अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी लहानपणीच्या मैत्रिणी ? फोटो व्हायरल….

994
anushka sharma, sakshi dhoni, virat kohli, m s dhoni, anushka and sakshi were schoolmates, anushka sharma childhood, अनुष्का शर्मा, साक्षी धोनी

धोनी – कोहलीच्या आधी अनुष्का आणि साक्षी मैत्रिणी होत्या

भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि एम एस धोनी जेवढे फेमस आहेत तेवढ्याच त्यांच्या पत्नी सुद्धा लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांच्यातलं एक खास नातं आज जगासमोर आलं आहे. क्रिकेटपटूंच्या या दोन्ही पत्नी शालेय जीवनात सोबत होत्या म्हणजेच दोघी एकाच शाळेत शिकल्या असून त्या वर्गमैत्रिणी असल्याचे त्यांना आताच कळले आहे.

anushka sharma, sakshi dhoni, virat kohli, m s dhoni, anushka and sakshi were schoolmates, anushka sharma childhood, अनुष्का शर्मा, साक्षी धोनी
Anushka sharma and sakshi dhoni were schoolmates (Source – mb.ntdin.tv)

या दोघींचे शाळेतले फोटो समोर आले असून सध्या हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अनुष्का शर्माने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे तर साक्षी राजकुमारीच्या पोशाखात तुम्हाला दिसेल. या दोघींबाबत हे कनेक्शन कळल्यावर त्यांचे चाहते देखील खुश झाले आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

anushka sharma, sakshi dhoni, virat kohli, m s dhoni, anushka and sakshi were schoolmates, anushka sharma childhood, अनुष्का शर्मा, साक्षी धोनी
(Source – Oneindia Hindi)

एका मुलाखतीत अनुष्काने सांगितले कि, साक्षी आणि मी एकाच शाळेत शिकलोय. २०१३ साली जेव्हा आमची भेट झाली तेव्हा साक्षी म्हणाली कि ती आसामच्या सेंट मेरी स्कूलमध्ये शिकलेली आहे आणि आम्ही दोघी वर्गमैत्रिणी असल्याचे आम्हाला तेव्हा कळले. मला घरात आमच्या शाळेतले काही फोटो सापडले आणि त्यात आम्ही दोघी आहोत हे तुम्हाला दिसेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here