एका मामुली व्हिलनचा मुलगा आज मोठमोठ्या सुपरस्टार्सचाही बॉस आहे

rohit shetty father, rohit shetty movies, rohit shetty family, rohit shetty father photo, M.B. Shetty, rohit shetty background, rohit shetty biography, rohit shetty information, rohit shetty in marathi, रोहित शेट्टी, रोहित शेट्टी वडील, रोहित शेट्टी माहिती, रोहित शेट्टी विकी, रोहित शेट्टी बायोग्राफी, रोहित शेट्टी मुव्हीज

पैसा वसूल ! कडक ! पोट दुखेस्तोवर हसलो, थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की समजायचं, हा नक्की रोहित शेट्टीचा चित्रपट असणार. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे 2 तास धमाल हे आता समीकरण बनून गेलं आहे. एका पाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट देणाऱ्या, लोकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या अशा या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा आज 14 मार्चला वाढदिवस आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट व्यवसायाशी संबंध त्याच्या जन्मापासूनच आहे.

तुम्हाला आठवत असेल, अमिताभ बच्चन किंवा धर्मेंद्रच्या चित्रपटात एक आडदांड, टक्कल असलेला व्हिलन नेहमी दिसायचा, त्याचं नाव मुधु बलवंत शेट्टी. हेच रोहितचे वडील. हे अतिशय प्रसिद्ध फाईट मास्टर होते. रोहितची आई रत्ना शेट्टी ह्यासुद्धा चित्रपटात स्टंट करत असत. त्यामुळे रोहितच्या रक्तातच चित्रपट भिनलेला होता असं म्हणायला हरकत नाही. रोहितची चित्रपटाची पहिली आठवण म्हणजे तो लहान असताना ‘शालिमार’ चित्रपटाच्या शूटिंगला मंगलोरला गेला होता. ते त्याच्या आठवणीतले पहिले आउटडोअर शूटिंग, त्यामुळे आजही तो चित्रपट त्याच्या आठवणीत आहे.

rohit shetty father, rohit shetty movies, rohit shetty family, rohit shetty father photo, M.B. Shetty, rohit shetty background, rohit shetty biography, rohit shetty information, rohit shetty in marathi, रोहित शेट्टी, रोहित शेट्टी वडील, रोहित शेट्टी माहिती, रोहित शेट्टी विकी, रोहित शेट्टी बायोग्राफी, रोहित शेट्टी मुव्हीज
Rohit Shetty’s late father MB Shetty (Source – bollywoodbubble.com)

लहानपणी शूटिंग पाहिल्यानंतर त्याने वडिलांना प्रश्न विचारला, की एक माणूस दहा – दहा माणसांना कसा मारू शकतो ? त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं, “कारण तो हिरो आहे”. हे उत्तर रोहिताच्या डोक्यात फिट बसलं. म्हणून तो गमतीत म्हणतो की “म्हणून माझे हिरो हवेत उडून फाईट करतात”. वयाच्या सतराव्या वर्षीच रोहित, कुकू कोहलींकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाला लागला. त्याचा पहिला चित्रपट होता ‘फुल और कांटे. त्यानंतर रोहितने कुकू कोहलींबरोबर सुहाग, हकीकत, जुलमी असे चित्रपट केले. मग अनिस बज्मी ह्यांच्याबरोबर ‘प्यार तो होना ही था’ केला.

rohit shetty father, rohit shetty movies, rohit shetty family, rohit shetty father photo, M.B. Shetty, rohit shetty background, rohit shetty biography, rohit shetty information, rohit shetty in marathi, रोहित शेट्टी, रोहित शेट्टी वडील, रोहित शेट्टी माहिती, रोहित शेट्टी विकी, रोहित शेट्टी बायोग्राफी, रोहित शेट्टी मुव्हीज
Rohit Shetty old pictures (Source – Bollywood Journalist)

हिंदुस्तान की कसम, राजू चाचा, अशा चित्रपटात सहाय्य्क दिगदर्शक म्हणून काम केल्यावर 2003 साली दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे त्याचा पहिला चित्रपट आला, ‘जमीन’, अजय देवगण, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू सारखे कलाकार असूनसुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला नाही. 2006 साली त्याचा चित्रपट आला, ज्याचं नाव होतं “गोलमाल : फन अनलिमिटेड”, ह्या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. ह्या चित्रपटाचे आत्तापर्यंत तीन सिक्वेल झाले आहेत, आणि सगळेच अत्यंत यशस्वी ठरले.

एकाच चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित होणं हा हिंदी चित्रपटसृष्टीत एक विक्रम आहे. तसाच सिंघम आणि त्याचा सिक्वेल सिघम रिटर्न्स हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करून गेले. बोल बच्चन, चेन्नई एक्स्प्रेस हे सुद्धा त्याचे गाजलेले चित्रपट. सिंघम रिटर्न्स ह्या चित्रपटाद्वारे त्याने निर्माता म्हणून स्वतःची नवीन कारकीर्द सुरु केली. रोहितला त्याच्या ऑफिसमध्ये नवीन नवीन कलेक्शन करायचा शौक आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकरची, त्याने भेट दिलेली बॅट आहे.

rohit shetty father, rohit shetty movies, rohit shetty family, rohit shetty father photo, M.B. Shetty, rohit shetty background, rohit shetty biography, rohit shetty information, rohit shetty in marathi, रोहित शेट्टी, रोहित शेट्टी वडील, रोहित शेट्टी माहिती, रोहित शेट्टी विकी, रोहित शेट्टी बायोग्राफी, रोहित शेट्टी मुव्हीज

Rohit Shetty (Source – indiawest.com)

बॅटमॅन सिरीजमध्ये जी कार वापरली गेली होती, त्या कारच्या डिसमेंटल केलेल्या सुट्या भागांतून एक प्रदर्शनीय कार बनवण्यात आली, ती कारही त्याच्याकडे आहे. वीरू देवगण ह्या सुप्रसिद्ध फाईट मास्टरकडे त्याने असिस्टंट म्हणून काम केलं होतं, त्यामुळे त्याला स्टंट करायचा शौक आहे. ‘खतरों के खिलाडी’ ह्या टीवी शोद्वारे त्याने आपली तीही हौस भागवून घेतली. कॉमेडी सर्कसमध्येही त्याने परीक्षक म्हणून काम पाहिलं. त्याला नवनवीन गाड्या वापरण्याचा शौक आहे. थांबायचं नाही हा त्याच्या जीवनाचा मंत्र आहे. नुकताच आलेल्या त्याच्या ‘सिम्बा’ ह्या चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली. रोहितने मात्र लगेच त्याच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू देखील केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here