स्वामी विवेकानंद करोडो भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. फक्त भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रत्येक तरुणाने त्याच्या अडचणीतून वाटचाल करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची मदत घ्यावी एवढं थोर व्यक्तिमत्व. कोलकाता इथे 12 जानेवारी 1863 ला स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. ते बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांचे इतर कार्य आपल्याला माहितीच आहे. पण स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र खूप कमी जणांना माहिती आहे. या लेखामध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कार्याचा आढावा घेत, त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडन्याचा प्रयत्न करूयात.
आपणा सर्वांना माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरू मानले होते. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच भगवी वस्त्र परिधान करत इतर सर्व स्वार्थाचा त्याग केला होता. त्यासोबतच त्यांनी भारताला समजून घेण्यासाठी संपूर्ण भारतभर पायी प्रवास केलेला आहे. स्वामी विवेकानंद एकमेव असे पुरुष होते ज्यांना अध्यात्म आणि विज्ञान हे वेगळे वाटत नसे. त्यांना या गोष्टीची कल्पना होती की भारत दर्शन केल्याशिवाय, विश्वाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवता येणार नाही आणि भारतीय संस्कृती सारखी दुसरी आदर्श संस्कृती संपुर्ण विश्वात शोधुन सापडणार नाही.
स्वामी विवेकानंदांनी भारतामध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली आणि रामकृष्ण परमहंस यांचे विचार संपूर्ण जगामध्ये पसरवण्यास सुरुवात केली. त्यांचे विचार पसरवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी देश विदेशामध्ये रामकृष्ण मिशन मार्फत अनेक मठांची स्थापना केली.
कसा होता शेवटचा दिवस ?
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 1902 मध्ये झाला हे सर्वांना माहितच आहे. स्वामी विवेकानंद यांना जवळपास 31 हुन अधिक आजार जडले होते. या आजारांमुळे त्यांना निद्रानाशाचा ही त्रास होत असे. अंतिम दिवशी त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावून “नवीन विवेकानंदाची भारताला गरज आहे”, असे विधान केले.
त्यांनी त्या दिवशी त्यांच्या दिनक्रमामध्ये कुठलाही बदल घडू दिला नाही. ते रोज दोन ते तीन तास ध्यान करत असत. त्यादिवशीही ते ध्यानासाठी बसले आणि अनंतात विलीन झाले. त्यांचे अंतिम संस्कार गंगेच्या किनार्यावरती चंदनाच्या लाकडांपासून रचलेल्या चितेवरती करण्यात आले. त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी रामकृष्ण परमहंस यांच्यावरही अंतिम संस्कार करण्यात आले होते. ज्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी इहलोकाचा त्याग केला त्यावेळी त्यांचे वय मात्र 39 वर्षे होते.
असे म्हणतात की स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या मृत्यू बद्दल आधीच भविष्यवाणी केली होती. त्यांनी भविष्यवाणीमध्ये असे म्हटले होते की ते वयाच्या चाळीसाव्या वर्षांपर्यंतच जिवंत राहतील आणि या प्रकारे त्यांनी महासमाधी घेत आपली भविष्यवाणी खरी ठरवली. अशा प्रकारे एक योगी अनंतात विलीन झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी खर्च केले.
ये भावड्या हे बी वाच –
नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत
जेव्हा पुण्यात गांधीजींच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आलेला
मेक इन इंडियाची खरी सुरवात १८८८ साली झालेली, तेही एका मराठी उद्योजकाच्या हातून