महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणून गणला जातो. अनेक इतिहासकारांनी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्याला आधुनिक आणि वैभवशाली महाराष्ट्राची पायाभरणी असा उल्लेख केला आहे. म्हणूनच याच विशेष महत्व महाराष्ट्रात आहे.
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अवघ्या १ दिवसावर आला आहे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापासून सोशल मीडियावर सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. लातूरच्या 23 वर्षीय संतोष बालगीर याने यावर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काही हटके करण्याच्या इराद्याने लातूर ते रायगड असा सायकल प्रवास करून राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावण्याचा निश्चय केला आहे. त्याने या प्रवासातही सुरवात देखील केली असून याचे वेळोवेळी उपडेट तो आपल्याला सोशल मीडियावर देत आहे.
23 वर्षीय संतोष बालगीर याचा हा हटके सायकल प्रवास लोकांना चांगलाच भावाला असून तो सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रातून अनेक लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
कोण आहे संतोष बालगीर ?
23 वर्षीय संतोष बालगीर सायकल प्रेमी आहे, त्याला सायकल वर प्रवास करणे फार आवडते. भटकंतीचा त्याला मोठा छंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संतोष बालगीर निसर्ग प्रेमी असून तो बरयाचदा गड किल्ल्यांवर ट्रेकसाठी पण जातो. सोबतच त्याला कविता करण्याचा देखील छंद आहे. संतोष बालगीर याने कॉलेज शिक्षण Rajarshi Shahu College,latur येथून पूर्ण केले असून तो पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आहे.
संतोष बालगीर भावाला त्याच्या प्रवासासाठी “लईभारी” परिवाराच्या लाख शुभेच्छा.. !