..म्हणूनच धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले: विराट कोहली

Virat Kohali, Dhoni, NZ vs IND, Dhoni 7 la ka aala, Dhoni Virat, विराट कोहली, धोनी

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकासाठी एखादा अनुभवी खेळाडू फलंदाजीसाठी पाठवणे अपेक्षित असतांना रिषभ पंत व त्यानंतर हार्दिक पांड्याला पाठवण्यात आले.

उपांत्य सामन्यात भारत न्यूझीलँडला आरामात हरवून अंतिम फेरी गाठेल असे वाटले पण झाले भलतेच. भारताला या सामन्यात १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारताची एक समस्या राहिली व शेवटी त्याच समस्येने भारताचा केला असे म्हणावे लागेल. ती समस्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार. कालच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकासाठी एखादा अनुभवी खेळाडू फलंदाजीसाठी पाठवणे अपेक्षित असतांना रिषभ पंत व त्यानंतर हार्दिक पांड्याला पाठवण्यात आले.

Virat Kohali, Dhoni, NZ vs IND, Dhoni 7 la ka aala, Dhoni Virat, विराट कोहली, धोनी

ह्याबद्दल कोहलीला पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारला असता त्याने हे स्पष्ट केले कि धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवायचे ह्यासंबंधीची आमची रणनीती आधीच ठरली होती. ह्याबाबत कोहली पुढे म्हणला कि पहिल्या १०-१५ षटकांत ३-४ विकेट्स पडलेल्या असतांना धोनी संघाला सावरू शकतो आणि हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. विश्वचषकाला सुरुवात झाली होती तेव्हापासूनच आम्ही धोनीवर टाकण्यात येणारी जबाबदारी निश्चित केली होती.

Virat Kohali, Dhoni, NZ vs IND, Dhoni 7 la ka aala, Dhoni Virat, विराट कोहली, धोनी

जर शेवटच्या काही ओव्हर्स शिल्लक राहिल्या असत्या तर कदाचित धोनीच वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता पण परिस्थती वेगळी होती म्हणून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले असे कोहलीने स्पष्ट केले. स्वतःच्या कामगिरीबद्दल बोलतांना कोहली म्हणाला कि “मी ह्या विश्वचषक स्पर्ध्येमध्ये अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो. दोन वेळा शतक बनवण्याची संधी असतानाही मी ती गमावली”. कालच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहली एका धावेवर बाद झाला ज्यामुळे भारतीय फलंदाजी अधिकच ढेपाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here