सांगली, कोल्हापुरातील भीषण पूर परस्थितीचा सामना करण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला सरसावला आहे. त्यामध्ये स्थानिक नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांच्यासह अनेकजन मदतीसाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र, खुद्द सांगलीकर असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे कुठे आहेत ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला आता खुद्द सैन्यातील जवानांनीच आपला सॅल्यूट करुन उत्तर दिले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत आहे, आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा सॅल्यूट आहे. सचिन मोहिते या बिचाऱ्याने तर आमच्या राहायचं, खायचं, नाश्त्याचं सर्वकाही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत होता. संघटनेच्या भरपूर मित्रांनी या कामी आम्हाला मदत केली. सर्वांची नाव मला माहिती नाहीत, त्यामुळे मी सर्व मदत करणाऱ्या मित्रांचे आभार मानतो, अशा शब्दात सैन्य दलाच्या एका तुकडीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
टीकेला समर्थकांच उत्तर
महापूर आला असताना सन्मानीय भिडे गुरुजी दिसले का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर विचारला होता. आव्हाड यांच्या या ट्विटरला त्यांच्या अनेक समर्थकांनी रिप्लाय देत, भिडे गुरूजी पूरग्रस्तांना मदतीत व्यस्त असल्याचे सांगत होते. पण आता जवानांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून टिकककारांचे तोंड गप्प केले आहे.