पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या हातात नेहमी एक ब्रीफकेस किंवा सूटकेस असते हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का ? एवढ्या छोट्या बॅग मध्ये पंतप्रधान काय ठेवत असतील बरं ?
आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की भारतात पंतप्रधानांच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ म्हणजेच SPG या संस्थेकडे असते. फक्त वर्तमान पंतप्रधानच नाही तर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जवाबदारी सुध्दा SPG ह्याच संस्थेकडे आहे.
पंतप्रधान जिथे कुठे जातील तिकडे SPG चे नेमबाज कमांडो त्यांच्या मार्गावर तैनात असतात. एसपीजीच्या सर्व जवानांकडे आधुनिक शस्त्र-अस्त्र असतात, उदाहरण द्यायचे झाले तर एफएनएफ-२०००, असॉल्ट रायफल, स्वयंचलित बंदुका आणि पिस्तूल, ज्याला १७-एम म्हणतात. पण जर पंतप्रधानांना इच्छा नसेल तर काही ठिकाणी तेही सुरक्षा घेण्यास नकार देऊ शकतात.
पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या हातात नेहमी एक ब्रीफकेस किंवा सूटकेस असते हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का ? तुम्ही 26 जानेवारीच्या परेडमध्ये पंतप्रधान जेव्हा येतात तेव्हा ही सुटकेस स्पष्टपणे बघू शकता. परंतु त्यांच्या ब्रीफकेसमध्ये काय असेल याची उत्सुकता तर नक्कीच आपल्या सगळ्यांना असेलच!
ही सूटकेस म्हणजे प्रत्यक्षात सुटकेस नसून एक न्यूक्लियर ढाली सारखी असते जी पंतप्रधानांपासून काही फूट अंतरावर धरून हे बॉडी गार्ड उभे असतात आणि ही सूटकेस खूप बारीक असते. खरं तर ही सुटकेस म्हणजे एक पोर्टेबल बुलेटप्रुफ ढाली सारखी उघडते किंवा हल्ल्यात पटकन संरक्षण देण्यासाठी उपयोगात येते. काहीही भीती, शंका असेल तर पंतप्रधानासाठी ही शिल्ड म्हणजेच ढाल उघडली जाते, संरक्षण करण्यासाठी ह्या सुटकेसला खाली फक्त एक झटका दिला की ती उघडून जाते आणि एक ढाल म्हणून कार्य करते जे विशिष्ट परिस्थिती मध्ये तत्काळ पण तात्पुरते संरक्षण देते. सुरक्षित स्थळी पोहोचेपर्यंत पंतप्रधानांना हि ब्रिफकेस सुरक्षित ठेवते.
या ब्रीफकेसमध्ये एक गुप्त खिसा सुध्दा असतो ज्यात पिस्तूल ठेवलेले असते. एस पी जी बरोबरच काउंटर अटॅक टीम (CAT) देखील मदतीला असते. या दलाकडे ही अत्याधुनिक शस्त्रे असतात. जसे, एफ. एन -२०००, पी-९०, ग्लॉक -१७, ग्लॉक -१९ आणि एफएन -५ सारख्या शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. या दलामध्ये सैनिकांना अतिशय कठोर प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाते म्हणजे कोणत्याही हल्ल्यादरम्यान पंतप्रधानांना सुरक्षा देऊन अतिजलद कारवाई ते करतात.
आता पुढे तुमच्या मनात हे आले असेल की SPG म्हणजे काय आणि कोण ह्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करू शकतात ?
तर थोडक्यात सांगायचे झाले तर, SPG देशातील नेत्यांनाच नाही तर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाहुण्यांना सुद्धा देशाच्या हद्दीत संरक्षण देतात. प्रत्येक संभाव्य धोक्याचा नाश करून ते संपुर्ण संरक्षण त्या व्यक्तीस देऊ शकतात. SPG हे दल कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत येते आणि SPG चे महानिदेशक भारतीय पोलिस दलाचे अधिकारी असतात.
SPG चे कमांडो हे सेंट्रल सशस्त्र पोलिस फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या दोन दलांच्या कर्मचाऱ्यांमधून निवडतात. एस पी जी दल हे विशिष्ट एका व्यक्तीला सतत आणि सर्वोच्च संरक्षण देण्यासाठीच खास नियुक्त असतात. त्यांचे संपुर्ण काम हे त्या एका विशिष्ट व्यक्तीला संरक्षण देणे हेच असते. हे कमांडो अतिशय चपळ आणि तत्परतेने काम करतात.