आज भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे देश आहेत, पण १९४७ च्या विभाजनापूर्वी ते एकाच होते. पाकिस्तानमध्ये हजारो ऐतिहासिक मंदिरे आहेत. पूर्वी पाकिस्तानची जमीन आर्यांची प्राचीन भूमी होती. पाकिस्तानमध्ये सुमारे ७० टक्के सिंधु नदी वाहते. सिंधु, सरस्वती आणि गंगा नदीच्या दिशेने भारतीय संस्कृती आणि सभ्यता विकसित झाली. असे म्हटले जाते की सिंधूशिवाय हिंदू संस्कृती अपूर्ण आहे.
पाकिस्तानमध्ये, हडप्पा आणि मोहनजोदाडो या प्राचीन शहरांचे अवशेष सापडले आहेत. जगातील पहिले विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानमध्ये विभाजनानंतर हिंदू धर्माची शेकडो मंदिरे नष्ट करण्यात आली. कित्येक मंदिरे नष्ट केली गेली आहेत आणि त्यांचे प्राचीन महत्त्व काय आहे हे आपल्याला माहित नाही. आजही जी मंदिरे आहेत ती दुर्लक्षित आहेत. त्यात काही मंदिरांना पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
१. कटास राज मंदिर
पाकिस्तान मध्ये हिंदू धर्माचे सगळ्यात मोठे शंकराचे कटास राज मंदिर आहे. लाहोर पासून २७० किमी अंतरावर चकवले जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे. या मंदिराजवळ एक सरोवर पण आहे. असे सांगितले जाते कि देवी पार्वती सती झाल्यानंतर शंकराच्या डोळ्यातून पाणी निघाले आणि त्यांच्या आश्रुंची दोन थेंब जमिनीवर पडले आणि याच अश्रुंच्या थेंबाचे विशाल सरोवरामध्ये रूपांतर झाले. या सरोवराविषयी असे सांगण्यात येते कि या सरोवरामध्ये स्नान केल्यास मानसिक शांतता मिळते आणि दुःख, दारिद्र्य पासून सुटका मिळते.
या मंदिराचा संबध महाभारताशी देखील आहे. कौरवा सोबत युद्ध हरल्यानंतर पांडवाने पाण्याच्या शोधात या सरोवराजवळ आले होते. इथे आल्यानंतर यक्ष ने त्यांची परीक्षा घेतली होती. याच मंदिरात चार वर्ष राहून पांडवांनी शिवलिंगाची पूजा केली होती. पण हे मंदिर पाकिस्तान सरकारकडून दुर्लक्षित झाले आहे. कट्टर पंथीयांच्या वाढत्या प्रभावामुळे या मंदिराची जीर्ण अवस्था झालेली आहे. परिस्थितीवरून असा अंदाज लावता येतो कि पाकिस्तान सरकारने कटासराज मंदिराच्या कुंडाला एक सिमेंट फॅक्टरीच्या कंपनीला विकले होते. पण २००५ मध्ये अडवाणी पाकिस्तान मध्ये गेल्यावर पाकिस्तान सरकारला या मंदिराच्या पुनर्निमितीसाठी आग्रह केला. कटासराज मंदिर ९०० वर्ष जुने आहे. या मंदिराच्या आजूबाजूस राम, हनुमान आणि शिव मंदिर बघायला मिळतात.
२. हिंगलाज देवी मंदिर
पाकिस्तान मधील हिंदू धर्माचे दुसरे सगळ्यात मोठे मंदिर हिंगलाज देवीचे आहे. हिंगलाज देवीचे मंदिर हिंगलाज देवी, हिंगुला देवी, तसेच नानी मंदिर या विविध नावांनी ओळखले जाते. या देवीला ५१ देवीच्या शक्तिपीठामध्ये स्थान आहे. पुरातन कथेनुसार इथे देवी सतीचे डोके पडले होते असे सांगण्यात येते. हिंगलाज देवीचे मंदिर पाकिस्तानने जबरद्स्तीने व्यापलेल्या पर्वत बलुचिस्तानच्या हिंगोल नदीजवळील हिंगलाज परिसर निसर्गाच्या सानिद्यात असल्या मुळे इथे आलेल्या व्यक्तीचे परत वापस जाण्याची इच्छा होत नाही.
असे सांगण्यात येते कि सतीच्या मृत्यू नंतर नाराज झालेल्या शंकरानी येथेच त्यांचे तांडव नृत्य संपवले होते तसेच असाही समाज आहे कि रावणाच्या मरणानंतर रामाने इथेच तपश्चर्या केली होती. भारत पाकिस्तानच्या फाळणीआधी लाखो श्रद्धाळू लोक इथे येत होते. पण आता बदलत्या परिस्थितीनुसार आणि सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे मंदिराची स्थिती वाईट झालेली आहे. इथे येणाऱ्या श्रद्धाळुंची पण संख्या खूप कमी झाली आहे. पण येथील स्थानिक लोकांना या मंदिराचे महत्त्व अधिक असून हे मंदिर वाचवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.
३. पंचमुखी हनुमान मंदिर
प्राचीन पूर्व काळातील हे पंचमुखी हनुमान मंदिर असून इथली मूर्ती हजारो वर्ष जुनी आहे असा अंदाज आहे. सांगण्यात येते कि या मंदिरात स्वतः श्री हनुमान आले होते, त्यामुळे याचा सबंध रामायणाशी येतो. या मंदिराच्या बांधकामा विषयी विशिष्ट अशी काही माहिती नाहीये. पण प्रचलित कथेनुसार आता सध्या जिथे मंदिर आहे, तिथे एक तपस्वी साधना करत असत. एके दिवशी तपस्वींच्या स्वप्नात हनुमान आले आणि त्यांना हनुमानजींनी सांगितले कि मी या जागेवर खाली पाताळात निवास करत आहे. तुम्ही माझी याठिकाणी स्थापना करा.
त्या जागेवर तपस्वीने ११ मूठ माती काढल्यावर हनुमानाची मूर्ती प्रकट झाल्याने या मंदिरात ११ या संख्येला अधिक महत्त्व आहे. असेही सांगण्यात येते कि मंदिराला ११ प्रदक्षिणा घातल्यावर मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पंचमुखी हनुमानच्या दर्शनांसाठी भक्तांची नेहमी गर्दी असते. या मंदिरात हिंदू लोकांसोबतच इतर धर्माचे लोकसुद्धा दर्शनासाठी येत असतात. अद्भुत अशी येथील हनुमानाची मूर्ती आहे आणि अजून एक पंचमुखी हनुमानाचे मंदिर कराची येथे शोल्जर बाजारात बनलेले आहे.
४. शारदा देवी मंदिर
सरस्वती देवी समर्पित पाकिस्तान अधिकृत काश्मिर मध्ये नीलम घाटात हिंदू धर्माचे मंदिर स्थित आहे. शारदा देवी हे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराविषयी असे सांगण्यात येते कि शंकर येथून यात्रेसाठी निघाले होते. भक्तांसाठी हे मंदिर खूप विशेष होते. पण आतंकवादी आणि कट्टरपंथी यांच्यामुळे आता हे मंदिर पूर्णपणे जीर्ण झाले आहे. यासारखे अनेक विविध मंदिरं पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित झालेले आहेत, त्यामुळे काही मंदिरे हि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.