कोहिनुर हिऱ्याचा झोप उडवणारा इतिहास

2631
kohinoor, kohinoor diamond, kohinoor diamond history in marathi, kohinoor diamond price, kohinoor diamond facts, kohinoor diamond images, kohinoor diamond history,कोहिनुर हिरा, कोहिनुर हिऱ्याचा इतिहास

कोहिनूर हिऱ्याला शापित हिरा या नावाने संबोधले जाते आणि त्यामागील कारणही तसेच आहे. बघा तुम्हाला पटतंय का ?

जगात प्रत्येक वस्तूची किंमत लावली जाते पण एक वस्तू अशी सुद्धा आहे की जीची किंमत आजवर कुणीही लावू शकले नाही, ही वस्तू एक हिरा आहे ज्याचे नाव आहे “कोहिनूर”. कोहिनूर (Kohinoor) हा पारसी भाषेतील एक शब्द आहे त्याचा अर्थ होतो चमकता डोंगर अथवा पर्वत. कोहिनुर भारताच्या एका खाणीमध्ये सापडला होता हा हिरा भारताचाच आहे पण जवळपास 160 वर्षांपासून हा हिरा ब्रिटनच्या महाराणीच्या मुकुटात चमकत आहे. ह्या आधी हा हिरा पंजाबचे महाराजा दलीप सिंह यांच्या जवळ होता.

या प्रश्नावर नेहमीच विवाद चालू असतो की, महाराजा दलीप सिंहाने महाराणीला हा हिरा भेट म्हणून दिला की इंग्रजाकडून हारल्या नंतर इंग्रजांनी हा हिरा बळकावून घेतला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एक RTI समिती नेमण्यात आली आणि या समितीद्वारे भारत सरकारने हे उत्तर दिले की, इंग्रजाकडून हरल्यानंतर महाराजा दलीप सिंहला मजबूरीने हा हिरा इंग्रजांच्या स्वाधीन करावा लागला. तुम्ही असेही म्हणू शकता की, भारताने ब्रिटनला कोहिनूर (Kohinoor) भेट म्हणून दिला नव्हता, तो त्यांनी जबरदस्तीने भारताकडून बळकावून घेतला होता. त्यात तुम्हाला असेही वाटत असेल की आता या सर्व घटनांचा काही उपयोग नाही कारण या घटनेला 170 हून अधिक वर्षे झालीत, पण यात भारत सरकारचे उत्तर खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आता कोहिनुर हिऱ्यावर भारताचा दावा आणखीनच मजबूत झाला आहे.

kohinoor, kohinoor diamond, kohinoor diamond history in marathi, kohinoor diamond price, kohinoor diamond facts, kohinoor diamond images, kohinoor diamond history,कोहिनुर हिरा, कोहिनुर हिऱ्याचा इतिहास

Kohinoor in Queen Victoria’s Crown (Source – India Today)

भारताऐवजी पाकिस्तान, इराण व अफगाणिस्ताने कोहिनूरवर दावा सांगितला

जर पंजाबचे महाराजा दलीप सिंह यांनी हा हिरा महाराणीला भेट म्हणून दिला असता म्हणजेच स्वईच्छेने दिला असता तर भारताचा यावर काहीही अधिकार अथवा दावा नसता कारण भेट म्हणून दिलेल्या वस्तूवर कधीही आपला अधिकार नसतो. पण आता भारत कोहिनूर हिर्‍यावर आणखी मजबुतीने दावा करू शकतो. भारताऐवजी पाकिस्तान, इराण व अफगाणिस्ताने सुद्धा हा हिरा आमचा आहे असा दावा केला आहे, पण कोहिनूर फक्त भारताचाच आहे कारण हा हिरा भारताचे राज्य आंध्रप्रदेशच्या कुल्लुर येथील खाणीत सापडला होता.

भारतीय पुरातत्त्व विभागाने हे उत्तर लुधियानातील रोहित सबरवाल यांच्या RTI रिपोर्टच्या साहाय्याने दिले आहे. रोहित सबरवालने कोहिनूर हिरा लंडन येथील एका संग्रहालयात बघितला होता. या संग्रहालयात याबद्दल सूचना देण्यात आली की हा हिरा भारताकडून भेट देण्यात आला आहे. भारतात परतल्यानंतर रोहित सबरवालने प्रधानमंत्री कार्यालयात RTI दाखल करून सरकारला प्रश्न विचारला. भारत सरकारकडून या प्रश्नाचे उत्तर आले की, National Archives of India च्या मतानुसार वर्ष 1849 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल Lord Dalhousie व महाराजा दलीप सिंह (Maharaja Duleep Singh) या दोघांमध्ये लाहोरचा तह झाला होता त्यात कोहिनूर हिरा ब्रिटनच्या महाराणीला देण्यात आला.

कोहिनूर हीरा जिंकल्यानंतर ब्रिटिश गव्हर्नर Lord Dalhousie ने सांगितले की, कोहिनूर कित्येक दशकांपासून विजयाचे प्रतीक आहे व आता हा हिरा योग्य माणसाच्या हाती आहे. जर भारताच्या इतिहासात झाकून बघितले तर Lord Dalhousie ने अगदी योग्य टिप्पणी केली होती, कारण इतिहासात ज्या व्यक्तीकडे कोहिनूर असायचा त्याच व्यक्तीचे अथवा राजाचे भारतावर राज्य असायचे.


Maharaja Duleep Singh (Source – NeoPunjabi)

कोहिनुर हिऱ्याची किंमत किती ?

आपल्यापैकी बर्‍याच जणांनी कोहिनूर हे याचे नाव ऐकले असेल पण बघितला कोणीच नसेल, हा हिरा ब्रिटनच्या महाराणीच्या मुकुटात चढवण्यात आला आहे. या मुकुटात शेकडो हिरे लावण्यात आले आहेत आणि त्यात कोहिनूर हिरा सापडने थोडं अवघड आहे, पण तुम्ही आहे याचे फोटो पाहू शकता.

हा हिरा पारदर्शी आहे म्हणजेच हिऱ्याचा नेमका असा कोणताही रंग नाही. आजपर्यंत कोणीही या हिऱ्याची किंमत ठरवू शकला नाही या हिऱ्याची एकच किंमत आहे ती म्हणजे हिम्मत व ताकद. कोहिनूर हिरा ज्यांनी आजवर मिळवला आहे त्यांना युद्ध हाच एक पर्याय अवलंबावा लागला आहे. हा हिरा जेव्हा लाहोर हुन लंडनला गेला तेव्हा त्याचे वजन 191 कॅरेट होते पण ब्रिटनच्या राणीच्या मुकुटात बसवण्यापूर्वी हा हिरा तासण्यात आला आणि त्याचे वजन आता 105.5 कॅरेट झाले आहे.

भारताने स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये पहिल्यांदा ब्रिटनकडून कोहिनूर हिऱ्याची मागणी केली होती आणि तेव्हापासून चार वेळा भारताने हिरा परत मागण्याचे प्रयत्न केले होते पण ब्रिटन आपल्या जुन्या स्वभावावर आजही कायम आहे. भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला पण कोहिनूर आजही इंग्रजांचा गुलामीत आहे. 1947 व्यतिरिक्त 1953 मध्ये जेव्हा ब्रिटनच्या राणीचा राज्याभिषेक होणार होता तेव्हाही भारताने कोहिनूर हिऱ्याची मागणी केली होती तसेच 2000 मध्ये भारताचा विधीपालांनी पत्राद्वारे याची मागणी केली होती.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास

ह्या हिऱ्याची संपूर्ण कहाणी (History of Kohinoor) भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहीत पाहिजे. “ज्याच्याजवळ कोहिनूर हिरा त्याच्याजवळ हिंदुस्थानची सत्ता” हे वाक्य त्या लोकांनी उद्गारले, ज्यांनी कोहिनूर हिऱ्या साठी रक्ताचा सडा घातला. वर्ष 1526 मध्ये पानिपतच्या लढाईनंतर कोहिनूर हिरा मुगल बादशाह बाबरकडे आला व त्याचा मुलगा हुमायूने कोहिनूर हिऱ्याची किंमत विचारली असता बाबरने उत्तर दिले…..

….ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्याकडे कोहिनूर आहे.

kohinoor, kohinoor diamond, kohinoor diamond history in marathi, kohinoor diamond price, kohinoor diamond facts, kohinoor diamond images, kohinoor diamond history,कोहिनुर हिरा, कोहिनुर हिऱ्याचा इतिहास
Babur and Humayun about Kohinoor (Source – Crafty Cristian)

काही विद्वानांच्या मते कोहिनूर हिरा महाभारताच्या काळातील स्यमंतक मणी आहे, श्रीमद्भगवद्गीतेच्या एका कथेनुसार स्यमंतक साठी कित्येक वेळा युद्ध झाले ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णही सामील झाले होते तर काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, अनेक दशकापासून हा हिरा मालवांच्या राज्यात होता पण 1304 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने हा हिरा मालवाच्या राजाकडून बळकावला, सध्याच्या मध्य प्रदेशच्या काही भागाला इतिहासात मालवा असे म्हणत असत.

त्यानंतर बरीच वर्ष कोहिनूर दिल्लीच्या दरबारात म्हणजेच खिलजी वंश, तुगलक वंश, लोदी वंशाच्या सुलतानाकडे होता. पण 1526 मध्ये मुगल सम्राट बाबरने हा हिरा जिंकला. पाचवे मोगल बादशहा शहाजहानने विश्व प्रसिद्ध मयूर सिंहासनामध्ये हा हिरा बसवला. या घटनेनंतर मोगल साम्राज्याचे पतन सुरू झाले.

वर्ष 1739 मध्ये इराणचा सरदार नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले व कोहिनूर मोगलांकडून बळकवुन घेतला पुढे 1747 मध्ये नादिर शाहच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा आफगाणी राजा अहमदशहा अब्दालीच्या हाती लागला. अब्दाली नंतर त्याचा पुत्र शाहसुजा कोहिनूर हिर्‍याचा मालक बनला नंतर दुर्रानी साम्राज्याशी युद्ध झाल्यानंतर शाहसुजा सिंहासनावरून पायउतार झाला तेव्हा त्याने पंजाबचा महाराजा रणजीत सिंह यांची मदत मागितली या मदतीच्या मोबदल्यात रणजित सिंह यांनी कोहिनूर हिऱ्याची मागणी केली व त्यांची ही मागणी शाहसुजाने मान्य केली.

त्यानंतर हिरा पंजाबच्या शिख शासकांची शान वाढवत राहिला.

Maharaja Ranjit Singh helped Shahsujan and asked for Kohinoor Diamond (Source – Indiatimes.com)

तोपर्यंत इंग्रजांनी भारतात पाय रोवायला सुरुवात केली होती. त्यांची नजर पंजाब कोहिनूर हिऱ्या वर होती 1839 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या मृत्यूनंतर पंजाब मध्ये युद्ध सुरू झाले शेवटच्या काळात हिरा महाराजा दलीप सिंहच्या खजाण्यात होता. दलीप सिंह व इंग्रजांमध्ये भयानक युद्ध झाले व शेवटी 12 मार्च 1849 मध्ये दिलीप सिंहाने आत्मसमर्पण केले व त्यानंतर हा हिरा ब्रिटिश गव्हर्नर Lord Dalhousie कडे पोहोचला.

तसे कोहिनूर हिऱ्याला शापित हिरा या नावाने संबोधले जाते कारण हा हिरा ज्या साम्राज्याकडे गेला त्या साम्राज्याचा नाश झाला. सगळ्यात अगोदर हा शाप इराणी सरदार नादीर शहा याला लागला कोहिनूर हिरा मिळाल्याच्या अगदी काही वर्षातच नादिरशहाचे मानसिक संतुलन बिघडले व तो मृत्यू पावला तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की ब्रिटनच्या महाराणीच्या मुकुटात हा हिरा लावल्यानंतर ब्रिटेन साठी सुद्धा शाप बनला कारण 1950 पर्यंत ब्रिटनचे जवळपास संपूर्ण जगावर राज्य होते व कोहिनूर मिळाल्यानंतर हे त्यांचे राज्य संपुष्टात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here