मनोहर पर्रीकरांच्या साधेपणाचे कधीही न ऐकलेले लई भारी किस्से

1244
manohar parrikar, goa cm, manohar parrikar kisse, manohar parrikar health, manohar parrikar death, manohar parrikar in marathi, manohar parrikar on scooty, मनोहर पर्रीकर, मनोहर पर्रीकरांचे किस्से, मनोहर पर्रीकर माहिती

रविवारी ( ता. १७) गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. त्यांच्यावर बऱ्याच महिन्यापासून त्यांचा निवासस्थानीच उपचार चालू होते. परंतु, अखेरीस त्यांनी १७ मार्च रोजी आपला श्वास सोडला. हि बातमी ऐकताच सर्व देशामध्ये खासकरून गोव्यामध्ये शोकाकुलाचे वातावरण तयार झाले. अनेक नेत्यांनी, कलाकार मंडळींनी, खेळाडूंनी पर्रीकरांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

पर्रीकरांसारखे अत्यंत साधे आणि तल्लख बुद्धीचे व्यक्तीमत्व असणारा माणूस कुठेच नाही. ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या देशाची सेवा करत राहिले. त्यांचा राजकारणातील प्रवास खूप प्रेरणादायी होता. पर्रीकरांचा आधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण मंत्री अश्या प्रवासामध्ये त्यांचा साधेपणा कुठेही हरवलेला दिसला नाही. त्यांच्यातील साधा माणूस हीच त्यांची मुख्य ओळख होती.

पर्रीकरांचे व त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, त्यातील काही किस्से खालिलप्रमाणे,

१) आपण हे नेहमी बघत असतो कि, मंत्रीगण नेहमी त्यांच्या विशेष गाड्यांमधून प्रवास करत असतात. परंतु, मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अश्या कोणत्याही विशेष गाड्यांचा उपयोग न करता त्यांच्या स्कुटीवर ऑफिसला जात असत. खूपवेळा गोव्याच्या लोकांनी त्यांना स्कुटीवर जाताना पाहिले आहे.

manohar parrikar, goa cm, manohar parrikar kisse, manohar parrikar health, manohar parrikar death, manohar parrikar in marathi, manohar parrikar on scooty, मनोहर पर्रीकर, मनोहर पर्रीकरांचे किस्से, मनोहर पर्रीकर माहिती
(Source – www.jagran.com)

२) तसेच, मंत्र्यांना राहण्यासाठी सरकारकडून विशेष घर दिले जाते. पण पर्रीकर त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्येच राहत असत.

३) जेव्हा पर्रीकर यांच्या मुलाचे लग्न होते, तेव्हा अनके मोठ्या मोठ्या हस्ती, मंत्री लग्नाला आले होते. सर्वजण चांगल्या खादीच्या कपड्यांमध्ये आणि सूट घालून आले होते. पण पर्रीकर त्यांच्या सध्या शर्ट आणि पॅन्टवरच सर्वांचे स्वागत करत होते.

४) पर्रीकर संरक्षणमंत्री असताना २०१६ मध्ये मुंबई आयआयटीमध्ये येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याक्षणी त्यांना त्यांचे जुने शिक्षक भेटले आणि लगेचच त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा विचार न करता त्या मंचावरच त्यांच्या शिक्षकाच्या पाया पडले.

manohar parrikar, goa cm, manohar parrikar kisse, manohar parrikar health, manohar parrikar death, manohar parrikar in marathi, manohar parrikar on scooty, मनोहर पर्रीकर, मनोहर पर्रीकरांचे किस्से, मनोहर पर्रीकर माहिती
(Source – Twitter)

५) मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री असूनही पर्रीकर नेहमी इकोनॉमी क्लासनेच प्रवास करत आलेत. अनेकवेळा त्यांच्यासोबत प्रवास करत असणाऱ्या प्रवाश्यांनी त्यांना ओळखल्यावर त्यांच्यासोबत गप्पा मारत, सेल्फी काढत, त्यांना ऑटोग्राफ देत. विमानांपर्यंत जाण्यासाठी व्हिआयपी गेटने जाण्याऐवजी सामान्य जनतेप्रमाणेच प्रवाशांच्या रांगेत राहायचे आणि बोर्डिंग बसमधुन जायचे. तसेच, ते त्यांचे स्वतःचे सामन स्वतः उचलत असत.

(Source – Facebook)

६) २००१४ साली पर्रीकर गोवा फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी गेले होते. पण तेव्हा ते त्या समारंभात जास्त वेळ न बसता पोलिसांसोबत समारंभाच्या ठिकाणाबाहेरील वाहतुक नियंत्रण करण्यामध्ये जुंपले होते.

७) एकदा पर्रीकर एका लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते आणि चक्क ते त्या रिसेप्शनच्या रांगेत उभे होते. पर्रीकरांचा रांगेत उभा राहिलेला फोटो इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल झाला होता.

manohar parrikar, goa cm, manohar parrikar kisse, manohar parrikar health, manohar parrikar death, manohar parrikar in marathi, manohar parrikar on scooty, मनोहर पर्रीकर, मनोहर पर्रीकरांचे किस्से, मनोहर पर्रीकर माहिती
Manohar Parrikar (Source – Maharashtra Times)

८) पर्रीकर अनेकदा गोव्यातील त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन जेवण करायचे. त्यांचा हा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

(Source – Facebook)

९) पर्रीकर त्यांच्या कामाबाबत खूप निष्ठा बाळगायचे, ते त्यांच्या ऑफिस मध्ये दर दिवशी १५-१६ तास काम करायचे. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची खूप काळजी असायची. एकेदिवशी पर्रीकर आणि त्यांचे स्पेशल ड्युटी असणारे (OSD) ऑफिसर गिरीराज वर्नेकर हे दोघे मिळवून एका प्रोजेक्टवर चर्चा करत बसले होते. चर्चा करताना बराच वेळ होत गेला आणि त्यांनी त्यांची चर्चा लवकर आटपून घेतली. गिरीराज वर्नेकर यांनी जाताना पर्रीकरांना विचारले कि, ‘सर उद्या किती येऊ?’ तेव्हा पर्रीकर म्हणाले, ‘जरा उशिरानेच यऊ शकता, साधारण ६:३० पर्यंत आलात तरी चालेल.’ वर्णेकरांना जरा नवलच वाटले. जेव्हा वर्नेकर सकाळी ६:१५ ला मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले कि, साहेब पहाटे ५:१५ वाजल्यापासूनच ऑफिसमध्ये काम करत आहे.

१०) शिस्त आणि वक्तशीरपणा असणारे पर्रीकर तेवढेच त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठी आणि लोकांसाठी हळवे होते. मार्च २०१२ साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलदन्हा यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला होता. तेव्हा पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेल्याचे अनेक लोकांनी पाहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here