रोहित शेट्टीच्या या धमाकेदार ऍक्शन फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसणार सलमान खान

997
salman khan, rohit shetty, sajid nadiadwala, rohit shetty signs salman, kick 2, akshay kumar, kick sequel, रोहित शेट्टी, साजिद नाडियाडवाला, सलमान खान

रोहित शेट्टीचा सिम्बा हा चित्रपट १०० करोड क्लबमध्ये जाणारा ८ वा चित्रपट ठरला.

रोहित शेट्टीचा सिम्बा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. प्रेक्षकांनीही रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाची वाह वाह केली. एवढेच नव्हे तर रोहित शेट्टीचा सिम्बा हा चित्रपट १०० करोड क्लबमध्ये जाणारा ८ वा चित्रपट ठरला. दुसरीकडे सलमान खानचा बहुचर्चित ‘भारत’ हा चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रिलीझ झालेल्या भारतच्या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

आम्ही सलमान खानच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच सोबत काम करणार आहेत. सलमान सोबतचा हा येणार चित्रपट रोहित शेट्टी स्टाईलने धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला असणार आणि सलमान यात एका पोलिसाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

salman khan, rohit shetty, sajid nadiadwala, rohit shetty signs salman, kick 2, akshay kumar, kick sequel, रोहित शेट्टी, साजिद नाडियाडवाला, सलमान खान
Rohit Shetty, Sajid Nadiadwala and Salman Khan (Source – Catch News)

साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहे जो सलमानचा जवळचा मित्र समजला जातो. साजिदने बरीच दिवसांपासून या कथेवर काम करत असल्याचे सांगितले. साजिद नाडियाडवाला आणि रोहित शेट्टी दोघांनाही या चित्रपटात सलमान खानलाच घ्यायचे होते. हाती आलेल्या माहितीनुसार किक या चित्रपटातील पात्राशीच निगडित नवीन चित्रपट बनवण्यात येणार आहे. कदाचित सलमानच्या ‘किक’चा हा दुसरा भागही असू शकतो. सलमान आणि रोहित शेट्टीच्या नवीन चित्रपटाची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही पण ती लवकरच करण्यात येईल असे दिसून येत आहे.

salman khan, rohit shetty, sajid nadiadwala, rohit shetty signs salman, kick 2, akshay kumar, kick sequel, रोहित शेट्टी, साजिद नाडियाडवाला, सलमान खान
Salman khan with Rohit shetty Unseenpic from Big boss trailer Shoot (Source – Twitter) 

रोहित शेट्टीने अक्षय कुमार सोबत सुद्धा एक चित्रपट साइन केला आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एक पोलीस असून त्याचे दिग्दर्शनही रोहित शेट्टीच करणार आहे, याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here