सख्या भावानेच प्रमोद महाजन यांची हत्या का केली ?

smt rekha pramod mahajan, pramod mahajan assassination, pramod mahajan death, pramod mahajan shot news, pramod mahajan death, pramod mahajan in marathi, how pramod mahajan died, pravin mahajan, प्रमोद महाजन, प्रमोद महाजन मृत्यू, प्रमोद महाजन हत्या, प्रवीण महाजन

अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्यानंतर पक्षांमध्ये सर्वात जास्त शक्तिशाली नेतृत्व म्हणून प्रमोद महाजन यांच्याकडे बघितलं जायचं.

प्रमोद महाजन यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाच्या बाहेर एक पाटी लागलेली असे त्यावर असे लिहिले होते कि “friends welcome anytime relatives by appointment only” वरील वाक्यामुळे बरेच लोक दुखावले जाऊ शकतात, पण आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे काही निर्णय प्रत्येकाला घ्यावे लागतात.

प्रमोद महाजन एक अद्वितिय दृष्टी लाभलेला नेता. प्रमोद महाजन यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात केलेल्या अनेक घडामोडी आजही अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श आहेत. भारतीय जनता पार्टी साठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. पण अशा या असामान्य आणि अजातशत्रू राजकीय नेत्याचा अंत मात्र त्यांच्याच लहान भावाने करावा हे मात्र दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक अफवा पसरवल्या जात होत्या पण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक आरोप खोडून काढला आहे. काय झाले होते त्यादिवशी जेव्हा प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून….

smt rekha pramod mahajan, pramod mahajan assassination, pramod mahajan death, pramod mahajan shot news, pramod mahajan death, pramod mahajan in marathi, how pramod mahajan died, pravin mahajan, प्रमोद महाजन, प्रमोद महाजन मृत्यू, प्रमोद महाजन हत्या, प्रवीण महाजन
(Source – indiatoday.in)

22 एप्रिल 2006 च्या सकाळी प्रमोद महाजन यांच्या मुंबई येथील निवासस्थानी वृत्तपत्र वाचत बसले होते. सकाळी साडेसात वाजता त्यांना कोणाच्याही येण्याची अपेक्षा नव्हती त्यामुळे दारावरती कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यांच्या बंधूंचे घरामध्ये येणे त्यांच्यासाठी अपेक्षित नव्हते, प्रवीण महाजन त्यादिवशी प्रमोद महाजन यांना भेटण्यासाठी हत्यार सोबत घेऊन गेले होते आणि पुढच्या काही वेळा मध्येच कोणाला काही कळायच्या आत प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या वरती तीन गोळ्या डागल्या.

प्रमोद महाजन या काळामध्ये त्यांच्या राजकीय करिअरच्या सर्वोच्च स्थानी होते. ते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे सर्वात शक्तिशाली नेते ओळखले जायचे. अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्यानंतर पक्षांमध्ये सर्वात जास्त शक्तिशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरा बसला होता.

त्या सकाळी नक्की काय घडलेलं ?

त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता प्रवीण महाजन टी-शर्ट आणि जीन्स वर प्रमोद महाजन यांच्या घरी आले. त्यांनी त्यांच्या घराची बेल वाजवली, प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा यांनी दरवाजा उघडला आणि त्या दोघांसाठी चहा तयार करण्यासाठी आत मध्ये गेल्या. प्रमोद महाजन त्यावेळी सोफ्यावर बसून वृत्तपत्र वाचत होते. त्यांचं अर्ध लक्ष टीव्हीमधील बातम्यांवरती होतं आणि काही वेळातच त्यांच्या बंधूंनी त्यांना काही कळायच्या आतच त्यांच्यावरती गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रवीण महाजन यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला कायद्याच्या स्वाधीन केले.

प्रवीण महाजन यांनी जबाबात सांगितले आहे की त्यांचा प्रमोद महाजन यांच्या वरती गेल्या अनेक वर्षांपासून राग होता. प्रमोद महाजन त्यांना नेहमी पीए ची अपॉइंटमेंट घेऊनच भेटायला येण्याचे सुचवत असत.

त्यादिवशी प्रवीण महाजन सकाळीच त्यांना भेटायला गेले आणि अपॉईंटमेंट घेतली नसल्यामुळे प्रमोद महाजन यांनी त्यांना विचारले की, “तू इथे काय करत आहेस ?” त्यानंतर प्रवीण सोफ्यावर बसले आणि ते त्यांच्या मोठ्या बंधूंकडे त्यांच्याचबद्दल तक्रार करू लागले. “गेल्या काही दिवसांपासून तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. तू मला माझ्या व्यवसायामध्ये मदत करायला हवी. मी तुला गेले अनेक दिवस भेटण्याचा प्रयत्न करतोय.”

यादिवशी प्रवीण महाजन सकाळीच त्यांना भेटायला गेले आणि अपॉईंटमेंट घेतली नसल्यामुळे प्रमोद महाजन यांनी त्यांना विचारले की, “तू इथे काय करत आहेस ?” त्यानंतर प्रवीण सोफ्यावर बसले आणि ते त्यांच्या मोठ्या बंधूंकडे त्यांच्याचबद्दल तक्रार करू लागले. “गेल्या काही दिवसांपासून तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. तू मला माझ्या व्यवसायामध्ये मदत करायला हवी. मी तुला गेले अनेक दिवस भेटण्याचा प्रयत्न करतोय.”

प्रमोद महाजन यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि याच गोष्टीमुळे संतप्त झालेल्या प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तीन गोळ्या प्रमोद महाजन यांच्या शरीरामध्ये लागल्या. प्रवीण महाजन यांनी चौथी ही गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता पण ती चौथी गोळी बंदुकीमध्येच अडकून राहिली. या तीनही गोळ्या प्रमोद महाजन यांच्या छातीच्या खाली लागल्या होत्या. गोळ्यांचा आवाज ऐकून रेखा स्वयंपाक घरातून बाहेर पळत आल्या. त्यांनी पाहिले की प्रमोद महाजन सोप्या वरती पडले होते. जास्त रक्त वाहून गेले नव्हते पण त्यांना गंभीर इजा झालेली होती.

त्यानंतर प्रवीण महाजन शांतपणे फ्लॅटच्या बाहेर निघून गेले, प्रमोद महाजन त्यावेळीही शुद्धीवर होते. त्यांनी रेखा यांना खाली जाऊन गोपीनाथ मुंडे यांना बोलवायला सांगितले जे बाराव्या मजल्यावर राहत होते. रेखा यांचा निरोप मिळताच मुंडे महाजन यांच्या फ्लॅट वर गेले. महाजन यांची परिस्थिती बघून गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना लगेच इस्पितळात नेण्याचे ठरवले. त्यांनी ऍम्ब्युलन्सला कॉल न करता स्वतः त्यांना इस्पितळात नेण्याचे ठरवले. मुंडे आणि रेखा महाजन यांनी प्रमोद महाजन यांना लिलावती रुग्णालयात नेणार होते. पण महाजन यांनी त्यांना सांगितले की, “लीलावती रुग्णालय खूप लांब आहे, मला हिंदुजा रुग्णालयात न्या.”

हिंदुजा रुग्णालय माहिम मध्ये आहे आणि महाजन यांच्या निवासस्थानापासून ते रुग्णालय खूप जवळ आहे. मधल्या काळामध्ये मुंडे यांनी डॉक्टर विजय बंग जे जेजे हॉस्पिटल चे कार्डीयो विभागाचे प्रमुख होते त्यांना फोन केला. बंग डॉक्टरही त्याच इमारतीमध्ये राहत असत. डॉक्टर बंग लगेच वरच्या मजल्यावरती गेले. या सगळ्याबाबत बोलताना डॉक्टर बंग म्हणाले की, “जेव्हा मी महाजन यांच्या फ्लॅट वरती गेलो त्यावेळी महाजन एका खुर्चीवर बसलेले होते. त्यांची परिस्थिती पाहून मला अंदाज आला होता की अंतर्गत रक्तस्राव खूप झालेला आहे. मी त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.”

डॉक्टर बंग यांनी हिंदूजा रुग्णालयामध्ये फोन केला. त्यांनी महाजन यांची परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि कुठली तयारी करायची आहे याबद्दलही सांगितले. त्यानंतर लगेच महाजन यांना हिंदुजा रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. महाजन यांनी त्याही परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे यांना सांगितले की, “माझा रक्तगट बी पॉझिटिव आहे रुग्णालयाला या रक्तगटाचे रक्त तयार ठेवण्याचे आदेश द्या.” रूग्नालयानेही परिस्थितीचे भान ठेवत सर्व तयारी करून ठेवली होती. कारण थोड्या वेळाच्या अंतराने अनेक गोष्टी घडू शकल्या असत्या.

या काळामध्ये बाहेर वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. प्रवीण महाजन कुठलाही शब्द न बोलता इमारत उतरून खाली आले. त्यांनी त्यांची गाडी घेतली आणि ते ट्राफिक पोलिसांकडे गेले. त्यांना सांगितले की, “मी माझ्या मोठ्या बंधुचा खून केलेला आहे.” ट्रॅफिक पोलिसाने त्यांना वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. स्वतःची गाडी तिथेच ठेवून प्रवीण महाजन वरळी पोलीस स्टेशनमध्ये साडेआठ वाजता दाखल झाले. त्यांनी सब इंस्पेक्टर जयकुमार शंकर यांना सांगितले की,

“मी आत्ताच माझा भाऊ प्रमोद महाजन याला ठार केले आहे, मला सरेंडर करायचे आहे”. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

प्रवीण महाजन यांचे घर ठाणे येथे आहे. त्यांच्या घरापासून प्रमोद महाजन यांचे घर दोन तासाच्या अंतरावरती आहे. वृत्तपत्राद्वारे प्रवीण महाजन यांना कळले होते की प्रमोद महाजन त्यादिवशी शहरामध्येच असतील. प्रवीण महाजन यांनी सकाळी साडेपाच वाजता त्यांचे घर सोडले, त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले कि मी दादाला भेटायला चाललो आहे.

तिकडे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये प्रमोद महाजन यांच्यावर डॉक्टर शर्थीने उपाय करण्याचा प्रयत्न करत होते. बंदुकीने झाडलेल्या गोळ्या प्रमोद महाजन यांच्या शरीरामध्ये आतपर्यंत गेलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झालेली होती. दरम्यानच्या काळात ही बातमी बाहेर पसरली होती. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि नेते रुग्णालयाबाहेर गर्दी करत होते. अनेक प्रकारचे तज्ञ डॉक्टर महाजन यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून होते. गोळी लागल्याच्या चार दिवसानंतरही प्रमोद महाजन मृत्यूशी झुंज देत होते. प्रमोद महाजन यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते.

त्यांचा अंतर्गत रक्तस्राव बंद झाला होता. सुरुवातीच्या दिवशी महाजन यांना 30 पिशव्या रक्त चढवण्यात आले होते. महाजन यांना बघण्यासाठी राजकारण, बाँलीवुड, कॉर्पोरेट मधील अनेक दिग्गज रुग्णालयाच्या बाहेर रांगा लावून उभे होते. लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंग यांनी त्यांच्या सर्व राजकीय भेटी रद्द केल्या होत्या आणि ते प्रमोद महाजन यांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. वाजपेयी सुद्धा त्या काळामध्ये आजारी होते त्यांना प्रवास करणे खूपच अवघड होते पण महाजन यांच्यासोबत त्यांचे संबंध फारच घनिष्ठ होते म्हणूनच ते महाजन यांना भेटण्यासाठी आजारी असतानाही मुंबईला निघाले.

smt rekha pramod mahajan, pramod mahajan assassination, pramod mahajan death, pramod mahajan shot news, pramod mahajan death, pramod mahajan in marathi, how pramod mahajan died, pravin mahajan, प्रमोद महाजन, प्रमोद महाजन मृत्यू, प्रमोद महाजन हत्या, प्रवीण महाजन
(Source – LiveIndia.Com)

दरम्यानच्या काळामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाजन यांना पाहण्यासाठी मुंबईला पोहोचले होते. महाजन यांचे मित्र सुधांशू मित्तल तर आयसीयूच्या समोर तीन दिवस बसून होते. संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी वाजपेयी यांना फोनवरून आर्मी डॉक्टर्सच्या ट्रीटमेंटची गरज असल्यास कळवण्याबद्दल सांगितले होते कारण आर्मी मधील डॉक्टर्स गोळीबाराची दुखापत ठीक करण्यात तज्ञ असतात. पण चार दिवसानंतर प्रमोद महाजन यांनी इहलोकीचा प्रवास सुरू केला. त्यांच्या रूपाने एक प्रचंड बुद्धिमत्ता असलेला राष्ट्रीय नेता भारताने गमावला होता. महाजन यांनी शेवटपर्यंत मृत्यूशी कडवी झुंज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here