समाजसेवेमध्ये बिल गेट्सला मागे टाकणारा भारतीय ‘दानवीर’.

1194
अझीम प्रेमजी, अझीम प्रेमजी माहिती, भारतीय दानवीर अझीम प्रेमजी, बिल गेट्स, अझीम प्रेमजी फाऊंडेशन, Azim Premji, azim premji in marathi, azim premji foundation, लई भारी, Laii Bhaari Mahiti, Marathi Lekh

गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेसाठी बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांनी सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून भरपूर पैसा दान केला आहे. फक्य अमेरिकामध्येच नाही तर जगभरातील सगळ्यात देशात त्यांनी हा पैसे दान केला आहे, त्यामुळे दानधर्म आणि बिल गेट्स हे जणू समीकरणच बनले होते. बिल यांनी भारतामध्ये सुद्धा सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत आणि त्यांनी स्वतः भारतात येऊन पहिली आहेत. काहि दिवसांपूर्वीच त्यांनी नरेंद्र मोदी सरकारची आरोग्य सेवेच्या योजनेवरून प्रशंसा केली होती.

भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी हे सुद्धा आपल्या “अझीम प्रेमजी फाऊंडेशन” या सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून गरीब आणि वंचित लोकांच्या विकासासाठी अनेक भरीव कामे करत आहेत. आता त्यांनी या कामाच्या पैशामध्ये मोठी वाढ केली आहे त्यामुळे त्यांच्या कडून दिली जाणारी देणगीची रक्कम तब्बल १ लाख ४५ हजार कोटी रुपये झाली आहे. सामाजिक देणगी मध्ये केलेल्या या वाढीमुळे समाजसेवेमध्ये बिल गेट्सला मागे टाकणारा भारतीय ‘दानवीर’ अशी लई भारी उपाधी अझीम प्रेमजी याना मिळाली आहे.

Image Source – Wikimedia Commons

आपली ५० टक्के संपत्ती दान करू अशी यापूर्वीच घोषणा त्यांनी केली होती, त्यानुसारच ते विप्रोच्या नफ्यातील मोठा भाग सामाजिक कार्यासाठी काढलेल्या फौंडेशनला देत आहेत. अझीमजी प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक काम करतात, त्यांच्या अनेक संस्था मोफत शिक्षण पुरवतात. त्यांच्या विद्यापीठाच्या विस्तारासाठीच देणगीमध्ये वाढ केल्याचे अनेकांकडून समजते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here