गेल्या १५ वर्षांपासून अजय देवगण कुठल्याच अवॉर्ड फंक्शनला जात नाही. हे आहे कारण…

1175
ajay devgan movies, ajay devgn family, ajay devgn information, ajay devgn in marathi, ajay devgn biography, ajay devgn unknown facts, अजय देवगण, अजय देवगण माहिती, ajay devgn awards, ajay devgn biography, ajay devgn history, ajay devgan father

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे नाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच परिचित आहे. त्यांनी काम केलेल्या अनेक चित्रपटांमुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. अजय देवगण याना ऍक्शन स्टार असेही म्हटले जाते. अजय देवगण त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अजय देवगण हे वीरू देवगण आणि वीणा देवगण यांचे पुत्र. वीरू देवगण हे त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्टंट कोरिओग्राफर होते आणि त्यांची आई वीणा देवगण या फिल्म प्रोड्युसर.

ajay devgan movies, ajay devgn family, ajay devgn information, ajay devgn in marathi, ajay devgn biography, ajay devgn unknown facts, अजय देवगण, अजय देवगण माहिती, ajay devgn awards, ajay devgn biography, ajay devgn history, ajay devgan father
Veeru Devgan  (Source – vivowallpaper.com)

अजय देवगण यांचे नाव त्यांच्या आई वडिलांनी विशाल ठेवले होते, परंतु अजय देवगण यांनी हिंदी चित्रपट सृष्टीसाठी विशाल देवगण हे नाव बदलून अजय देवगण असे ठेवले, तसेच त्यांनी त्यांच्या आडनावाची स्पेलिंगदेखील बदलून घेतली जसे कि, Ajay Devgan पासून Ajay Devgn. अजय देवगण यांना २०१६ मध्ये पदमश्री पुरस्काराने पुरस्कारीत करण्यात आले, तसेच २००० आणि २००३ साली त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील इतका मोठा अभिनेता इतर अभिनेत्यांपेक्षा जरा वेगळाच आहे. आता ते कसे काय ? तर त्याचे कारण असे आहे कि, हिंदी चित्रपटसृष्टीतील होणाऱ्या कोणत्याच पुरस्कार सोहळ्यामध्ये अजय देवगण जात नाहीत. अजय देवगण यांनी हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिली होती. देवगण यांच्या मते, हे पुरस्कार सोहळे म्हणजे एक व्यवसाय आहे. सगळी फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी केलेली एक धडपड आहे.

पुरस्कार सोहळ्याच्या निर्मात्यांना फक्त टीव्ही चॅनेलवर ती गोष्ट विकायची असते. त्यासोबत हे पुरस्कार सोहळ्याचे निर्माते असे आश्वासन देत असतात कि, मोठे मोठे अभिनेते आणि अभिनेत्री येतील, स्टेजवर परफॉर्म करतील, मग त्यानंतर त्यांना पुरस्कार दिला जाईल. हे सगळे पैसे कमवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत आणि या गोष्टीमुळे अजय देवगण स्वतः गेले १५ वर्षांपासून कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला गेलेले नाहीत.

ajay devgan movies, ajay devgn family, ajay devgn information, ajay devgn in marathi, ajay devgn biography, ajay devgn unknown facts, अजय देवगण, अजय देवगण माहिती, ajay devgn awards, ajay devgn biography, ajay devgn history, ajay devgan father
Ajay Devgn (Source – The National)

अजय देवगण ह्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी ज्या फारश्या कुणाला माहित नाहीत

  • अजय देवगणबद्दल अनोखी गोष्ट म्हणजे ते नेहमी घरातून बाहेर जाताना न विसरता त्यांच्या आईवडिलांच्या पाय पडून जातात.
  • त्यांच्यामधील चांगल्या वृत्तीसोबतच त्यांच्यामध्ये काही वाईट गुण देखील होते, पण हि वाईट सवय फक्त कॉलेजच्या मर्यादित काळापर्यंतच होती. अजय देवगण कॉलेजमध्ये असताना त्यांची प्रतिमा एक गुंड म्हणून होती. ते त्यांच्या वडिलांची म्हणजेच वीरू देवगण यांची गन त्यांच्या नकळत गंमत म्हणून घेऊन गेले होते. कोणीही अशा रितीने अनाधिकृतपणे गन बाहेर घेऊन जाणे किंवा बाळगणे कायद्याच्या विरोधात होते आणि त्यामुळे त्यांना दोन वेळा तुरुंगात टाकण्यात आले होते.
  • अजय देवगण यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे, देवगण नेहमी शूटिंगसाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी त्यांच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करतात, जे कि, हिंदी चित्रपट सृष्टीतील इतर कोणताही स्टार क्वचितच करत असेल, हिंदी चित्रपटसृष्टीत फार कमी कलाकार स्वतःचे खाजगी विमान वापरत असावेत.
  • तुम्हाला हे माहिती आहे का कि, अजय देवगण यांनी १०० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यापैकी त्यांचे असे एकूण ६ चित्रपट आहेत ज्यांनी १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
ajay devgan movies, ajay devgn family, ajay devgn information, ajay devgn in marathi, ajay devgn biography, ajay devgn unknown facts, अजय देवगण, अजय देवगण माहिती, ajay devgn awards, ajay devgn biography, ajay devgn history, ajay devgan father
Ajay Devgn (Source – moneycontrol.com)

१०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे अजय देवगणचे 6 चित्रपट

१ सिंघम (२०११)- १०१ कोटी
२ सिंघम रिटर्न्स (२०१४)- १४०.६२ कोटी
३ गोलमाल ३ (२०१०)- १०७ कोटी
४ शिवाय (२०१६)- १००.०५ कोटी
५ बोल बच्चन (२०१२)- १०१ कोटी
६ सन ऑफ सरदार (२०१२)- १०५.०३ कोटी

नेहमी गंभीर अशा भूमिकांमध्ये पाहिलेल्या अजय देवगण यांना pranks करायची खूप सवय आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही कि इतका गंभीर दिसणारा आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता इतका खोडकर असेल. अजय देवगण जर शूटिंगसाठी सेट वर असतील तर ते तिथेही pranks करतात, किंवा एखाद्या शोला गेले असतील तर तेथेही त्यांची मज्जा मस्करी चालू असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here