झोपण्याआधी मोबाईलचा वापर टाळा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप कराल

4687
मोबाईल चे दुष्परिणाम, लठ्ठपणा, तणाव, अपुरी झोप, मोबाईलचा वापर, Stop Using Your Smartphone at Night, how to stop using your phone at night, is using your phone at night bad for your eyes, how to stop using phone before bed, using mobile at night, लाईफस्टाईल

काही लोक झोपण्याऐवजी अनेकदा एखादा मेसेज पाहण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतात आणि मग एक मेसेज पाहण्यासाठी म्हणून घेतलेला मोबाईल रात्र संपत आली तरी तुम्हाला सोडवत नाही.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अगदी सगळ्या गोष्टी बदलून गेल्या आहेत, पूर्वी आईच्या किंवा घरातील वडीलधाऱ्या लोकांसोबत रात्रीच्या वेळी विविध विषयांवर चर्चा करत आपण झोपी जायचो. पण आता तरुण पिढीतील युवक – युवतींना मोबाईल वरती गप्पा टप्पा करता करता कधी झोप आली तेच कळत नाही.

काही लोक झोपण्याऐवजी अनेकदा एखादा मेसेज पाहण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतात. पण त्यानंतर मात्र एक मेसेज किंवा एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून हाती घेतलेला मोबाईल पुढचे 2-3 तास तुम्हाला सोडवत नाही.काही तर रात्रभर मोबाईल किंवा लॅपटॉप समोर अंधारात चित्रपट पाहत असतात किंवा काम करत असतात.

पण रात्री झोपण्याआधी मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेळ घालवणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच घातक आहे. आपण वेळीच याचाही परिणाम ओळखून योग्य ती खबारादरी नाही घेतली तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.

रात्री झोपण्याआधी मोबाईलचा वापर करण्याचे दुष्परिणाम

डोळ्यांना गंभीर इजा
रात्रीच्या वेळी अंधारात आपण जेव्हा मोबाईल किंवा कोणतेही वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन बसतो तेव्हा (blue light) निळे प्रकाश बाहेर पडत असतात. हे निळे प्रकाश पूर्ण प्रकाश स्पेक्ट्रमचा भाग आहे. आणि हे निळे प्रकाश स्मार्टफोन, लॅपटॉप्स आणि इतर एलईडी पडद्यावरन उच्च पातळीवर उत्सर्जित होतात, वरून रात्रीच्या वेळी होणारे एक्सपोजर आपल्या दृष्टीला हानी पोहोचवू शकतात.

मोबाईल चे दुष्परिणाम, लठ्ठपणा, तणाव, अपुरी झोप, मोबाईलचा वापर, Stop Using Your Smartphone at Night, how to stop using your phone at night, is using your phone at night bad for your eyes, how to stop using phone before bed, using mobile at night, लाईफस्टाईल
Image Source-shutterstock.com

अपुरी झोप
रात्रभर 6 ते 8 तासांची झोप पूर्ण न झाल्यास याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊन तुम्हाला मानसिक थकवा जाणवू लागेल आणि याच थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी तीव्र डोकेदुखीचा त्रास होवू शकतो. तुम्ही हे वारंवार करत असाल तर याचा तुमच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.

लक्ष विचलित होणे
रात्रभर 6 ते 8 तासांची झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही शरीराने ठणठणीत असाल पण मानसिक विश्रांती भेटली नसल्यामुळे त्याचा प्रभाव आपण दिवसभर करत असलेल्या कामावर होतो. आणि त्या कामाकडे आपले लक्ष लागत नाही मग छोट्या मोठ्या चुका होऊन पुन्हा आपल्याला चिडचिडेपणाला सामोरे जावे लागते.

ही सवयदेखील बनू शकते
आणि जर तुम्ही सतत पूर्ण आणि आरामदायी झोप घेवू शकत नसाल तर नंतर ही सवय बनून जाते. ज्यामुळे शरीरातील न्यूरोटॉक्सीनचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, आणि मग झोप न लागण्याची समस्या निर्माण होते.

मोबाईल चे दुष्परिणाम, लठ्ठपणा, तणाव, अपुरी झोप, मोबाईलचा वापर, Stop Using Your Smartphone at Night, how to stop using your phone at night, is using your phone at night bad for your eyes, how to stop using phone before bed, using mobile at night, लाईफस्टाईल
Image Source – kataeb.org

तणावात वाढ
तुम्ही घेत असलेल्या कमी झोपेमुळे शरीरात मेलाटोनिनचेही प्रमाण वाढते, आणि याचे प्रमाण जसे वाढते तसे ते तणाव वाढण्याचे कारण ठरते. मग तणावामुळे होणारे आजार वेगळेच.

वजनवाढीला आमंत्रण
तुम्हाला माहित असेलच लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण, तर तुम्ही घेत असलेल्या कमी आणि तणावाच्या झोपेमुळे तुमची तीव्र वजनवाढ होऊ शकते आणि जे आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात गंभीर आहे.

काय काळजी घ्याल

रात्री मोबाईल बंद ठेवा
हो. आम्ही मुद्दाम सांगत आहोत रात्रीच्या वेळी तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. ज्यामुळे रात्रभर अगदी शांत आणि नैसर्गिक सोपं तुम्हाला लागेल. तुमची झोप पूर्णपणे कोणत्याही त्रासाशिवाय झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अगदी उसने तुम्ही काम करू शकाल.

मोबाईल चे दुष्परिणाम, लठ्ठपणा, तणाव, अपुरी झोप, मोबाईलचा वापर, Stop Using Your Smartphone at Night, how to stop using your phone at night, is using your phone at night bad for your eyes, how to stop using phone before bed, using mobile at night, लाईफस्टाईल
Image Source – blog.mtel.ba

तुमचा मोबाईल कमीत कमी ३ फूट दूर ठेवा
सांगितल्या प्रमाणे फारच कमी लोक त्यांचा मोबाईल पूर्णपणे बंद करतील, जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी ३ फूट दूर ठेवा म्हणजे electromagnetic radiation पासून तुम्ही सुरक्षित राहाल.

गरज असेल तेव्हाच वापर करा
रात्रीच्या वेळी तुमच्या मोबाईल वर वायफळ आणि चुकीच्या गोष्टींसाठी जास्त वेळ बसू नका, फारच गरजेचे काम असेल तरच तुमचा मोबाईल हाताळा. यामुळे तुमचा उद्याचा दिवस अगदी उत्साहात तर जाईलच पण तुमचे आरोग्य जपले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here