इंद्राणी मुखर्जीच्या त्या साक्षीमुळे चिदंबरम अडचणीत

inx media, p.chidambaram, karti chidambaram, cbi, ED, indrani mukharjea, delhi, court,

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी अखेर चिदंबरम यांना सीबीआयने काल रात्री उशिरा घरात घुसून अटक केली. आज दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजार केले जाणार आहे. चिदंबरम यांना अटक करण्यामागे आयएनएक्स मीडियाचे मुखर्जी दांपत्य यांची साक्ष असल्याची चर्चा असून ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात या साक्षीचा उल्लेख आहे त्याआधारेच चिदंबरम यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला असं एनडीटीव्हीने सूत्रांच्या आधारे सांगितल आहे.

काय आहे ती साक्ष ?

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याच्या प्रकरणी मुखर्जी दांपत्याची चौकशी ईडीने केली होती. तेंव्हा इंद्राणी मुखर्जीनी सांगितल्यानुसार आयएनएक्स मीडियाच्या प्रोजेक्टला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड मंजुरी देत नव्हते. याबाबत नॉर्थ ब्लॉक मधील कार्यालयात मुखर्जी यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. तेव्हा माझ्या मुलाला व्यवसायात मदत करा,असं चिदंबरम यांनी सांगितलं होतं. त्यानंतर दिल्लीमध्ये एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुखर्जी दाम्पत्य कीर्ती चिदंबरमला भेटलं होतं. तेव्हा आयएनएक्सचा प्रश्न सोडवण्यासाठी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी करत परदेशातील बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याची त्यांनी विनंतीही केली, तसंच ही रक्कम अदा करण्याचे दुसरे मार्गही सुचवले होते अशी साक्ष इंद्राणी यांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here