ब्रिटिशांना खुन्नस देत जमशेदजी टाटांनी मुंबईत अलिशान ‘हॉटेल ताज’ उभं केलं

jamsetji tata biography, jamsetji tata organizations, jamsetji tata biography, jamsetji tata in marathi, Jamsetji Nusserwanji Tata, Taj Mahal Palace, taj hotel history, hotel taj in marathi, जमशेदजी टाटा, टाटा ग्रुप, हॉटेल ताज महल पॅलेस

एका कार्यक्रमात ब्रिटिशांनी भारतीयांचा केलेला अपमान जमशेदजी टाटा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांनी याचा बदला घेण्याचं ठरवलं

भारतातील सर्व लोकांच्या मनात टाटा उदयोगसमुहाविषयी आदराचे स्थान आहे. टाटा समूहाची ज्यांनी स्थापना केली त्या जमशेदजी टाटा यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. देशा-विदेशात सगळीकडे पसरलेल्या या यशस्वी उद्योग समूहाच्या निर्माणाची गोष्ट अतिशय रोचक आहे.

गुजरात राज्यातील छोट्याशा नवसेर नावाच्या गावात जमशेदजी यांचा जन्म १८३९ साली एका पारशी कुटुंबात झाला. आईचे नाव जीवनबाई टाटा व वडीलांचे नाव नुसीरवानजी टाटा होते. त्यांचे वडील पारसी समुदायातील पहिले व्यावसायिक होते. १४ व्या वर्षापासुन जमशेदजी यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टान कॉलेजला प्रवेश घेतला व याच दरम्यान ते हीरा बाई दबू यांच्याशी विवाहबद्ध झाले. १८५८ पर्यंत त्यांनी स्वतःला पूर्णपणे व्यवसायात वाहून घेतले.

jamsetji tata biography, jamsetji tata organizations, jamsetji tata biography, jamsetji tata in marathi, Jamsetji Nusserwanji Tata, Taj Mahal Palace, taj hotel history, hotel taj in marathi, जमशेदजी टाटा, टाटा ग्रुप, हॉटेल ताज महल पॅलेस
jamsetji tata biography, jamsetji tata organizations (Source – Rediff)

२९ व्या वर्षापर्यंत वडिलांचा व्यवसाय सांभाळल्यानंतर २१,००० रुपायांमधून स्वतंत्र व्यवसाय चालू केला. त्या काळात डबघाईला आलेली तेल गिरणी विकत घेऊन त्यांनी ती कापुस गिरणीत परावर्तित केली. २ वर्षानंतर चांगल्या नफ्यानिशी त्यांनी ती गिरणी विकून १८७४ साली नागपूर येथे रुई कारखाना चालू केला. त्याच काळात राणी व्हिक्टोरियाला भारताची राणी हा किताब मिळाला होता, जमशेदजींनी समयसूचकता ओळखुन या कारखान्याचे नाव इम्प्रेस मिल असे ठेवले.

नंतर ब्रिटिश राजवटीतच त्यांचे व्यवसाय व व्यापार क्षेत्रातील जाचक नियम असताना देखील जमशेदजींनी आपली यशस्वी घोडदौड देश-विदेशात चालू ठेवली. परदेशात जाऊन तिथल्या औद्योगिक क्षेत्रातील गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी त्या गोष्टी देशात राबवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदूषणाविषयी जागरूकता ठेऊन त्यांनी कापड कारखान्यांच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरातून मुक्त करणारी विकसित अशी जलविद्युत प्रणाली अस्तित्वात आणली.

त्यांनी मुंबईला दिलेल्या आलिशान हॉटेल ताजची गोष्ट पण अशीच रोमांचकारी आहे

अरबी समुद्राच्या उसळलेल्या लाटांच्या किनाऱ्यावर मुंबईच्या भूमीवर कुलाबा येथे दिमाखात उभ्या असलेल्या ताज हॉटेल आजही शानदार दिसतो. औद्योगिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी ताज हॉटेल बांधायचा निर्णय का घेतला ?

jamsetji tata biography, jamsetji tata organizations, jamsetji tata biography, jamsetji tata in marathi, Jamsetji Nusserwanji Tata, Taj Mahal Palace, taj hotel history, hotel taj in marathi, जमशेदजी टाटा, टाटा ग्रुप, हॉटेल ताज महल पॅलेस
jamsetji tata in marathi, Jamsetji Nusserwanji Tata, Taj Mahal Palace (Source – Moneycontrol)

हि गोष्ट आहे एका भारतीयाच्या झालेल्या अपमानाची व त्या बदल्यात घेतलेल्या बदल्याची. त्या काळात सिनेसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लुमायर बंधुंनी त्यांच्या पहिल्या सिनेमाचा शो त्या काळच्या मुंबईच्या आलिशान वॉटसन हॉटेलमध्ये 7 जुलै,1896 ला ठेवला होता. त्या सिनेमाच्या शो साठी मोठ्या प्रमाणात ब्रिटिश लोक हजर होते. जमशेदजी टाटा यांना पण तो सिनेमा पाहायचा होता, परंतु त्यांना तेथे प्रवेश नाकारला गेला.

वॉटसन हॉटेलच्या बाहेर त्या काळात एक पाटी अडकवलेली असायची त्यावर लिहिलं असायचं “lndian and Dogs are not allowed”

जेंव्हा टाटांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला तेंव्हा त्यांना खूप वाईट वाटलं व दोन वर्षांनंतर त्यांनी वॉटसन हॉटेलपेक्षा कैक पटीने आलिशान असं हॉटेल बांधण्यास सुरुवात केली.

५५० खोल्या, ४४सुईट्स, ९ रेस्टॉरंट असलेल्या ताज हॉटेलचे आर्किटेक्ट म्हणून सीताराम खंडेराव वैद्य व डि. एन. मिरझो यांनी काम पाहिले. भारतीय आणि युरोपीय वास्तुशैलीतील हे हॉटेल मुंबईचे पहिले हॉटेल होते ज्यात वीज होती. १६ डिसेंबर १९०३ साली हे हॉटेल सर्वांसाठी खुले करण्यात आले.

त्या काळात ताज हॉटेल बाहेर एक पाटी असायची त्यावर लिहिलेले होतं, “British and Cats are not allowed”….

पण असंही म्हटलं जातं की टाटांनी त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरून हॉटेल क्षेत्रात पाऊल टाकलं कारण त्या काळात मुंबईमध्ये भारतीय लोकांची चांगली हॉटेल्स नव्हती. या सर्वांचा एकत्रीत विचार करून ताज हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात झाली.

jamsetji tata biography, jamsetji tata organizations, jamsetji tata biography, jamsetji tata in marathi, Jamsetji Nusserwanji Tata, Taj Mahal Palace, taj hotel history, hotel taj in marathi, जमशेदजी टाटा, टाटा ग्रुप, हॉटेल ताज महल पॅलेस
taj hotel history, hotel taj in marathi, जमशेदजी टाटा, टाटा ग्रुप, हॉटेल ताज महल पॅलेस (Source – vagabomb)

कधी मुंबईला जाण्याचा योग आला तर ताज हॉटेल नक्की बघा व जमशेदजी टाटा यांच्या देशभक्तीवर गर्व करा, ज्यांनी मुंबईला व आपल्या देशाला ताज दिला. तसेच औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राव्यतिरिक इतर बाबतीतही जमशेदजी टाटा उदार व्यक्तिमत्वाचे होते, औद्योगिक क्रांतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना कल्पना होती, त्यांनी देशवासियांना तसेच मुख्यतः मजुरांना,गिरणीकामगारांना यापासून वाचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यात वाचनालय, बागा, औषधालाय यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली.

ज्यावेळेस फक्त ब्रिटिश व पाश्चिमात्य देश औद्योगिकीकरण मध्ये आघाडीवर होते त्या काळात जमशेदजींनी भारतीय औद्योगिक क्षेत्राचा मार्ग जगाच्या नकाशावर समृद्ध केला व भारताची मान अभिमानाने उंच केली. आजही टाटा समुह त्याच जोमाने जमशेदजी यांचं कार्य पुढे नेत आहे. एकही क्षेत्र असे नाही जिथे टाटा समूहाची गरुडझेप नाही. आजही रतनजी टाटा यांनी टाटा समूहाची कमान अतिशय यशस्वीपणे सांभाळली आहे. या सर्वाचा पाया रचणाऱ्या आणि भारताच्या विकासामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या जमशेदजी टाटा या सच्चा देशभक्ताला आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.

4 COMMENTS

    • धन्यवाद..!
      तुमच्या मित्रांसोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.

    • धन्यवाद..!
      तुमच्या मित्रांसोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here