नायक आणि नायिक हे कलाक्षेत्राच्या उत्तुंग यशाचे खूप मोठे भागीदार मानले जातात. असं म्हणतात कि कलाक्षेत्र हे नायक आणि नायिका अर्थात नट आणि नट्या यांच्याशिवाय अपूर्ण आहे. सिनेसृष्टी हि इतकी मोठी आहे कि त्यात बरेच लोक भागीदार आहेत पण नट आणि नट्या हि अशी आहि प्यादी आहेत जी सिनेसृष्टीला फार उंचावर नेऊन ठेवते. आज आपण चर्चा करणार आहोत अश्याच एका नटीबद्दल, ती इथली नसूनही तिने बॉलीवूडचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात काबीज केलेलं आढळून येते. ती एक अशी अभिनेत्री आहे जिने खूप कमी वेळात सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तिच नाव आहे “कतरीना कैफ”
जन्म
कतरीनाचा जन्म मूळचा इकडचा नसून तिचा जन्म हॉंगकॉंग मध्ये झाला आहे. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिने असा निर्धार मुळीच केला नव्हता कि आपण मोठे होऊन एक दिग्गज कलाकार होऊ आणि आपल्याला त्यात इतकं यश मिळेल किंवा आपण यशाच्या शिखरावरती असू. पण तिला मॉडेलिंग आणि फॅशन डिजायनिंगची प्रचंड आवड आणि ह्याच मुळे खरंतर तिच्या आयुष्यात तिला पहिला ब्रेक मिळाला.
चढ आणि उतार
एका फॅशन शो मध्ये अतिशय ग्लॅमरस लुक मध्ये असताना तिला एका निर्मात्याने बघितलं आणि तिला एका फिल्म मध्ये कास्ट केलं. त्या सिनेमाचं नाव होतं बूम (२००३) आणि हि तिची पहिली फिल्म ठरली. कैझाद गुस्ताद ह्यांनी तीला तिचा ब्रेक मिळवून दिला होता. तिला फॅशन डिजायनिंगची आवड असल्यामुळे आणि मॉडेलिंग मध्ये सुद्धा नाव कमवत असल्यामुळे तिला फिल्म मध्ये काम करणं जड गेलं नाही. परंतु तिचं हिंदी बोलण्यावर अजिबात वर्चस्व नव्हतं त्यामुळे तिच्यावरती अनेक वेळा टीका झाली.
बालपण
कतरीना दिसायला अतिशय सुंदर आणि गोंडस मुलगी होती. तिच्या आई व वडिलांसोबत ती हॉंगकॉंगला रहात होती व तीच्या आईचं नाव “सुसान टरक़ुओट”. कतरिनाची आई एक वकील होती आणि वडील मोहम्मद कैफ एक ब्रिटिश बिझनेसमन. कतरिनाचे वडील एक ब्रिटिश नागरिक असून त्यांचे मूळ काश्मीरी आहेत. कतरीना लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. तिला ७ भावंडं आहेत व तिची लहान बहीण “इसाबेल कैफ” हि सुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. कतरीनाला मॉडेलिंग आणि फॅशन मध्ये खूप आवड होती आणि १४ वर्षांची असताना तिने पहिल्या नाटकात काम केलं होत. नंतर तिने अशीच कामं चालू ठेवली.
कतरिनाने एक तेलगू फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे, त्या फिल्मचं नाव होत “मल्लीश्वरी”. ह्यात ती सुप्रसिद्ध अभिनेता “वेंकटेश” बरोबर महत्वाच्या भूमिकेत दिसली. पहिल्या फिल्म नंतरच तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आणि तिचं खरं करिअर सुरु झालं. पुढे जाऊन कतरिनाने बॉलीवूड मधल्या मोठं मोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. तिने ऍक्शन, रोमँटिक, कॉमेडी, राजकारण व सिरियस फिल्म्समध्ये अनेक वेफवेगळ्या प्रकारची पात्र निभावली.
सुरवातीच्या काळातच कतरिनाला सलमान खानच्या “मैने प्यार क्यू किया ?” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात सुधमीत सेन मुख्य भूमिकेत होती त्यामुळे कतरिनाला जास्त वाव मिळाला नाही परंतु तिच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. कतरीना कैफच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली ती २००७ साली अक्षय कुमार बरोबर ‘नमस्ते लंडन’ या सिनेमात काम केल्यानंतर. हा सिनेमा कतरिनाच्या पहिला सुपरहिट सिनेमा होता. यानंतर तिने सलग ‘पार्टनर’, ‘वेलकम’ आणि ‘सिंग इज किंग’ यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं.
फॅमिली आणि पॅशन
काहीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना कतरीना कैफ हिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. यासाठी तिला देखील अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मूळची इथली नसल्याने तिला हिंदी येत नव्हती आणि त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. पण हिंदी सिनेमात काम करत असल्याने हिंदी येणं महत्वाचं आहे हे तिनेही ओळखलं आणि काही प्रमाणात ती हिंदी शिकली देखील.
फिल्म्स
कतरीना सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. जसेकी सलमान खान बरोबर तिनी अनेक फिल्म मधून काम केलं. सुरुवातीला “मैने प्यार क्यू किया” मधून आजपर्यंत “भारत” या फिल्म पर्यंत. शाहरुख खान बरोबर सुद्धा तिने रोमँटिक फिल्म केली आहे. तिचा शाहरुख खान बरोबर लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे “जब तक है जान” आणि आताच येऊन गेलेला “झिरो”. आमिर खानबरोबर नावाजलेल्या ‘धूम’ सीरिजमध्येही तिला काम करण्याची संधी मिळाली.
मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच कतरीना एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. “शीला कि जवानी”, “चिकनी चमेली”, “काला चष्मा”, “अफगाण जलेबी” या सारख्या गाण्यांमध्ये तिने आपले नृत्य कौशल्य जगाला दाखवले आहे.