प्रार्थना बेहेरेला तुम्ही सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात सुद्धा बघितलंय, माहित आहे का ?
प्रार्थना बेहेरे आपल्या हसण्याच्या अजब-गजब शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. मूळच्या गुजरात येथील असणाऱ्या या अभिनेत्रीचा जन्म ५ जानेवारी १९९३ रोजी झाला. तिने आपल्या पदार्पणातच झी वाहिनीवरील सुप्रसिद्ध ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे आपल्या अभिनयाची छाप दाखवली होती. त्यानंतर 9x झकास वाहिनीवरील ‘हिरोईन हंट’ या कार्यक्रमाचीही ती विजेती होती.

जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, कॉफी आणि बरच काही, मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुगे, व्हाट्सअँप लग्न यासारखे अनेक गाजलेले चित्रपट या प्रार्थना बेहेरेनी आपल्याला दिले आहेत. त्याशिवाय सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटामध्येही तिने छोटीशी भूमिका साकारली होती. पवित्र रिश्ता हि मालिका मिळण्यापूर्वी प्रार्थना सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्यासोबत डान्सर म्हणून काम करत होती.

१५ नोव्हेंबर २०१७ साली अभिषेक जावकर याच्यासोबत तिचा विवाहसोहळा गोवा येथे मराठमोळ्या दिमाखात पार पडला. अभिषेक सोबत तिची भेट एका विवाह संस्थेमार्फत झाली. अभिषेक व्यवसायाने एक दिग्दर्शक आहे. प्रार्थना आणि अभिषेक एकाच व्यवसायातले असल्यामुळे लग्नानंतरही प्रार्थना (Prarthana Behere) आपले काम सुरूच ठेवणार आहे.
गेल्या वर्षी कामानिमित्ताने अनिकेत विश्स्वासराव बरोबर कोल्हापूरला जात असताना लोणावळ्याजवळ प्रार्थनाचा अपघात झाला होता. पण आता ते दोघेही यातून सावरले आहेत.
महाराष्ट्राचा फेमस चेहरा असलेल्या वैभव तत्ववादी सोबतची प्रार्थनाची ऑनलाईन केमिस्ट्री आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. या जोडीचा आणखी एक चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘रेडीमिक्स’. यात या जोडीबरोबरच नेहा जोशीही असणार आहे.

नुकताच तिच्या ‘ती आणि ती’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बिग बॉस मराठी मधील फायनल स्पर्धक असलेला सर्वांचा लाडका पुष्की ( पुष्कर जोग) आणि अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णी हे दोघेही या चित्रपटात प्रार्थना सोबत आपल्याला बघायला मिळणार आहेत. १ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.