केस पातळ होणे, केसांना फाटे फुटाणे, डोक्याच्या मध्यभागी टक्कल पडणे, केस पांढरे होणे या सगळ्यावर रामबाण उपाय
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात केसांबद्दलच्या सारख्याच समस्या आहेत. जसे कि, केसांचे गळणे आणि केस पांढरे होणे इत्यादी. मुख्य म्हणजे आजकाल हि समस्या वयाच्या खूप लवकर वाढायला लागली आहे. केस पातळ होणे, केसांना फाटे फुटाणे, डोक्याच्या मध्यभागी टक्कल पडणे, केस पांढरे होण्या सोबतच केसांमध्ये डँड्रफ वाढणे आणि सारखे केस गळणे यांसारख्या सामान्य समस्यांमुळे आपले केसं खराब होतात.
केसांच्या संबंधीत कोणतीही समस्या जर उद्भवली तर ती हळूहळू वाढतच जाते आणि या समस्यांवर प्रत्येक प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला काही खास फरक जाणवत नाही. ज्यामुळे प्रत्येकवेळी केस विंचरताना किंवा केस धूत असताना आपले केस जास्त प्रमाणात गळून पडतात आणि पांढऱ्या केसांना लपवण्यासाठी आपल्याला डाय करण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. पण जर केसांची काळजी घेण्यासाठी आपण काही खास घटकांचा नियमित वापर केला तर, केसांबाबतीत वाढणाऱ्या प्रत्येक समस्या थांबवल्या जाऊ शकतात.
आज आपण अशाच काही प्रभावी तेलाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे केसांचे पांढरे होणे, केसांचे गळणे आणि केस पातळ होणे या समस्या पूर्णपणे नाहीश्या करून तुमच्या केसांची वाढ लवकरात लवकर होईल. या तेलाचा खासकरून पांढरे होणाऱ्या केसांवर आणि केस गळतीवर जास्त प्रभाव पडतो. तर चला पाहूया हे तेल नक्की कसे तयार करायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा.
हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची गरज लागेल.
१) मेहंदी
२) आवळा पावडर
३) ऑलिव्ह ऑइल
४) एरंड तेल
कृती:
१) एखाद्या भांड्याला (तवा किंवा कढई) माध्यम आंचेवर गॅसवर गरम करायला ठेवावे.
२) त्या भांड्यामध्ये अडीच चमचा मेहंदी आणि २ चमचा आवळ्याची पावडर टाकावी आणि दोन्ही गोष्टी एकत्रत कराव्या आणि माध्यम आंचेवर शेकून द्यावे. याला मिश्रणाला तितक्यावेळ भाजून द्यावे, जोपर्यंत त्या पावडरचा रंग हलकासा काळा होत नाही. काळा रंग झाल्यावर गॅस बंद करा आणि त्या मिश्रणाला थंड होण्यासाठी सोडून द्या.
३) थंड झाल्यांनतर या मिश्रणाला एखाद्या काचेच्या भांड्यात टाकावे. त्या भांड्यात १०० मिली एरंड्याचे तेल आणि १५० मिली ऑलिव्ह ऑइल टाकावे आणि सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.
४) त्यांनतर त्या काचेच्या भांड्याला झाकण लावून ४ ते ५ दिवसांसाठी उन्हामध्ये ते भांडे ठेवावे. कारण, उन्हामध्ये हे मिश्रण ठेवल्याने आवळा आणि मेहेंदी मधील सर्व “चारकोल” चे गुण या तेलामध्ये उतरतात. उन्हामध्ये ठेवल्यांनंतर हे तेल तयार होईल.
वापरण्याची पद्धत:
१) या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा केसाच्या मुळावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावी. हे तेल तुमच्या केसांना लावून रात्रभर तसेच ठेवावे. आणि सकाळी केसांना धुवावे. लालशात ठेवा रात्रभ केसांना तेल ठेवल्यानंतर सकाळी लगेच केस धुणे आवश्यक आहे.
२) तेल लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी कि, केसांना तेल लावताना तेलाचे प्रमाण तेवढेच ठेवावे जेवढे तेल तुमच्या सर्व केसांना पुरेल. जास्त तेलाचा वापर करू नये.
३) तेल सर्व केसांना लावू नये फक्त केसांच्या मुळाशी लावावे.
हे तेल इतके प्रभावी आहे कि, तुम्हाला एक आठवड्यातच फरक जाणवायला सुरुवात होईल. जर तुम्ही या तेलासाठी वापरलेली आवळा पावडर, ऑलिव्ह ऑइल, एरंडे तेल, आणि मेहंदी हे सर्व घटक चांगल्या क्वालिटीचे वापरले नाही तर, होणाऱ्या प्रभावमध्ये फरक जाणवू शकतो. जर तुम्हालाचांगला प्रभाव पाहिजे असेल तर प्रयत्न करा कि, मेहंदीची पान आणि आवळा घरीच सुकवून त्याची घरीच पावडर बनवता येईल. असे केल्याने तयार केलेल्या तेलाचा प्रभाव तुमच्या केसांवर १० पटीने वाढतो.
ये भावड्या हे बी वाच –
- वजन वाढवणे आणि कमी करण्यासाठी अंडी खाण्याची योग्य पद्धत
- या ७ गोष्टी कधीही एकत्र खाऊ नका, शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम
- अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे लईभारी फायदे.
सूचना – लईभारी जीवनशैली बाबत देत असलेल्या विविध टिप्स या अनेक Newspaper, Magazine तसेच माहितीपुस्तिका मधून घेण्यात आलेले आहेत. सदरची माहिती गोळ्या करून विविध तज्ज्ञ लोकांशी संवाद साधून आपल्याला सादर करण्यात येते. हि माहिती आपल्याला हुबेहूब गुण आणेल याची कोणतीही शाश्वती नाही. तेव्हा आपण याचा प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.