फक्त हाय स्पीड इंटरनेट नव्हे तर जिओ जिगा फायबर सोबत मिळणार या भन्नाट गोष्टी

2238
jio, jio giga fibre, mukesh ambani, jio offers

२०१६ साली जिओ कंपनीने मोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवले अन नागरिकांना ‘दे दणा दण’ ऑफर देत सुटले. ग्राहकही हि खुश होऊन जिओ कडे आकर्षित होत गेले. जिओ कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर संदर्भात नुकतीच मोठी घोषणा केली असून आता ग्राहकांना ब्रॉडबँड सुविधांचा लाभ तेही अल्प दारात घेता येणार आहे. आज मुकेश अंबानी यांनी जिओफायबर सेवेच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

jio, jio giga fibre, mukesh ambani, jio offers
(Source – Forbes)

जीओ फायबर मध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार त्या पाहूया

१. एकाच कनेक्ट मध्ये इंटरनेट सुविधा आणि टीव्हीची सुविधा , फ्री लँडलाईन, विदेशात कॉल करण्याची विशेष सवलत.

२. सोयीनुसार ७०० रुपयांपासून ते १४०० रुपयांपर्यंत योग्य प्लॅन.

३. वर्षभरासाठी एखादी योजना एकत्र निवडली तर त्या सोबत ग्राहकांना ४k टीव्ही किंवा ४k सेट टॉप बॉक्स मिळणार.

४. ५ सप्टेंबर पासून जिओ फायबर लोकांसाठी उपलब्ध होणार.

५.प्रीमिअर ओटीटी सुविधा जसे कि नेटफ्लिक्स किंवा इतर आहेत त्याप्रमाणे ज्या दिवशी सिनेमा रिलीझ झाला त्याच दिवशी पाहू शकता. हि सेवा जून २०२० पासून चालू होणार

६. ऑप्टिकल फायबर सुविधेत जी केबल वापरण्यात येते तिचे कनेक्शन थेटग्राहकांच्या घरी त्यामुळे स्पीड वाढण्यास मदत, आतापर्यंतच्या केबल नेटवर्क मध्ये अशी सुविधा नव्हती.

७. जिओ चे सेट टॉप बॉक्स आता काही मोजक्याच ठिकाणी मिळत होते पण आता ते नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्याकडे पण उपलब्ध होतील असे अंबानी यांनी सांगितले.

3 COMMENTS

    • धन्यवाद..!
      तुमच्या मित्रांसोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here