…सचिन बॉलिंग करायला उतरला आणि ऑस्ट्रेलियाची सगळी टीमच उद्धवस्त केली

sachin tendulkar, sachin tendulkar stats, sachin tendulkar bowling, sachin tendulkar wickets, sachin tendulkar vs australia, sachin tendulkar best spell, ind vs aus, kochi, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरची बॉलिंग, सचिन तेंडुलकरच्या विकेट्स

त्या दिवशी सचिन बॅटींग करताना फॉर्म मध्ये नव्हता, पण बॉलिंगच्या जाम मूड मध्ये होता…

आपण भारतीयांना क्रिकेट मध्ये भलताच इंटरेस्ट आधी पासुन आहे. भारतीय क्रिकेटपटू अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले गेलेत त्यामुळे भारतातील कित्येक मुलांचं स्वप्न असतं क्रिकेटर बनून आपल्या देशासाठी खेळणं. इथली तरूण पिढी तर वेडी आहे क्रिकेटसाठी.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी देशातील नागरीकांचा आवडता खेळ हा क्रिकेट ठरला आहे. आधी क्रिकेट हा खेळ एवढा प्रसिध्द नव्हता पण तो प्रसिध्द झाला तो कपिल देव व त्यांच्या संघाने विश्वचषक जिंकल्या नंतर. नंतर मग क्रिकेट या खेळात एक असा तारा जन्माला आला ज्याने फक्त भारतीय क्रिकेट रसिकांनाच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना आपल्या प्रेमात पाडलं.

तो तारा म्हणजे अर्थातच आपला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. अगदी प्रेक्षकच नाही तर प्रतिस्पर्धी, अंपायर, शिपाई अगदी स्टेडीअम वर काम करणारा प्रत्येकजण सचिनच्या प्रेमात होता. तसं सचिन हे व्यक्तीमहत्व देखिल होत. सचिन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मारलेले शंभर शतक, एक दिवसीय सामन्यातलं पहिलं व्दिशतक, बॉलरला हात टेकायला लावणारा बॅटस्मन, अंपायरचा निर्णय चुकला हे माहीती असताना सुध्दा फक्त एक स्मितहास्य देऊन निर्णयाचा मान राखत नम्रपणे निघुन जाणारा एक नम्र खेळाडू, विरोधक संघाच्या खेळाडूने ज्याच्या खेळावर पुस्तक लिहीलं असा खेळाडू, एक अष्टपैलु बॅटस्मन, तमाम भारतीयांच्या आँख का तारा….

sachin tendulkar, sachin tendulkar stats, sachin tendulkar bowling, sachin tendulkar wickets, sachin tendulkar vs australia, sachin tendulkar best spell, ind vs aus, kochi, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरची बॉलिंग, सचिन तेंडुलकरच्या विकेट्स
Sachin Tendulkar (Source – Wisden)

पण तुम्हाला कधी सचिनची बॉलर म्हणून कामगीरी माहीती आहे का..? तुम्ही म्हणाल बॉलर..? हे कसं शक्य आहे…? पण मित्रांनो हे एकदम खरं आहे. आपल्या बॅटने अनेक खेळाडूंना गुडघे टेकायला लावणारा हा मास्टर ब्लास्टर, गोलंदाजीत सुध्दा तेवढाच तरबेज ठरला होता. त्याच बद्दल आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

दिवस होते 1998 सालचे, कोचीच्या स्टेडीअम वर हाजारो प्रेक्षक स्तब्ध बसले होते. तो सामना होता भारत विरूध्द ऑस्ट्रेलियाचा. सामना सुरू झाला. नाणेफेक झाली. भारतावर पहिला फलंदाजीची जबाबदारी आली. पण ज्या माणसाकडे हजारो लोक आशा लावुन बसले होते, तो माणूस म्हणजे सचिन तेंडुलकर. पण सचिनने त्या दिवशी प्रेक्षकांची निराशा केली. सचिन अवघ्या आठ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या महंमद अजहर व इतर खेळाडूंनी चांगली खेळी करून संघाला 300 च्या वर आणून ठेवले. त्या काळी एखाद्या सामन्यात तीनशे धावांच्या वर स्कोअर गेला तर तो सामना जिंकल्या सारखच होतं.

sachin tendulkar, sachin tendulkar stats, sachin tendulkar bowling, sachin tendulkar wickets, sachin tendulkar vs australia, sachin tendulkar best spell, ind vs aus, kochi, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरची बॉलिंग, सचिन तेंडुलकरच्या विकेट्स
Ind vs Aus Scorecard, Kochi 1998

पण समोर उभा ठाकला होता तो ऑस्ट्रेलिया चा संघ आणि त्याकाळी हा संघ भलताच तेजी मध्ये होता आणि या संघात काही तडाखेबाज फलंदाज सुध्दा होते. जसं की स्टीव वॉ, मार्क वॉ, रिकी पॉन्टीन, माइकल बेवन यांसारखे मुत्सद्दी व अनुभवी खेळाडू त्या संघात होते, त्यामुळे त्यांच्यासाठी तीनशे धावांचा पल्ला गाठनं काही अवघड नव्हतं.

मैदानावर उतरली ऑस्ट्रेलियाची पहिली जोडी ऑस्ट्रेलियाचे नामचिन फलंदाज मार्क वाॅ आणि माइकल बेवन. ऑस्ट्रेलियाच्या या दोन पठ्ठ्यांनी आपली चुनूक दाखवत पहिलीच भागीदारी शंभर धावांपर्यंत नेली आणि एवढ्यावर ते थांबणार नव्हते. सगळे बॉलर फिके पडत होते ह्या जोडी पुढे. या दोघांना कुणीही बाद करू शकत नव्हतं आणि हे असंच खेळत राहिले असते तर हा सामना त्यांच्या खिशात गेला असता आणि हे भारताला परवडणारं नव्हतं. मग बॉल गेला सचिन तेंडुलकर नावाच्या अवलीया कडे, त्या दिवशी तो बॅटींग मध्ये फॉर्म मध्ये नव्हता पण बॉलिंगच्या जाम मूड मध्ये होता.

sachin tendulkar, sachin tendulkar stats, sachin tendulkar bowling, sachin tendulkar wickets, sachin tendulkar vs australia, sachin tendulkar best spell, ind vs aus, kochi, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरची बॉलिंग, सचिन तेंडुलकरच्या विकेट्स
Sachin Tendulkar Bowling (Source – HT)

सचिन फक्त बॅटींग पुरता मर्यादित नाही हे त्याला दाखवून द्यायच होतं म्हणुन की काय त्याने त्या सामन्यात प्रचंड फॉर्म मध्ये असणाऱ्या जोडीच्या भागीदारीला तोडले. त्याने आपल्या ओवर मध्ये स्टिव वॉला बाद केले. त्याचा आत्मविश्वास वाढला, पुढे त्याच्या बॉलवर एकापेक्षा एक फलंदाज बाद होऊ लागले. पहिला स्टिव वॉ मग माइकल वेगन यांसारख्या मातब्बर मंडळींना त्याने आऊट केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फळी अशी काही ढासळली की ती परत उभी नाही राहू शकली.

शेवटी सचिनचं बॉलिंगकार्ड होतं, 10 ओवर-32 धावा आणि दनदनीत 5 विकेट. या सामन्यातून सचिनने पुन्हा एकदा सिध्द करून दाखवलं की त्याला मास्टर ब्लास्टर का म्हणतात ते..

शेवटी एवढचं कि “सचिन तो आखिर सचिन है बॉस..”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here