काश्मिरात अजूनही फडकतोय लाल झेंडा, अधिकाऱ्याने दिलं धक्कादायक उत्तर

1668
kashmir, flag, article 370, india

जोपर्यंत कलम ३७० अस्तित्वात होतं तोवर जम्मू काश्मीरचे नियम व कायदे वेगळे होते. तसंच जम्मू काश्मीर राज्याचा स्वतःचा वेगळा झेंडा देखील होता. पण आता कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आलंय. कलम रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणेच एक राज्य बनलं आहे पण ह्या निर्णयाला ४८ तास उलटून गेले तरीही जम्मू काश्मीरच्या अनेक सरकारी कार्यालयांवर काश्मीरचा लाल झेंडा अजूनही फडकत आहे.

कलम ३७० आणि ३५ अ रद्द होऊनसुद्धा वेगळा झेंडा का काढण्यात आला नाही असे संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता, आम्हाला अजूनपर्यंत झेंडा काढण्याचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. एकदा आम्हाला तसे आदेश मिळाले कि आम्ही जम्मू काश्मीरचा असलेला स्वतंत्र झेंडा काढून टाकू असे हा अधिकारी म्हणाला.

kashmir, flag, article 370, india
Kashmir Flag (Source – News Ind Express)

कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानंतर व जम्मू काश्मीर व लद्दाख हे दोन वेगळे व केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आल्यानंतर हे दोन्ही प्रदेश आता थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणात आले आहेत. काल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी देशाला संबोधित करतांना कलम ३७० आणि ३५अ रद्द करण्याचा आपला उद्देश आणि जम्मू काश्मीर व लद्दाख ह्या प्रदेशांची पुढील वाटचाल ह्याविषयी माहिती दिली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लवकरच निवडणुका होतील व लवकरच जम्मू काश्मीरला विधानसभा मिळेल असेही मोदी म्हणाले. लद्दाख मात्र केंद्रशासित प्रदेशच राहील असेही त्यांनी ह्यावेळी सांगितले.

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मिरात कोणतीही अनुचित घटना घडू नये ह्यासाठी तिथल्या १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या राज्यात शांतता असून मोठ्या प्रमाणावर लष्करी व पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here