आरं भाऊ ! भारताच्या रिक्षा इंग्लंडच्या रस्त्यांवर काय करत आहेत ?

1118
ola, ola auto, ola in liverpool, uber, private taxi

भारतात प्रसिद्ध असणारी, खाजगी टॅक्सीसेवा पुरवणारी ‘OLA’ या कंपनीने आता इंग्लंडमधील लिव्हरपूल या शहरामध्ये ग्राहकांना ओला रिक्षांमधून मोफत सेवा देत आहे. या रिक्षांना इंग्लंडमध्ये ‘टूक-टूक व्हेइकल्स’ असे म्हणतात. हि सेवा २२ मार्च पासून लिव्हरपूलच्या मेरीसाईड या भागामध्ये पुरवली जात आहे.

ola, ola auto, ola in liverpool, uber, private taxi
(Source – The News Minute)

सध्या इंग्लंडमधील लिव्हरपूलमध्ये ५०० पेक्षा जास्त चालक OLA या कंपनीची रिक्षा चालवत आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू असा आहे कि, या रिक्षा चालकांची संख्या वाढवणे. OLA या कंपनीने नव्या चालकांना त्यांच्या कंपनीची मोठी स्पर्धक असणारी UBER या कंपनीपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच त्यांना अनेक मोफत सुविधादेखील पुरविल्या जाणार असेही कंपनीने चालकांना सांगितले गेले आहे.

ola, ola auto, ola in liverpool, uber, private taxi
(Source – People Herald Today)

तसेच, OLA कंपनीला UBER या कंपनीला जागतिक स्तरावर आव्हान देणारी कंपनी म्हणून पहिले जाते. त्यामुळे त्यांनी भारतातील रस्त्यांवर लोकप्रिय असणारी बजाजची रिक्षा इंग्लंडच्या रस्त्यांवर उतरवली. यामुळे उबर कंपनीला तोड देण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनीची जाहिरात केली.

ola, ola auto, ola in liverpool, uber, private taxi
(Source – News18.com)

OLA कंपनीचे युनायटेड किंग्डममधील कार्यकारी अध्यक्ष असलेले बेन लेग यांनी स्वतः रिक्षा चालवली व अनेक प्रवाशांना रिक्षामधून मोफत सेवा पुरवत होते. बेन लेग यांनी सांगितले कि, ‘हि सेवा पुरवीत असताना प्रवाशांशी संवाद साधताना त्यांना प्रवास करत असताना येणाऱ्या अडचणी समजल्या.’

ola, ola auto, ola in liverpool, uber, private taxi
(Source – Liverpool Echo)

जेव्हा या मोफत प्रवासाची सेवा संपेल तेव्हा OLA या कंपनीने अशी ऑफर काढली आहे कि, एप्रिल महिना संपायच्या अगोदर जर तुम्ही ओला अँप डाऊनलोड केले तर तुम्हाला तुमच्या OLA रिक्षाच्या पहिल्या प्रवासावर ५०% ऑफ मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here