लेडी सिंघम… सौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला घातल्या बेडया

1059
Kerala Ips Officer, Merin Joseph, IPS Merin Joseph, saudi, sunil kumar, rapist, arrest, सुनील कुमार, सौदी अरेबिया, मेरीन जोसेफ

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून सुनील कुमार सौदी अरेबियामध्ये पळून गेला होता.

कोल्लमच्या पोलीस आयुक्त मरिन जोसेफ ह्या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बलात्काराचा आरोपी असलेल्या सुनील कुमार भाद्रान ह्याला त्यांनी सौदी अरेबियातून मुसक्या आवळून भारतात आणण्याचा चंग बांधला व त्यासाठी त्या स्वतः सौदी अरेबियाला रवाना झाल्या. त्यांनी आरोपीच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणले व आपली कामगिरी फत्ते केली.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून सुनील कुमार सौदी अरेबियामध्ये पळून गेला होता. मूळचा कोल्लमचा रहिवाशी असलेला सुनील कुमार नावाचा हा नराधम सौदीमध्ये टाईल्स बसविण्याचे काम करत होता. सुट्टी मिळाल्यानंतर तो भारतात आपल्या मूळ गावी परत आला. तिथे त्याने आपल्याच मित्राच्या पुतणीचा ३ महिने छळ केला. शेवटी हा त्रास असह्य होऊन मुलीने ते घरच्यांना सांगितले.

Kerala Ips Officer, Merin Joseph, IPS Merin Joseph, saudi, sunil kumar, rapist, arrest, सुनील कुमार, सौदी अरेबिया, मेरीन जोसेफ
Kerala Ips Officer Merin Joseph (Source – Iaspaper.net)

मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुनील कुमार विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. पण तो सौदी अरेबियात पळून गेला. पीडित मुलगी व तिच्या काकाने, दोघांनीही आत्महत्या केली आहे. पीडित मुलीने २०१७ साली आपले आयुष्य संपवले. २०१९ च्या जून महिन्यातच मरीन जोसेफ ह्यांनी कोल्लमच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

शक्यतो अश्या गुन्हेगारांना परदेशातून पकडून आणण्यासाठी एखादा कनिष्ठ अधिकारी पाठवला जातो परंतु सुनील कुमार विरुद्ध तेथील स्थानिक लोकांमध्ये प्रचंड राग होता. ह्या नराधमाला लवकरात लवकर अटक व्हावी हि तिथल्या लोकांची मागणी आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी मरीन जोसेफ स्वतः आपल्या टीमसोबत रविवारी सौदीमध्ये दाखल झाल्या.

Kerala Ips Officer, Merin Joseph, IPS Merin Joseph, saudi, sunil kumar, rapist, arrest, सुनील कुमार, सौदी अरेबिया, मेरीन जोसेफ
Merin Joseph (Source – The News Minute)

२०१७ साली सुनील कुमार विरोधात लुक आऊट जरी करूनही प्रत्यक्ष तपासात फारशी प्रगती झालीच नाही. इतका दीर्घकाळ ह्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे मरीन जोसेफ ह्या स्वतः त्याला पकडण्यासाठी सौदीला रवाना झाल्या आहेत. मनमोहन सरकार सत्तेवर असताना सौदीचे राजे अब्दुल्ला व मनमोहन सिंग ह्यांच्या भेटीदरम्यान गुन्हेगार हस्तांतरण करार संमत करण्यात आला होता. केरळमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सौदी अरेबियात पळून जाणाऱ्यांचे प्रमाण अतिशय जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here