३७० हटवून २ दिवस झाले नाहीत तोच निर्मात्यांची यासाठी रांग

736
३७०, ३७० वर सिनेमा, निर्मात्यांची रांग, भाजप सरकार, 370 हटवण्याचा निर्णय, कश्मीर हमारा है!, 370 Movie, Producers in line for 370 movie, Indian Motion Pictures

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून कोण कधी रांगेला लागेल, हे काय कळंना झालंय, सामान्य नागरिक नोटबंदीच्या रांगेत, तर आता चक्क सिनेमा जगतातील निर्मात्यांनाच रांग करावी लागतेय, सिनेमाच्या तिकिटासाठी रांग आतापर्यंत सगळ्यांनीच अनुभलीय पण आता चक्क जे लोकांना रांगेला लावतात त्यांनाच रांगेला लागावं लागतंय अन त्यांना रांगेत उभा करण्यात आपल्या मोठा भाई शहा यांचा हाथ आहे बरं का…. तर आज आपण जाणून घेऊयात या लै भारी गोष्टीविषयी.

३७०, ३७० वर सिनेमा, निर्मात्यांची रांग, भाजप सरकार, 370 हटवण्याचा निर्णय, कश्मीर हमारा है!, 370 Movie, Producers in line for 370 movie, Indian Motion Pictures
Source – Google

तर त्याच असय कि, जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय झाला त्याला निदान ४८ ताससुद्धा उलटले नाहीत, आणि आता सिनेमा निर्मात्यांना या विषयीचा चित्रपट बनवायचाय, अन या सिनेमाला Article 370 किंवा धारा 370 द्यावं यासाठी त्यांनी Indian Motion Pictures’ Producers’ Association (IMPPA) कडे रांग लावलीय रांग. यातलं सर्वांत लोकप्रिय नाव पन ठरलय – कश्मीर हमारा है! या नावासाठी तब्बल 20 ते 30 निर्मात्यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नोंदणी केली आहे.

लोकसताने दिलेल्या बातमीनुसार कलम 370 रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या कि, हिकडं चित्रपट निर्मात्यांनी सिनेमाची लगोलग जुळवाजुळव सुरू केली असावी. कारण लगेचच चित्रपटाच्या टायटलच्या नोंदणीसाठी 20 ते 30 निर्माते मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनकडे गेले. त्यांनी Article 370 and Article 35A या नावासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय कश्मीर हमारा है, धारा 35A, धारा 370 अशी नावं हिंदी चित्रपटांना देण्यासाठी निर्मात्यांनी असोसिएशनकडे धाव घेतली आहे.

३७०, ३७० वर सिनेमा, निर्मात्यांची रांग, भाजप सरकार, 370 हटवण्याचा निर्णय, कश्मीर हमारा है!, 370 Movie, Producers in line for 370 movie, Indian Motion Pictures
Source – Google

याआधीही या संघटनेकडे अशा प्रकारे रांग लागली होती ती पुलवामा, ‘अभिनंदन’, ‘बालाकोट’ या शीर्षकांसाठी चढाओढ लागली होती. मागच्या एका चित्रपटासाठी अशीच भांडणे हि झाली होती बरं का. काश्मीरविषयी चित्रपटनिर्मात्यांना असलेली सिनेमा बनवण्याची खाज बघता कश्मीर हमारा है अआणि Article 370 ”साठीसुद्धा अशीच भांडतात का, हे बघावं लागेल. या 20 ते 30 मध्ये आघाडीचे निर्माते कोण, मोठे-मोठे बॅनर कोण, कोण याविषयी अजून माहिती लय भारीकडं उपलब्ध झाली नाही.

मागचं सर्जिकल स्ट्राईक झालंत त्यावेळी त्याला भारतीय हौशी रसिकांनी प्रसिद्धी अफाट दिली होती. आता या शीर्षकाचा फायदा निर्मात्यांना होतंय हा हॉस्पिटलवाल्याना होतंय हे पाहावं लागेल.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here