलेल्या ह्या पोस्टर्सचे चित्रीकरण करून तो व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ह्या बॅनरचे शीर्षक mahabharat – A step फॉरवर्ड असे आहे. आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे हे पोस्टर्स शहराच्या ज्या भागात लावले गेले आहेत तिथून अगदी जवळच आयएसआयचे कार्यालय आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यालयाजवळ असे पोस्टर्स लागल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

संजय राऊत ह्यांना ह्या घटनेसंबंधी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कि पाकिस्तानात अशी पोस्टर्स लागणे हे आश्चर्यकारक वाटते. पण शिवसेनेचे पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लावले जाणे हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. शिवसेना इस्लामाबादेत सुद्धा पोहोचली आहे. असेही राऊत ह्यावेळी म्हणाले.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here