WWE ची ‘लई भारी’ दुनिया…. बघा काय खरं आणि काय खोटं

WWE, खेळ, wwe games, WWE खरे की बनावट, कसा आहे wwe, World Wrestling Entertainment, wwe in marathi, लोकप्रिय खेळ, wwe wrestlers, wwe full form, wwe superstars salary, wwe salaries 2018, john cena, wwe facts, wwe income

“WWE मधली मारामारी तुम्हाला खरी वाटत असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणं गरजेचं आहे”

6 ते 7 फुट उंचीचे तगडे पैलवान, भव्य व डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, एकाचवेळी 30 ते 40 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक बसू शकतील असे मोठमोठे स्टेडियम्स, अंगावर शहारे आणणारे संगीत व प्रत्येक फायटरची दिमाखदार एंट्री व त्या एंट्रीमुळे मैदानातील, स्टेडीयम मधील प्रेक्षाग्रहात प्रेक्षकांचा साजरा होणारा जल्लोष. हे सगळं तुम्ही आम्ही लहान असताना पाहिलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कुठल्या खेळाबद्दल बोलतोय कारण, भारतात तर क्रिकेट वगळता असा कुठलाच खेळ नाही ज्याविषयी आम्हाला फारशी माहिती आहे.

मित्रांनो ! भारतात, महाराष्ट्रात कुस्ती हा प्रकार तसा प्रसिद्ध व लोकप्रिय आहे, पण मी जो वरील उल्लेख केलेला आहे तो आपल्या भारतीय पद्धतीच्या कुस्तीबद्दल नाही, मी बोलतोय अमेरिकेतील प्रसिद्ध खेळ डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) याविषयी. अर्थात याला खेळ म्हणायचं का नाटक हा प्रश्न मलाही पडलाय कारण, यातील बर्‍याचशा चाली, हालचाली आपल्या बुद्धीच्या तर्कावर न टिकणार्‍या आहेत आणि आणखीन एक बाब म्हणजे कुठल्याही खेळाला नियम असतात पण ह्या WWE नावाच्या खेळाचं जरा वेगळच प्रकरण आहे. लहान मुलांमध्ये या खेळाचं प्रचंड आकर्षण आहे पण, खरतर हा खेळच नाहीये. होय ! हा खेळ नसून निव्वळ मनोरंजनपर कार्यक्रम आहे, प्रेक्षकांच मनोरंजन व्हावं या हेतूने लिहिली गेलेली एक मनोरंजनपर कथा असं म्हणता येईल असं या खेळाचं, त्यातील होणार्‍या कुस्तीचं एकूण स्वरूप असतं.

WWE, खेळ, wwe games, WWE खरे की बनावट, कसा आहे wwe, World Wrestling Entertainment, wwe in marathi, लोकप्रिय खेळ, wwe wrestlers, wwe full form, wwe superstars salary, wwe salaries 2018, john cena, wwe facts, wwe income
Is WWE for real (Source – Youtube)

कसा झाला या खेळाचा जन्म ? कधी झाली या कुस्तीची सुरवात ?

या खेळाला प्रोफेशनल रेसलिंग असही म्हटल्या जातं. हा मनोरंजनपर खेळ आहे आणि त्या खेळाचे आयोजन व मालकी हक्क वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेंट (World Wrestling Entertainment) या कंपनीकडे असून ही कंपनी इतर अन्य व्यवसाय जसे की मनोरंजन, सिनेमा, जमीन विक्री-खरेदी, इत्यादी व्यवसायांमध्ये सुद्धा सक्रिय आहे. ह्याची सुरुवात झाली 1952 साली, जेस मॅकमोहन व त्याच्या अन्य एका सहकार्याने या मनोरंजनपर खेळ अर्थात प्रोफेशनल रेसलिंग किंवा wwe या खेळाची सुरुवात केली आणि आज हा खेळ अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. तो इतका लोकप्रिय झालाय की 150 देशांमध्ये मिळून सुमारे 36 दशलक्ष प्रेक्षक ह्या खेळाला पसंद करतात, त्यापैकी कित्येकजण असे आहेत की ते याचा एकही भाग चुकवत नाहीत.

या WWE कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय अमेरिकास्थित कनेक्टिकट इथे आहे. हा खेळ पुर्णपणे मनोरंजनपर असून ह्यातील घडणारे सर्व प्रसंग, तुम्हाला दाखविण्यात येणारी प्रत्येक फाईट ही एखाद्या नाटकाप्रमाणे रचण्यात आलेली असते, त्यामुळे जर कुणी या खेळाला, या नाटकाला खरे मानत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. कारण कोणत्या फाईटमध्ये कोण जिंकणार हे आधीच ठरलेले असते.

अतिशय नाट्यमय पद्धतीने ती कुस्ती तुमच्या समोर सादर केलेली असते जेणेकरून तुमची उत्कंठा टिकून राहावी, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा खेळ खेळणे अगदीच सोपे व सुरक्षित आहे. ह्या खेळातील चाली ज्याला “मूव्स” असं म्हटलं जातं ती अत्यंत जोखमीची असतात आणि ती करताना थोडी जरी चूक झाली तर गंभीर दुखापत उद्भवू शकते, ज्यामुळे बरेच खेळाडू अपंग सुद्धा झालेले आहेत.

WWE, खेळ, wwe games, WWE खरे की बनावट, कसा आहे wwe, World Wrestling Entertainment, wwe in marathi, लोकप्रिय खेळ, wwe wrestlers, wwe full form, wwe superstars salary, wwe salaries 2018, john cena, wwe facts, wwe income
Shane McMohan, the wwe owner (Source – 1063thebuzz)

1989 पर्यंत या खेळाचं खरं स्वरूप उघड करण्यात आलेलं नव्हतं पण 1989 साली WWE या कंपनीचे मालक विन्स मॅकमोहन यांनी हे स्पष्ट केलं की WWE हा खेळ नसून एक मनोरंजनपर कार्यक्रम आहे. विन्स मॅकमोहनने हे उघड केलं, स्वतःच्या कंपनीस अथेलेटीक कमिशन द्वारा लावण्यात येणार्‍या करापासून मुक्ति मिळावी म्हणून. आपल्या कंपनीस भरावा लागणार्‍या करापासून मुक्ति मिळावी म्हणून मॅकमोहन यांनी WWE या खेळाचं खरं रूप जाहीर केलं अन्यथा जगाला या खेळाचं खरं रूप समजलं नसतं व आपण हे सर्व खरंचं मानलं असतं.

वर नमूद केल्याप्रमाणे, या WWE कंपनीचे मालकी हक्क व्हीन्स मॅकमोहन व त्यांच्या कुटुंबियांकडे आहेत. 1982 ते 1998-99 या कालावधीत हा खेळ WWF या नावाने ओळखला जात असे पण, 1999 साली त्याचे नाव बदलून WWE असे ठेवण्यात आले. 1985 साली या मनोरंजनपर खेळाचं प्रक्षेपण टीव्हीवर करण्यात आलं आणि त्यामुळे या WWE नावाच्या खेळाला जी लोकप्रियता लाभली ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

कसं ठरतं की कोण जिंकणार ? किंवा कसं ठरतं की कोण होणार चॅम्पियन ?

कोण जिंकणार कोण हरणार हे आधीच ठरलेलं असतं, जसं की चित्रपटात अंतिम विजय नायकाचाच होणार हे जसं निश्चित असतं तसचं इथे सुद्धा तोच जिंकतो जो लोकांचा हीरो असतो. जो लोकप्रियतेच्या शिखरावर असतो अंतिम विजय त्याचा हे साधं गणित. हां ! मात्र कधीकधी आपल्याला म्हणजेच पाहणार्‍याला चकित करण्यासाठी त्या लोकप्रिय फायटरला हारलेलं दाखवलं जातं. अर्थात, हे सर्व दाखवण्यामागे आणि ह्या संपूर्ण खेळामागे प्रचंड आर्थिक गणित दडलेले आहे हे वेगळं सांगायला नकोच.

कसं आहे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मागचं अर्थकारण ?

WWE वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचंड नफा कमावते याचं कारण आहे या खेळाची प्रचंड लोकप्रियता. WWE ज्या माध्यमांद्वारे प्रचंड पैसा कमावते त्याची आपण थोडक्यात माहिती घेवूयात.

WWE मीडिया : यात डिजिटल मीडिया, दुरचित्रवाहिनी, “पे पर व्यू” इत्यादींचा समावेश होतो. WWE मीडिया द्वारे जी अफाट कमाई होते त्याची अंदाजे रक्कम आहे सुमारे 456 मिलियन डॉलर. विचार करा! 456 मिलियन डॉलर ही रक्कम किती प्रचंड मोठी आहे व यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ह्या खेळामागचं अर्थकारण किती मोठं आहे, पण फक्त एवढच WWE च्या कमाईचं माध्यम आहे असं नाही. या व्यतिरिक्त, लाईव्ह इव्हेंट्समुळे कंपनीला 144 मिलियन डॉलर उत्पन्न मिळतं.

WWE, खेळ, wwe games, WWE खरे की बनावट, कसा आहे wwe, World Wrestling Entertainment, wwe in marathi, लोकप्रिय खेळ, wwe wrestlers, wwe full form, wwe superstars salary, wwe salaries 2018, john cena, wwe facts, wwe income
(Source – Sportskeeda)

ग्राहकोपयोगी उत्पादने जसे की कपडे, हॅट्स इत्यादी अतिशय लोकप्रिय बनतात कारण ती उत्पादने प्रेक्षकांचे आवडते खेळाडू, मल्ल वापरतात. त्याची विक्री केली जाते व या माध्यमातून मिळणारे उत्पन्न आहे सुमारे 107 मिलियन डॉलर.

सिनेमा व मनोरंजन क्षेत्र ज्यात WWE सुपरस्टार्स अभिनय करतात असे चित्रपट व कार्यक्रम हयातून मिळणारे उत्पन्न आहे सुमारे 10 दशलक्ष डॉलर. ह्यात जे खेळाडू प्रसिद्ध होतात त्यांना हॉलीवुडचा प्रवास अधिक सोपा होऊन जातो आणि म्हणूनच WWE ह्या प्रोफेशनल रेसलिंगमध्ये झळकलेले अनेक खेळाडू हॉलीवुडमध्येही नाव कमावतात. अर्थात हे सर्व सोपं निश्चित नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत, सराव, आहार, व्यायाम इत्यादी बाबी सांभाळणे अत्यंत आवश्यक असते, त्याशिवाय ह्या WWE च्या दुनियेत तुम्ही पाऊल ठेवूच शकत नाही व बरोबरीनेच थोडा बर्‍यापैकी अभिनय ही तुम्हाला यायला हवा, कारण आपण आधीच बोललो त्यानुसार हा खेळ कमी व मनोरंजनपर नाटक जास्त आहे. बरं आता ह्या WWE खेळामुळे फक्त WWE कंपनीच गब्बर झाली आहे का ? तर तसं नाही, ह्यातील खेळाडू ज्यांना WWE चे चाहते सुपरस्टार म्हणतात ते ही ह्या खेळाच्या माध्यमातून प्रचंड कमाई करतात. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकात सर्वाधिक कमाई करणारे WWE खेळाडू, यांची यादी दिली आहे ती खालील प्रमाणे.

कोण आहेत WWE मधील सर्वाधिक कमाई करणारे सुपरस्टार्स ?

  • ब्रॉक लेसनर – 12 मिलियन अमेरिकन डॉलर
  • जॉन सेना – 8 मिलियन अमेरिकन डॉलर
  • ट्रिपल एच – 3.8 मिलियन अमेरिकन डॉलर
  • रोमन रेगान्स – 3.5 मिलियन अमेरिकन डॉलर
WWE, खेळ, wwe games, WWE खरे की बनावट, कसा आहे wwe, World Wrestling Entertainment, wwe in marathi, लोकप्रिय खेळ, wwe wrestlers, wwe full form, wwe superstars salary, wwe salaries 2018, john cena, wwe facts, wwe income
John Cena is one of the most decorated superstars in WWE history (Source – sportskeeda.com)

अजून बरीच नावे आहेत, वरील नावे फक्त उदाहरणादाखल दिली ज्यामुळे लक्षात येईल की हे खेळाडू किती पैसे कमावतात आणि खरं सांगायचं म्हणजे हे खेळाडुच या WWE नावाच्या खेळाचे चेहरे आहेत ज्यामुळे प्रेक्षक या खेळाकडे आकर्षित होतो. मी ह्या खेळाला चांगले किंवा वाईट म्हणणार नाही पण बर्‍याच पालकांच्या मते ह्यामुळे लहान मुलांच्या मनावर वाईट संस्कार घडून ते हिंसक बनतात आणि त्या पालकांचं म्हणणं अगदीच खोटं आहे असं मला तरी वाटत नाही. तर मित्रांनो, हा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला या WWE या खेळाविषयी माहिती देण्याचा. आता कुणी कधी तुम्हाला म्हणालं की WWE मधली मारामारी खरी असते तर त्या तुमच्या मित्राला हा लेख नक्की वाचायला सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here