परमाणु परीक्षणाची तयारी एवढी गोपनीय पद्धतीने केली होती की पोखरणच्या ज्या जागेवर हे परीक्षण होणार होते त्या जागेवर विविध खेळ आयोजित केले जायचे आणि यामुळेच अमेरिकेचे सॅटेलाइट सुद्धा त्यांना पकडू शकले नाही.
इतिहास तेच लोक घडवतात जे जगाची काळजी करत नाहीत. एकोणीस वर्षांपूर्वी भारताने सुद्धा काही असेच काम केले होते ज्यामुळे पूर्ण जगाला 440 व्होल्ट चा झटका लागला. 11 मे 1998 ला राजस्थान मधील पोखरण मध्ये भारताने शक्ती नामक परमाणु चाचणी करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. या परमाणू चाचणी ची कहाणी खूप रोचक आहे व या घटनेबाबत लोकांना फारशी माहिती नाही.
भारताच्या परमाणु चाचणी ची कहाणी 43 वर्षापूर्वी च लिहिली होती. 18 मे 1974 च्या सकाळी आकाशवाणी च्या दिल्ली केंद्रावर बॉबी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध गाणे चालू होते. ज्याचे बोल आहेत” हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाये”
ठीक नऊ वाजता गाणे अचानक बंद केले गेले घोषणा करण्यात आली आणि सांगण्यात आले एक महत्त्वपूर्ण प्रसारणाची प्रतीक्षा करा काही सेकंदांनंतर रेडिओ वर एक आवाज आला आणि सांगण्यात आलं की आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटाला भारताने पश्चिमी भारतातील एका अज्ञात ठिकाणी शांती पूर्वक कार्यासाठी भूमिगत परमाणु चाचणी केली आहे. आणि ते अज्ञात ठिकाण होते पोखरण जिथे भारताने पहिली वेळस ” स्मायलिँग बुद्धा” या नावाने परमाणु चाचणी केली होती आणि भारत एक परमाणु शक्ति राष्ट्र बनला होता.
परंतु पोखरण-1 च्या परीक्षणानंतर 24 वर्षानंतर 11 मे 1998 ला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री” अटल बिहारी वाजपेयी” यांनी जसे परमाणु चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा केली तसे अमेरिका सहित संपूर्ण जग आश्चर्यचकीत झाले.
सन 1998 साली परमाणु चाचणीची जबाबदारी देशाचे पूर्व राष्ट्रपती ए.पि.जे. अब्दुल कलाम जवळ होती. डॉ. कलाम त्यावेळी DRDO म्हणजे” संरक्षण संशोधन विकास” या संस्थेचे प्रमुख होते. व रक्षा मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार होते. हे परीक्षण एवढे सोपे नव्हते 9 एप्रिल 1998 ला अटल बिहारी वाजपेयी यांनी डॉ. कलाम व डाँ.आर. चिदंबरम यांच्याशी मुलाखत केली. डॉ. आर चिदंबरम हे त्यावेळचे परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी दोघांना विचारले की परमाणु चाचणीसाठी किती वेळ लागेल या प्रश्नाला डॉ. कलाम उत्तरले 30 दिवस.
त्यानंतर प्रधानमंत्री चे तत्कालीन प्रमुख सचिव ब्रिजेश मिश्रा यांच्याशी चर्चा केल्यानंतर परीक्षणासाठी 10 मे ही तारीख निश्चित करण्यात आली पण तत्कालीन राष्ट्रपती “के.आर. नारायण” हे 26 एप्रिल ते 10 मे यादरम्यान अमेरिकेच्या ददौऱ्यावर होते.
भारताच्या राष्ट्रपतींना या परमाणू परीक्षणाबाबत काहीही माहिती नव्हती आणि त्यांच्या विदेश दौऱ्यादरम्यान असे करणे कूटनीतिक विचारानुसार योग्य नव्हते. या परमाणू परीक्षणाच्या अगोदर अमेरिका आपल्या “स्पाई सेटलाईट” च्या मदतीने भारतावर नजर ठेवून होते. त्यावेळी भारतात होणाऱ्या प्रत्येक बारीक हालचालीवर अमेरिकेचे लक्ष होते.
भारत ने परमाणु परीक्षणाची तयारी एवढी गोपनीय पद्धतीने केली होती की अमेरिकेचे सॅटेलाइट सुद्धा त्यांना पकडू शकले नाही. काही वैज्ञानिक आणि मोजके लोक सोडले तर या परीक्षणाबाबत कोणालाही काहीच माहिती नव्हती. असेही म्हटले जाते की पोखरणच्या ज्या जागेवर हे परीक्षण होणार होते त्या जागेवर विविध खेळ आयोजित केले जायचे.
जसे वैज्ञानिकांना माहिती व्हायचे की अमेरिका व अन्य देशाचे सॅटेलाईट ची त्यांच्यावर नजर नाही तेव्हा ते लगेच परीक्षणाचे काम चालू करायचे. असेही म्हटले जाते की परीक्षणासाठी लागणारे साहित्य आलू व कांद्याच्या ट्रकमध्ये भरून आणले जाई. ही परीक्षण निवडे गोपनीय होती की पोखरणच्या च्या आजूबाजूच्या गाववाल्याना सुद्धा याची काहीच माहिती नव्हती.
परमाणु चाचणी यशस्वी होताच डाँ.कलाम यांनी हॉटलाईनवरून अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी बोलले. अटल बिहारी वाजपेयी या फोनचा अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि डाँ.कलाम यांनी फक्त एवढेच सांगितले की “एक बार फिर बुद्ध मुस्कुरा उठे है!!” कारण चाचणी यशस्वी झाल्याचा हा कोड होता. आणि त्यांनी फोन कट केला.
यानंतर भारतावर अनेक प्रतिबंध लादण्यात आली पण अटलबिहारी वाजपेयींनी जगाला सांगितले की भारताचा मिजास किती सक्त होऊ शकतो.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निर्णयामुळे भारताला जगात एक परमाणु शक्ति ने प्रस्थापित केले होते. हा परमाणु बॉम्ब अमेरिकेने टाकलेल्या हिरोशिमा येथील बॉम्ब पेक्षा चार पट अधिक शक्तिशाली होता. काही दिवसापूर्वीच या ऐतिहासिक गोष्टीला 20 वर्षे पूर्ण झाली प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
जय हिंद….
मस्त
आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.
आपली “लई भारी” वेबसाईट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका.
Nice
आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.
आपली “लई भारी” वेबसाईट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका.