राग येणं हे स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली कि माणसाला राग येतो. तुम्हालाही राग येऊन गेल्यावर पश्चाताप होतो का ?
राग येणं हे स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली कि माणसाला राग येतो. पण राग हा माणसाचा शत्रू आहे असे नेहमीच सगळे म्हणतात. रागामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो.
आपण आपल्या रागावर ताबा ठेवला पाहिजे. तंज्ञानांनुसार जेव्हा राग येतो तेव्हा माणसामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते जेव्हा तो रागात असतो. हृदयावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी आपण आपल्या रागावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
राग शांत करण्यासाठी लईभारी टिप्स वापरा आणि तुमचा राग नियंत्रणात आणा –
- तुमचा राग तुम्ही अजिवित वस्तूंवर काढायचा प्रयत्न करा जसं कि पिक्चर मध्ये हेरॉईन राग आल्यावर डान्स करते तर हिरो पंचिंग बॅग वर मारतो.
Source – iStock
- अनेकदा आपण राग आल्यावर रागात काहीही बोलतो, वागतो त्यामुळे राग व्यक्त करण्याआधी दीर्घ श्वास घेत जा. हा खूपच परिणामकारक उपाय आहे. यामध्ये रागामुळे निर्माण झालेली ऊर्जा कमी होते.
- भारतीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रमाणे मेडिटेशन अनेक रोगांवर उपायकारक आहे. रोज सकाळी अर्धा तास मेडिटेशन केल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल ज्यामुळे राग कमी तर होईल पण तुमचे कामावर लक्ष सुद्धा केंद्रित होईल.
Source – iStock
- एखाद्यावर राग आल्यावर त्याच्याशी किंवा इतर कोणाशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचा बाजूला निघेल आणि संवादांमुळे त्या गोष्टी आरामात सुटू शकतात.
- काही गोष्टी प्रासंगिक असतात पण आपण त्याच गोष्टी डोक्यात व विचार करतो. काही वेळा अनेकांना सवय असते मनात राग धरून ठेवण्याची त्यामुळे त्यांना त्रास होण्याची जास्त शक्यता असते. यावर एकच उपाय आहे लोकांना माफ करायला शिका आणि पुढे चालत राहा.
ये भावड्या हे बी वाच –
- वजन वाढवणे आणि कमी करण्यासाठी अंडी खाण्याची योग्य पद्धत
- या ७ गोष्टी कधीही एकत्र खाऊ नका, शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम
- अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे लईभारी फायदे.